फॉलोअर

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

पवित्र प्रेम ..??????

प्रेम जगातील आदिम भावना .. अत्यंत प्रामाणिक , अत्यंत खरीखुरी मानवी मनाची अभिव्यक्ती म्हणजे प्रेम.  प्रेमाची अनेक रूपे असू शकतील.. आई मुलांचं प्रेम, मित्रांमधील प्रेम , बहीण भावाचं प्रेम... मात्र सृष्टीच्या अखंड चक्रासाठी आवश्यक असणारं दोन भिन्न लिंगी व्यक्तीत असणारं, प्रियकर- प्रेयसीचं प्रेम... हाच प्रेमाचा पाया आहे. जग प्रेमावर चालतं.. प्रेम ही सर्वाधिक पवित्र भावना आहे असं आपण नेहमीच म्हणतो. मी देखील प्रेम केलं... जीवापाड प्रेम केलं... मात्र मी जिच्यावर प्रेम केलं ती कुणा दुसऱ्याची पत्नी होती...एका मुलाची आई होती. विचित्र वाटतेय का कल्पना?? माझं प्रेम पवित्र की अपवित्र ठरवण्यापूर्वी माझी कथा नक्कीच जाणून घ्या.
                        
मी विश्वास जोशी...  सरळमार्गी मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातील जेष्ठ अपत्य, माझ्या पाठीवर दोन भाऊ दोन बहिणी, वडील कोर्टात लिपिक आई गृहिणी . वाशीम सारख्या छोट्याश्या पण जिल्ह्याच्या ठिकाणी वाढलो.. साधं सरळ एकसुरी आयुष्य...एप्रिल 1984 साल माझ्यासाठी जीवनाची नवीन वाट घेऊन आले. मी M. Com. पूर्ण केले आणि लगेचच  वाशीम जिल्हा बँकेत लिपिक म्हणून रुजू झालो. त्या काळात कुणीतरी कुणासाठी तरी शब्द टाकायचे , होतकरू मुले म्हटली की लगेच नोकरी मिळायची. प्रामाणिकपणे दोन वर्षे काम केलं.. साहेबांच्या मर्जीतला झालो... मंगरुळपीर नावाच्या गावात बँकेची नवी शाखा सुरू होणार होती... मी बॅचलर त्यामुळे मलाच मॅनेजर म्हणून प्रमोशन देत पिटाळण्यात आलं. नवीन ब्रँच मध्ये 1 कॅशियर, 1लिपिक आणि 1 प्युन असा स्टाफ होता.आधी राहण्याची सोय शोधली... गाव तसं गैरसोईचंच होतं... भाडेकरू म्हणून एका वाड्यातील खोलीवजा घरात सोय झाली... जुजबी गरजेचे सामान आईने लावून दिले.. तसा गरजेपुरता स्वयंपाक येत होता. सकाळी उठून पाणी भरून दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवायचा.. कपडे धुवून ,स्वतःचं सगळं आवरून बँकेत 10 च्या ठोक्याला हजर व्हायचं असा दिनक्रम ठरला... संध्याकाळी सगळे आवरून यायला चांगलाच उशीर होत असे. आईने माझ्यासाठी एव्हाना मुली बघायला, टिपण पत्रिका जुळवायला सुरुवात केली होती.. मात्र अजून 2 वर्षेतरी सगळं सेटल होईपर्यंत मला लग्न करायचं नव्हतं.
                     
