चैतन्य घरी परतला तशी आदळ-आपट, धुसफूस पुन्हा एकदा सुरू झाली. आप्पांना त्याचा निर्णय पटला नव्हताच , पण त्याहूनही त्यांना आपण बाप म्हणून नालायक ठरतोय अशी भीती जास्त असावी. चैतन्यची आई ,सुधाताईंना पटण्या न पटण्याचा मुद्दा नव्हताच, ह्या बाप-बेट्याच्या भांडणात त्यांची घुसमट होत होती, हे मात्र खरे. थोरला मंदार नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर दीन भाव घेऊन, आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवत शूज पॉलिश करत होता. त्याला मनातून चैतन्यचा निर्णय पटला असला तरी उघडपणे त्याला पाठिंबा देण्याची धमक त्याच्यापाशी नव्हती. घरातल्या एका व्यक्तीला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ती व्यक्ती म्हणजे मंदारची पत्नी समृद्धी. चैतन्यच्या निर्णयावर समृद्धीचे स्वप्नरंजन सुरु देखील झाले..
"आता हे घर आपलेच असं म्हणायला हरकत नाही. आता मंदारशी बोलून आपण चान्स घ्यायला हवा... घरासाठी म्हणून भरपूर सेविंग झाले आहे त्यातून कुठेतरी मस्त फिरून येऊ.. गोवा किंवा .. केरळ..."
मनातल्या मनात समृद्धीने बरेच बेत आखले. खरेतर, चैतन्यचा निर्णय सगळ्यांच्याच भल्याचा होता फक्त आड येत होते पुरुषप्रधान संस्कृतीने पोसलेले इगो.
आप्पा नाडकर्णी आयुष्यभर कारकून म्हणूनच जगले... गावाकडून शहरात आलेली त्यांची पहिली पिढी. सगळी हयात वन.बी.एच.के.चा अडीच खणी फ्लॅट मिळवण्यात घालवली. बरीच वर्षे चाळीतील एका खोलीत संसार केलेले हे कुटूंब..पत्नी सुधा, सगळ्यांशी जमवून घेणारी साधी सरळ गृहिणी. मोठा लेक मंदार त्यांच्यासारखाच .. एका कंपनीत अकाऊंट डिपार्टमेंटला इमाने इतबारे काम करायचा. त्याची पत्नी समृद्धीसुद्धा एका औषधांच्या कंपनीत पॅकिंग करायची.. लग्नाला सहा वर्षे होऊन गेले होते पण जागेचा प्रश्न जागेहून अधिक मोठ्ठा होता.. उद्या धाकट्या दिराचे लग्न झाल्यावर जागा कशी पुरणार ? ह्या विचाराने पछाडून समृद्धीने अजून चान्स घेतला नव्हता . ती आणि मंदार शेजारचा फ्लॅट घेता यावा म्हणून पै पै वाचवत होते.
आप्पांचा धाकटा चैतन्य मेहनती होता आणि त्याहूनही अधिक महत्वाकांक्षी होता. दहावी होताच त्याने कॉमर्स शाखा घेत बँकेच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ग्रॅज्युवेट होताच त्याने स्पर्धा परीक्षांचा सपाटा लावला. नॅशन्लाईज बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तो निवडला गेला आणि आप्पांना आभाळ ठेंगणे झाले. चैतन्यच्या रुपात परमेश्वराने आपल्याला आयुष्यभराच्या कष्टाचे फळ दिले आहे, असेच त्यांना वाटे. आता सुखाचे , आर्थिक स्थैर्याचे दिवस येतील असे सुधाताईंनाही वाटत होते. चैतन्य अतिशय सुस्वभावी, नम्र, निर्व्यसनी मुलगा.. त्याचे एकूणात वागणे बोलणे त्याचे साहेब मोहोळकरांना अतिशय प्रभावित करून गेले. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी... मुग्धासाठी चैतन्य त्यांना अत्यंत योग्य जोडीदार वाटत होता... एक दोन फॉर्मल भेटीतून त्यांनी चैतन्य आणि मुग्धाची गाठभेटही घालून दिली.
