फॉलोअर

शनिवार, २ मार्च, २०१९

बलिदानाचा सोहळा

बलिदानाचा सोहळा
★★★★★★★★★★★★
तो तिरंग्यात लपेटून आला,
देशासाठी शहीद झाला...
या स्वार्थी दुनियेने मात्र,
त्याच्या बलिदानाचा सोहळा केला.

झुंबड उडाली लोकांची
दर्शनाला गर्दी लोटली....
त्याच्या बलिदानावर आपापली
देशभक्तीची दुकाने थाटली.

चार आठ चमचे घेऊन,
राजकीय धेंडे आली...
फोटोसाठी पोज देत
श्रद्धांजली ची भाषणे झाली.

डोळ्यांतील पाणी मागे सारून
शाहिदाची आई आली...
पाहता पाहता चमकले मोबाईल
फोटो काढण्याची घाई झाली.

लाज वाटली त्या क्षणी
माणूस म्हणवून घेण्याची..
त्यागावर सैनिकाच्या
ह्यांनी पोळी भाजली प्रसिद्धीची.

किती विडिओ किती शेअर,
शहिदाच्या निरोपाचे...
हे कसले कोरडे प्रेम
फक्त दिखावा करण्याचे.

अविचल स्थिरपणान त्या अमर जवानाची
पत्नी उभी राहिली
आपापले काम प्रामाणिकपणे करा
हीच खरी देशभक्ती म्हणाली

फोटो काढू नका कुटुंबाचे,
तिला करावे लागले आवाहन..
गर्दीतील लोकांना शांतता नी
सहकार्याचे करावे लागले निवेदन.

शहीद सैनिकांचे बलिदान नसते
कोणा एकट्याचे
कुटुंब असते त्याच्या पाठी ,
मूर्तिमंत रूप त्यागाचे.
🔏©यशश्री रहाळकर
         नाशिक
        2/3/19

६ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!