पहिल्या दिवशी बँकेत गेलो ... अगदी लहानशी खोली , स्टाफ ने स्वागत केलं... कॅशियर बेंडाळे , माझ्यापेक्षा वयाने मोठे मध्यमवयीन होते त्यांना काही वर्षांचा अनुभव होता ... त्यांचेच गाव म्हणून त्यांनी इथे बदली मागून घेतली. शेती सांभाळून बँकेत यायचे हे धोरण , त्यामुळे बेंडाळे आले तर आले अशीच परिस्थिती होती. सेवक ठोके अगदी नुकताच बारावी नापास झालेला अठरा वर्षांचा मात्र कामाचा अजीबात अनुभव नसलेल्या तरुण मुलगा. ठोके तरतरीत आणि हुशार होता. माझी कामे न सांगता त्याने समजून घेतली... मी नुसते पाहिले तरी तो चहा , फाईल्स किंवा गरजेची स्टेशनरी आणून देई . हळूहळू सारेच तो झटपट शिकून घेऊ लागला. लिपिक म्हणूननव्याने रुजू झालेल्या डोंगरे बाई मात्र घुम्म असायच्या सांगकाम्या सारखे सांगाल ते काम करायच्या एक चकार शब्द अधिकचा नाही. माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठ्या होत्या मात्र पोक्तपणा स्वभावात ठासून भरलेला... घट्ट आवळून दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन पडलेल्या चेहऱ्याने काम करायच्या. या बाईच्या चेहऱ्यावर कायमचे बारा वाजलेले असायचे. या सगळ्यांमध्ये ब्रँच उत्तम सुरू झाली... सहा महिन्यात बँकेचे चांगले नाव झाले.

एकदा महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून सारी जुळवाजुळव करून मी आणि ठोके उशिरापर्यंत काम करत होतो ... कॅशियर बेंडाळे आजारी असल्याने सुट्टीवर होते. डोंगरे बाईंना मी थोडा वेळ जास्त थांबून काम करण्याची विनंती केली , सुखरूप घरी सोडतो म्हणून आश्वासनही दिले ... मात्र एखादं तासात त्या चुळबूळ करू लागल्या.. घरून फोन आला तश्या भीतीने थरथरत घरी जाते सांगून निघाल्याही. मी जबाबदार म्हणून आणि सोबतीला प्युन ठोके दहा वाजेपर्यंत काम उरकून घरी निघालो. वाड्याच्या दारापाशी जेमतेम पोहोचलो असेन , शेजारच्या वाड्यातून मारहाणीचा आणि कळवळून रडण्याचा आवाज आला... मी क्षणभर विचार केला ; कश्याला दुसऱ्याच्या भानगडीत पडा?? हे तासभर सुरू होतं तो मनुष्य एका स्त्रीला घाणेरड्या शिव्या घालत बेदम मारत होता..अखेरीस मी बाह्या सरसावून निघालो.. पाहतो तर काय  डोंगरे बाईंना मारहाण सुरू होती, तो इसम बहुदा नवरा असावा...चिकार प्यायलेला होता, लाथा बुक्क्यांनी त्यांना तुडवत होता. कोपऱ्यात आठ वर्षांचा मुलगा थरथरत ,"नको बाबा ! नको नको ! आईला मारू नका" असे विनवत होता. असा संताप डोक्यात गेला... त्या इसमाचं बखोटं धरून सण्णकन दोन कानाखाली वाजवल्या... ह्या अनपेक्षित वाराने तो पार कोलमडून पडला. 

"ए बेशरम माणसा ! गुरासारखं बडवतोस माणूस आहेस का जनावर? खबरदार हात लावलास तर पोलिसांना फोन करतो." 

पोलिसांचे नाव घेताच बिचकला जरासा. मागे सरकून जळजळीत नजरेने डोंगरे बाईंकडे पाहतच आतल्या खोलीत जाऊन पसरला. डोंगरे बाई जवळपास अर्धमेल्या झाल्या असाव्या... रात्रही बरीच झाली होती मुलाला त्यांना पाणी पाहायला सांगून मी उलट पावली ठोके शिपायाकडे गेलो. त्याला उठवून डॉक्टरांना घेऊन आलो , ती अमानुष मारहाण पाहून तेही जरा काळजीत पडले. त्यांनी काही औषधे दिली आणि सक्तीची विश्रांती सांगितली... मी माझ्या घरचे दूध हळद घालून डोंगरे बाईंना आणून दिले भाजी पोळी पोराला जेवू घातली. त्यांनी डोळ्यांत पाणी आणून हात जोडले. मी आराम करायला सांगून माझ्या खोलीत परतलो.. आज मी उपाशीच आडवा झालो.. डोळ्याला डोळा लागत नव्हता... सतत डोळ्यांपुढे डोंगरे बाईच दिसत होत्या.

दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यागेल्या मी आधी फाईल शोधून काढली आणि डोंगरे बाईंचा biodata काढला. मंजिरी डोंगरे... काय मस्त नाव आहे मंजिरी वा! मी मनाशीच म्हणालो. शिक्षण बीकॉम झाले होते ... इथे लागली ती नोकरी पहिलीच , अनुभव नव्हता. गरजू म्हणून कुणा पाटलांनी शब्द टाकला होता. ठोके आला तसा डोंगरे बाईंचा विषय निघाला... अचानक डोंगरे बाईंच्या माहितीत मला एव्हढा रस का वाटू लागला कोण जाणे? ठोके सांगत होता..

"साह्येब, काल तुमी व्हते म्हून वाचल्या बाई. त्याहैचा नवरा निर्हा राक्सस हाये."

एव्हढ्यात कॅशियर बंडाळेही आले. झाला प्रकार कळताच म्हणाले,

"कशाला साहेब नसत्या फंदात पडले तुम्ही? तो माणूस फार घाणेरडा आहे.... भयंकर संशयी.  तुम्हाला त्रास दिला नाही म्हणजे मिळवलं. त्याच्या या स्वभावाने कुणीही मदतीला जात नाही त्यांच्या."

डोंगरे बाईंबद्दल दोघे जे जे सांगत होते ते मी जीवाचे कण करून ऐकू लागलो... अचानक मला ही आपुलकी का वाटी लागली होती? माझे मलाच कळेना.. ही फक्त दया असावी. एकंदर मंजिरी डोंगरे ह्याच गावातील तो वाडा तिच्याच वडिलांचा . वडिलांच्या माघारी आईने फायनल शिकत असतांना सांगून आलेल्या ह्या डोंगरेंच्या ठिकाणी लग्न लावून दिलं. नातवाचं तोंड पाहून म्हातारीने राम म्हटलं. डोंगरे माणूस भयंकर घाणेरडा होता... दारू पिणे, जुगार अशी सगळी व्यसने तो करायचा. कर्जबाजारी झाला की बरेच दिवस गायब व्हायचा, आला की मंजिरीला छळायचा, संशय घेऊन मारहाण करायचा. मुलगा वाढवतांना पैसे तर लागणार म्हणून कशीबशी हात जोडून तिने ही नोकरी मिळवली होती. आता डोंगरे स्वतः तर पैसे देत तसेच पण मंजिरीकडूनच घेऊन जायचा. घरातल्या वस्तू विकायचा निराधार मंजिरी सगळे सहन करायची. आता मला मंजिरीच्या घुमेपणाचं खरं कारण कळलं होतं. ... तिच्या डोळ्यांतली वेदना मी वाचू शकलो नाही बहुदा.