मुग्धा एकुलती एक असली तरी लाडोबा नव्हती. तिने कथक नृत्यात आपली करियरची वाट निवडली होती.. घराच्या वरच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये ती नृत्याचे क्लासेस घ्यायची. त्याचबरोबर देशविदेशातील अनेक मोठमोठ्या स्टेज प्रोग्रॅममध्ये तिच्या टीमसह सहभागी व्हायची.. ती स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी होती. तिची स्वतःची स्वप्ने होती आणि त्यात अडथळा आणणारे लग्न तिला नको होते.. शिवाय आईवडिलांना आपल्या शिवाय कुणीही नाही, त्यांना कसे सोडून जाऊ?.. ही विवंचना होतीच. ह्या सगळ्याचा आणि एकूणात परिस्थितीचा विचार करून मोहोळकर साहेबांनी मुग्धा आणि चैतन्यच्या लग्नाचा विषय आप्पा नाडकर्णींकडे काढला. एव्हढा मोठा साहेब मागणी घालतोय म्हटल्यावर पहिल्यांदा तर आप्पांची कॉलर गर्वाने ताठ झाली पण जेव्हा मोहोळकरांनी चैतन्यला "घरजावई" करून घेणार असल्याचे बोलून दाखवले तेव्हा आप्पांचा संताप झाला. आप्पांना व्यवहार कळत होता पण आपल्या मुलावर आपला हक्क राहणार नाही, त्याला अगदी गुलाम असल्यागत ठेवतील वगैरे विचार त्यांच्या मनात घालमेल करू लागले. चैतन्यला मुग्धा मनापासून आवडली होती.. आणि मोहोळकरांचा निर्णय सुद्धा... मोहोळकरांचा सहा खोल्यांचा प्रशस्त बंगला तो नजरेआड करू शकत नव्हता... त्याचबरोबर त्यांचा जावई म्हणून वरच्या, अधिक वरच्या हुद्द्यावर जाण्याची इच्छा सहज पुर्ण होणार हेही त्याला कळून चुकले होते.
"आप्पा! तुम्ही एकदा माझं म्हणणं ऐका...फक्त चिडून, संतापून काहीही होणार नाहीये."
चैतन्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
"माझं मत काहीही असलं तरी फरक पडणार आहे का? तुझा निर्णय झालाय. तो तू परस्पर घेऊन टाकला आहेस.. मग आता हा मानभावीपणा कशासाठी?"
आप्पा फणकाऱ्याने म्हणाले.
आप्पांचा आवाज चढला तश्या सुधाताई आणि मंदार थरथरत आजूबाजूला उभे राहिले... समृद्धी एकीकडे स्वयंपाकाची तयारी करत कानोसा घेऊ लागली.
चैतन्य आप्पांच्या ह्या असहकाराला पुरता वैतागला होता.., तो जरा चिडूनच पण आवाजाची पट्टी राखत म्हणाला..
"आप्पा.. मी बोलूया म्हणतोय कधीचा.. तुम्ही तुमची बाजू मांडा मी माझी मांडतो.. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया..."
"अरे गाढवा! आता काय समजून घ्यायचे आहे मी ? माझा स्वाभिमान नसणारा बुळ्या मुलगा साहेबांचा घरजावई होणार... हे पेढे वाटून सांगू का गावभर? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायची.आपली स्वप्ने पूर्ण करण्या एव्हढं बळ असावं पुरुषाच्या मनगटात ... तू त्या साहेबांच्या मुलीशी लग्न केलेस की मेलास आम्हाला.."
आप्पा बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात असे ताडताड बोलत होते.
"अरे शुंभा, बायकोचा बैल का व्हायचंय तुला? त्या मुलीला काय सोनं लागलंय का? आणि ते प्रेम का काय असेल तर तिने जमवून घ्यायचं तुझ्या घरात... " आप्पा कडाडले.
"तिनेच का जमवून घ्यायचं आप्पा?? मी का नाही? संसार तर दोघांचा असतो ना मग कसले मानापमान? सोय महत्वाची नाही का?" चैतन्यचा प्रश्न सडेतोड होता.
आता परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी सुधाताईंनी संभाषणात उडी घेत सामंजस्याचा स्वर लावत म्हटले
"चैतन्य.. ह्याच घरात, अडचणीत तू रहा असे नाही रे बाळा आम्ही म्हणत.. तू वेगळं घर घे ना तुझं स्वतंत्र किंवा .. किंवा भाड्याने घे एखाद जवळपास..."