प्रेम दोन जीवांमध्ये निर्माण व्हायला कोणत्यातरी शिडीची गरज असते... आईबाळाच्या नात्यात ममता ही शिडी असते. ... तर प्रियकर प्रेयसीच्या नात्यात आकर्षण ही शिडी असते. प्रेमाच्या अंतिम रेशमी भावनेपर्यंत पोहोचवण्याचे काम तुमच्याही नकळत ही शिडी करत असते. मला मंजिरी डोंगरे बद्दल वाटणारी दया, कीव, सहानुभूती अशीच शिडी तर नव्हे ना! मी पुन्हा पुन्हा तपासून पाहू लागलो. ऑफिस सुटताच आधी मी मंजिरीचे घर गाठले. तिचा नवरा बहुदा निघून गेला असावा. ती बरीच सावरली होती पण बेदम मारहाणीमुळे अंग काळे निळे झाले होते... मी जुजबी चौकशी करून माझ्या खोलीवर परतलो... आंबेहळद शिजवून मुलाच्या हातात देत ,त्याला आईला लावून देण्यास सांगितले. थोड्या वेळाने दोघांपुरते खिचडी पापड देखील पाठवले . त्यांचा मुलगा प्रसन्न खरेच नावाप्रमाणेच हसतमुख होता, माझ्याशी त्याची मस्त गट्टी जमली. लवकरच तो माझा छोटा दोस्त बनला. माझी कामे करू लागला, संध्याकाळी आम्ही कॅरम खेळायचो तर रविवारी क्रिकेट खेळायचो. कधी अभ्यासाची पुस्तके मांडून प्रश्न विचारायचा... बहुतेक माझ्याच खोलीत पडलेला असायचा. मलाही मस्त विरंगुळा मिळाला होता. मुलांना माया लगेच उमजते.. माझ्यात तो बापाची माया शोधत असावा.
                      आठ दिवसांनी डोंगरे बाई कामावर रुजू झाल्या . आज नेहमीप्रमाणे पदर गुंडाळून न घेता मोकळा सोडला होता. फिक्या गुलाबी रंगाची साडी सैल वेणी आणि मोगऱ्याचा गजरा.... चेहऱ्यावर स्मितहास्य. मी पाहातच राहिलो, ही कसली कमालीची सुंदर आहे आजपर्यंत मी नोटिसच केलं नव्हतं... गोरापान रंग, टपोरे डोळे, लांब कमरेखाली रुळणारे केस, बांधेसूद आकर्षक देह...  मुख्य म्हणजे प्रसन्नता. अशी मी यापूर्वी कधीही पहिली नव्हती. मंजिरीला माझ्या कडून आधाराची शिडी मिळाली होती. माझ्या सहानुभूतीच्या शिडीला आकर्षणाची शिडीही जोडली गेली... आम्ही प्रेमात कधी पडलो ते आमचे आम्हालाही कळले नाही. मुळात आमच्यामधली भावना नेमकी काय आहे हे काळायलाच आम्हाला उशीर झाला असावा... किंवा स्वतःशी कबूल करायला असेल. आम्ही शेजारीच रहायचो.. ती प्रसन्नच्या हाताने सतत काहीबाही पदार्थ पाठवी.. सुगरण होती ती.. प्रत्येक पदार्थ चविष्ट. हिवाळ्यात गुपचूप उबदार पांघरुणही पाठवले आणि एक स्वेटर देखील न सांगता विणून दिला... इतका तंतोतंत बसला ना! माझे माप बहुदा तिने डोळ्यांनीच घेतले असावे . आमच्या अनेकदा गप्पा होत.. अगदी वेगवेगळ्या विषयांवर, ती खरंच खूप अभ्यासू होती.. तिच्याकडून बँकेच्या परीक्षेचा फॉर्म मी भरून घेतलाच ,ती नको म्हणत असतांना. मग तिचा अभ्यास घेऊ लागलो.. कमाल म्हणजे ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली. आमच्याही नकळत आम्ही एकमेकांत गुंतत गेलो... ती कुणाची तरी बायको आहे, एका मुलाची आई आहे ह्याचा विसरच पडला मला.

एका संध्याकाळी आईबाबा दोघेही आले.. भयंकर संतापलेले दिसत होते. मी ज्या वाड्यात रहायचो त्या घरमालकीण बाईंनी ही बातमी तिखतमीठ लावून पुरवली असावी. आम्ही आपले साधे मित्र असल्याचा कितीही देखावा करत असलो तरी जगाला एक स्त्री आणि एक पुरुष ह्यांच्यातले नाते ओळखता येत होते. 
आईने माझ्यापुढे 3 फोटो ठेवले ह्यातली एक मुलगी मी पसंत करावी आणि लगेच महिनाभरात लग्न करावे असे तिचे मत होते. मी नेहमीची कारणे देत चालढकल करू लागलो, बाबा संतापले... 

"विश्वास .. तुझे काय चालले आहे हे जगाला आणि आम्हाला कळत नाही असे वाटते का तुला? ती दुसऱ्याची बायको आहे ह्याचे तरी भान ठेवा. ह्या सगळ्यांचे परिणाम चांगले होणार नाहीत."

दुसऱ्या दिवशी वाशीमला परतण्यापूर्वी आई मंजिरीला भेटून आली... काय बोलणे झाले कोण जाणे?  ते दोघे गेल्यावर मंजिरी माझ्या खोलीवर आली.. तिला रडणे अनावर झाले होते हुंदके देत ती रडू लागली...

"मी तुम्हाला नादी लावलंय सगळे म्हणतात तुमची आई सुद्धा... किती पुरुषांना नादी लावलंस विचारत होत्या...मी धंदेवाली नाही हो! पुरुषांना नादी लावायचे असते तर फार सोपे होते... माझा नवरा हा असा ... ना आई ना बाप कुणाचा आधार नाही. खूप जणांनी खडे टाकून पाहिले आडून तर कधी प्रत्यक्ष विचारले.. सगळ्यांच्या डोळ्यांत वासना, सगळी  गिधाडं ओरबाडायला टपलेली.. विश्वास !फक्त तुमच्या डोळ्यांत मी आदर पाहिला, माया पाहिली , माणुसकी पाहिली... "

मी मूकपणे तिचे हात हातात घेतले.. आज तिला बोलू द्यायला हवं होतं हृदयात कोंडलेलं सारं दुःख, साऱ्या वेदना मोकळ्या व्हायला हवा होत्या. ती बोलत होती, सगळ्या उजळणीने तिला होणारा त्रास मला जाणवत होता... तिचं सगळं दुःख महादेव होत हलाहलासारखं मला प्राशन करायचं होतं...

"अठराव्या वर्षी काही कळायच्या आत मामाने आणलेल्या ठिकाणी आईने लग्न लावून दिले.  हा नवरा नावाचा प्राणी रक्तपिपासू आहे... एक दिवस सुखाचा गेला नाही... कधी मनांत आलं तर ओरबाडायचा कधी देह कधी पैसा कधी तुडवायचा.. त्यातच प्रसन्नचा जन्म झाला... मुलाच्या जन्माने तरी सुधारेल ही आशाही फोल ठरली... हा माझं मुलगाच नाही म्हणत वेगळाच त्रास सुरू झाला. प्रसन्नला अनाथ आश्रमात टाकायला निघाला तेव्हा मात्र मी विरोध केला, सहा महिन्यांच्या प्रसन्नला घेऊन सरळ आईकडे निघून आली ती कायमचीच...गावच्या पाटील काकांनी शब्द टाकला म्हणून ही नोकरी मिळाली... आताही येतो नीच हलकट.. कधीतरी मारहाण करतो पैसे मागतो, कर्ज काढून ठेवतो आणि वसुलीला लोक माझ्या दारात उभे राहतात.. वाईट बोलतात , बायका टोमणे मारतात .. ह्या सगळ्याचा वीट आलाय हो आता. कधीतरी वाटतं जीव द्यावा पण प्रसन्नचे काय ? हा विचार मनात येतो...
तुम्ही भेटलात आधार वाटला... मला काय वाटतं तुमच्याविषयी मीच सांगू शकणार नाही?काय चुकतंय माझं सांगा ना काय करू मी"

आवेगाने मंजिरी माझ्या मिठीत शिरली ... आमची हृदय जणू जोडली गेली. त्याच क्षणी मी ठरवलं.... मी मंजिरीला अंतर देणार नाही... जगाच्या दृष्टीने हा व्यभिचार असेलही ... मला फरक पडत नाही. मी कायम तिला साथ देईन. संकोचून सावरत बाजूला होत मंजिरी म्हणाली,

"तुम्ही खूप चांगले आहात विश्वास ,. मी तुमच्या आयुष्याचं नुकसान करणार नाही . तुमचे कुटुंब आहे, तुमची समाजात प्रतिष्ठा आहे ती मी मातीमोल होऊ देणार नाही. मात्र तुम्हाला ह्या  जन्मात मला विसरता येणार नाही.. आयुष्यात लक्षात ठेवावे एव्हढे हेच तर क्षण आहेत."

मंजिरी निघून गेली... मी बावळटासारखा बघत राहिलो... ना व्यक्त झालो ना कोणते वचन दिले. मंजिरी बँकेची परीक्षा पास झालीच होती.. तिला अमरावतीला कॅशियर म्हणून पोस्टिंग मिळाले. ती निरोप घेऊन निघाली तेव्हा मी तिला एक सुरेख पेन दिले... असनी म्हणालो ,

"मंजिरी! मला तुला बँकेचे मॅनेजर झालेले पहायचे आहे. थांबू नकोस हार मानू नकोस ... खंबीर हो! परीक्षा देत रहा. आयुष्य खूप सुरेख आहे आणि ते आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे."