"म्हणजे सगळं आयुष्य मी एक घर मिळवण्यात संपवून टाकायचं... "
चैतन्यच्या ह्या उत्तरावर अधिकच भडकलेले आप्पा पिंजऱ्यातल्या वाघागत खोलीतच गरागरा फेऱ्या मारू लागले.
आता चैतन्य काकुळतीला येऊन अजिजीच्या स्वरांत म्हणाला,
"आप्पा-आई...मोहोळकर साहेबांची मुग्धा एकुलती एक लेक. त्यांचा बंगला उद्या तिचाच होणार आहे. तिच्या क्लासचा तिथे उत्तम जम बसला आहे...त्यांनाही आधाराला कुणीतरी हवेच आहे... असे असताना मी घरभाड्यावर पैसे का घालवू? मी त्या पैशांची बचत करू शकतो , तुम्हाला त्यातून मदत करू शकतो..."
"भले शाब्बास ! स्वतःच्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून तिच्या आईवडिलांना आधार द्यायला निघालेत आपले वीर.. त्या घरात तू गुलामासारखा राबून , बटीकासारखा कमावलेला एक पै नको आम्हाला."
सुधाताईंसमोर हात वेडावत आप्पा बडबडत होते.
"आपल्या घरात तुम्ही सून आणणार किंवा वहिनी आलीये पूर्वी ..ती काय बटीक म्हणून का?? नाही ना! ती आपल्या कुटुंबाचा भाग झालीये.. तसा विचार का करत नाही तुम्ही? माझं लग्न झालं म्हणजे मी काही तुम्हाला सोडणार नाहीये सणावाराला एकत्र येऊ, अडल्या-नडल्याला धाऊन येऊ... मी या घरात नसणार पण दादा वहिनी आहेत ... ह्या घराची त्यांना गरज आहे.. माझा पैसा वाचेल तो आपल्याला राहून गेलेल्या हौशी, न सांगता येणारी आजारपणं ह्यासाठी ठेवता येईल. दादाला बाळ झाल्यावर त्याला उत्तम शाळेत शिकवता येईल.. मुळात एकमेकांमुळे होणारा खोळंबा टाळल्याने आपल्यात प्रेम राहील..."
चैतन्य कितीतरी गोष्टी बोलत होता...
मंदार उघडपणे दाखवत नसला तरी त्याला सारे पटत होते... खरेतर, चैतन्यचा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आणि सगळ्यांच्या भल्याचा होता. आईची गेले कित्येक वर्षांची राहून गेलेली चारधाम यात्रा त्याला पुरी करायची होती, आप्पांचे 'चार चाकी गाडी' घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं होतं... त्याला ह्या घरातून व समस्यांपासून पळून जायचं नव्हतं तर त्या समस्या सोडविण्याचा मार्ग तो शोधत होता ... हा मार्ग त्याला मोहोळकर साहेबांच्या प्रस्तावात सापडला होता. सर्वसामान्य माणसाचे अख्खे आयुष्य एक घर घेण्यात संपून जाते, मग जगायचे मात्र राहून जाते. मुग्धाशी लग्न करून त्या घरात रहायला गेल्याने त्याचा हा प्रश्न कायमचा मिटणार होता.. मोहोळकर साहेब आणि त्यांच्या पत्नी स्वभावाने उत्तम होते, मुग्धाचा तर प्रश्नच नव्हता.. आप्पांचा विरोध पाहता त्याने रजिस्टर लग्न करायचे ठरवले होते. बरेच दिवसांपासून ही निरर्थक चर्चा सुरू होती पण निष्पन्न काहीही होत नव्हते.. अखेर चैतन्यचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले.
सुधाताई ह्या साऱ्या वादाने मनातून पुरत्या कोलमडल्या होत्या, आता लेकाला पुन्हा भेटता येईल की नाही ह्या संभ्रमात ओल्या डोळ्यांना पदर लावत त्यांनी विचारले,
"तुझी आठवण आली तर रे चैतु.. काय करू मी ? कुठे भेटशील मला??..."