मान डोलावून तिने निरोप घेतला. मंजिरीच्या जाण्याने पुढे तीन वर्षे आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती म्हणजे प्रेम होतं का? एक क्षणही मी तिला विसरू शकलो नव्हतो. मला लग्नच करायचे नाही असे मी निक्षून घरी सांगितले... तुम्ही धाकट्या भावासाठी मुलगी पहा सांगून वाट मोकळी करून दिली. तीन म्हणता म्हणता पाच वर्षे मंगरुळपीरलाच गेली होती ... आता बँकेने माझी बदली नागपूर ब्रँचला केली. मी काय एकटा जीव  सामान गुंडाळले आणि नागपूरला पोहोचलो.. वन रूम किचन भाड्याने घेतले.. बँकेजवळचाच एरिया पहिला. दुसऱ्या दिवशी हजर झालो. त्या ब्रँचचे मॅनेजर रिटायर्ड झाले होते. मला पदभार सोपवून सगळ्यांशी ओळख करून दिली... आणि काय आश्चर्य ? सुखद धक्का बसला मला कॅशियर होत्या मिस मंजिरी .. आमच्या अतिशय हुशार आणि मेहनती एम्पलॉय म्हणून साहेबांनी ओळख करून दिली. स्लीव्हलेस ब्लाऊज, गडद मोरपंखी साडी, नितळ रंग जरा अधिकच उजळलेला, वागण्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आणि गळ्यात मंगळसूत्र नाही. मी पहातच राहिलो.. ओळख करून देताच आम्ही दोघे पूर्वी एकाच ब्रँचला असल्याचे तिने सगळ्यांना सांगितले. माझा ह्या योगायोगांवर मुळीच विश्वास नव्हता.. देव नक्कीच काहीतरी योजना करत असावा.

थोड्या वेळात माझ्या केबिनमध्ये फाईल घेऊन मिस मंजिरी हजर.. माझ्यातकीच तिलाही ओढ असणार हे निश्चित होतं. ओळखीचं हसत मंजिरी म्हणाली ,

"कसे आहात साहेव? मिळाली का मनासारखी बायको?"

तिचा प्रश्न टाळत मी मिश्कीलपणे म्हणालो,

"डोंगरे मॅडम तुमचा तर मेकओव्हरच झाला. कोण आहे ती खास व्यक्ती?"

"होता एक मित्र. त्याने खूप आत्मविश्वास दिला मला."

विश्वास शब्दावर जोर देत मंजिरी म्हणाली. ऑफिसनंतर कॉफीला अमुक ठिकाणी भेटा सांगून मंजिरी कामाला लागली. कधी एकदा पाच वाजतात आणि मी बाहेर पडतो असं झालं होतं तळमळत होतो तिला भेटायला. अखेर आमची भेट झाली... खूप वर्षांच्या साचलेल्या गप्पा मारल्या. मारझोड करणाऱ्या नवऱ्याला तिने कायमची लाथ घातली होती.. त्याला डिव्होर्स देऊन ती मिस मंजिरी झाली होती. माझा सल्ला लक्षात ठेवत तिने बँकेच्या पुढील परीक्षाही दिल्या होत्या.. त्यातूनच कॅशियर म्हणून नुकतेच प्रमोशन मिळाले होते. ती आनंदात होती का??  मी शोधत होतो. माझ्या लग्नाचे पुन्हा एकदा तिने विचारले कदाचित ती सुद्धा हेच तपासून पाहत होती की मी आनंदात होतो का?

आता मात्र मी गप्प बसण्याचा मूर्खपणा करणार नव्हतो त्याच क्षणी मी लग्नच केले नाही आणि तिच्याशिवाय कुणाशीही करणारच नाही हे तिला सांगून मोकळा झालो.

" ... आता हे तुझ्या हातात आहे मंजिरी की माझ्यासारख्या माणसाला संसारी बनवायचे की पिंपळावरचा मुंजा. "

माझ्या घरच्यांचा विरोध असणारच होता , त्यांचे काहीही चुकत नव्हते. मात्र आता काहीही झाले तरी आम्ही दोघे लग्न करणार होतोच. प्रसन्न तर खूप खुश झाला मला पाहून ... एखाद्या जाणत्या माणसासारखा मला म्हणाला.