आईचे हात घट्ट धरत चैतन्य म्हणाला,
"माझ्याजागी जर मुलगी असती आणि ती सासरी निघाली असती तर काय केलं असतंस आई तू?अगदी तेच करायचंय तुला... "
चैतन्य सहज संवाद साधत म्हणाला...
"त्या घरी मी गुलाम नसणार ग.. कुटुंबातील एक व्यक्ती असेन... तू हवं तेव्हा मला भेटायला येऊ शकशील. अगदी हक्काने चार दिवस राहू शकशील तसाच मी सुद्धा तुझ्याकडे येईन ना ... पण कायमचे एकत्र राहणे फक्त जमणार नाही... पण.. पण एक विचार कर ना की मी वेगळे घर घेऊन राहिलो तरी फार वेगळं काही होणार नाहीये."
"लोक काय म्हणतील ह्याचा विचार केलाय का तू? शेण घालतील आमच्या तोंडात शेण!"
आप्पा पुन्हा दरडावत म्हणाले.
"लोक?? कोणते लोक म्हणताय आप्पा तुम्ही? दोन वर्षांपूर्वी तुम्हाला हार्ट अटॅक आला होता तेव्हा हे लोक कुठे होते? कोण होत आपल्या सोबत हॉस्पिटलच्या चकरा मारायला, बँकेत जाऊन पैश्याची जुळवाजुळव करायला... तेव्हा आपणच आपले होतो. आपले प्रश्न आपले असतात , लोक काय उद्या सगळं विसरून जातात.."
चैतन्यचा प्रत्येक मुद्दा आप्पांना अधिकाधिक निरुत्तर करत होता.
"माझा निर्णय जगावेगळा असेल पण तो योग्य आहे ह्याची मला खात्री आहे. माझ्या कुटुंबानी ह्या शुभदिवशी माझ्या सोबत माझ्या आनंदात सहभागी व्हावे एव्हढीच माझी इच्छा आहे."
चैतन्यचे बोलणे संपायच्या आत आप्पांनी नकारार्थी मान हलवली..पण तो न थांबता पुढे बोलत राहिला.
"लग्न म्हणजे तरी काय हो?? दोन वेगवेगळ्या घरात वाढलेल्या दोन जीवांनी एकत्र येत पुढचा आयुष्याचा प्रवास सोबतीने करायचे ठरवणे. साथ सोबत, आधार महत्वाचा . 'जोडीदार असणे' म्हणजे सांभाळून घेणेही आलेच. इथून पुढे तुमची जशी जबाबदारी माझी आहे तशीच मुग्धाच्या आईवडिलांचीही जबाबदारी माझी असणार... ह्याहून फार काही वेगळं नाहीये आप्पा... "
चैतन्य थकून गेला ह्या साऱ्या वादविवादाने... पायात चपला सरकवून तो चालायला निघून गेला.
आप्पांना मनातून अजूनही त्याचे चुकले असेच वाटत होते..
"माझा हातातोंडाशी आलेला , एव्हढा हुशार, सुसंस्कारी मुलगा पळवला त्या मोहोळकराने... भलं होणार नाही त्याचं..."
म्हणत हतबल आप्पा वाहणारे डोळे पुसू लागले.
सुधाताई मूळच्या संयतपणे म्हणाल्या..
"मुले म्हणजे आपली ठेव असते आयुष्याच्या बँकेतली .. त्यावरचे व्याज मिळतेय ह्यातच आनंद मानायचा.पण खर सांगू मुद्दल गेलेले नाहीये अजून हातातून..."
आप्पांना हे अपेक्षित नव्हते. ते चेहऱ्यावर प्रश्न घेऊन उभे होते.. सुधाताई सारे बळ एकवटत म्हणाल्या..
"दोन दिवसांनी लेकाची पाठवणी करायची आहे. चला ! तयारीला लागलं पाहिजे.. मुलांच्या आनंदात आनंद मानायचा आपण..."
आप्पा पुरुषप्रधान संस्कृतीत जगले, वाढले होते. त्यांना कदाचित हे समजून घेणं तितकसं सोपं वाटणार नव्हतं ... मात्र येत्या काळात अश्या प्रकारची मुलाची पाठवणी करण्याची वेळ अनेक आप्पांवर येऊ शकते... ती वेळ फार दूर नाही. चला! पाठवणीची तयारी करायला हवी.
✒️यशश्री रहाळकर