"तुमच्यासोबत मम्मी खूप खुश असणार आणि मी सुद्धा."

आम्ही साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. प्रसन्नने त्याचे डोंगरे आडनाव आणि आईचे नाव कागदोपत्री लावले मला मान्य होतेच.. पुढचे सारेच दिवस स्वप्नवत होते.. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवणे ह्यापेक्षा मोठे भाग्य ते काय? आम्हाला साक्षी आणि  नंतर प्रेम अशी दोन मुले झाली...  आमच्या प्रेमाची ग्वाही देणारी लेक साक्षी आणि प्रेम वृद्धिंगत करणारा प्रेम. चार वर्षांत आईबाबांचा विरोध निवळला . कुटुंबाने मंजिरीचा आनंदाने स्वीकार केला... आज मी बँकेत झोनल हेड आहे... आम्हा दोघांना कधी एकत्र राहता येते तर कधी बदली झाली की वेगवेगळ्या ठिकाणी.. मात्र प्रेम वाढत जाते. होय आमच्या मध्ये प्रेमच होते नव्हे आहे... आज माझ्या आयुष्यातील सगळ्यांत आनंदाचा दिवस आहे... सौ मंजिरी विश्वास जोशी अमरावतीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारणार आहे.. अजूनही तिने ते पेन जपून ठेवलं आहे. लोक म्हणतात मंजिरीच्या मला नादाला लावले.. काय फरक पडतोय? आज आम्ही दोघेही आनंदात आहोत. मंजिरीवर माझं प्रेम गेल्या 16 वर्षांत 16 पट वाढलं आहे. ... शिवाय एक जोडीदार म्हणून मला तिचा अभिमान आहे.. तिने पूर्ण केलेल्या माझ्या स्वप्नाचे सेलिब्रेशन आता जोरदार करण्याची मी तयारी करतोय... surprize party !👍

©🔏 यशश्री                    

आम्ही साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. प्रसन्नने त्याचे डोंगरे आडनाव आणि आईचे नाव कागदोपत्री लावले मला मान्य होतेच.. पुढचे सारेच दिवस स्वप्नवत होते.. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवणे ह्यापेक्षा मोठे भाग्य ते काय? आम्हाला साक्षी आणि  नंतर प्रेम अशी दोन मुले झाली...  आमच्या प्रेमाची ग्वाही देणारी लेक साक्षी आणि प्रेम वृद्धिंगत करणारा प्रेम. चार वर्षांत आईबाबांचा विरोध निवळला . कुटुंबाने मंजिरीचा आनंदाने स्वीकार केला... आज मी बँकेत झोनल हेड आहे... आम्हा दोघांना कधी एकत्र राहता येते तर कधी बदली झाली की वेगवेगळ्या ठिकाणी.. मात्र प्रेम वाढत जाते. होय आमच्या मध्ये प्रेमच होते नव्हे आहे... आज माझ्या आयुष्यातील सगळ्यांत आनंदाचा दिवस आहे... सौ मंजिरी विश्वास जोशी अमरावतीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारणार आहे.. अजूनही तिने ते पेन जपून ठेवलं आहे. लोक म्हणतात मंजिरीने मला नादाला लावले.. काय फरक पडतोय? आज आम्ही दोघेही आनंदात आहोत. मंजिरीवर माझं प्रेम गेल्या 16 वर्षांत 16 पट वाढलं आहे. ... शिवाय एक जोडीदार म्हणून मला तिचा अभिमान आहे.. तिने पूर्ण केलेल्या माझ्या स्वप्नाचे सेलिब्रेशन आता जोरदार करण्याची मी तयारी करतोय... surprize party !👍

©🔏 यशश्री रहाळकर

रविवार, २२ मार्च, २०२०

तिचा काळा बॉयफ्रेंड

फार काही रसाळ वर्णने असावीत अशी ही कथा नाही किंवा फारच भयंकर काही घडले असाही भाग नाही... अजूनही आपण भारतीय लोक रंगांच्या बाबतीत फारच आग्रही असतो.. म्हणजे तसे वागतांना दाखवतो की "रंगाने कुठे काय फरक पडतोय?" पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मनात मात्र गोरी गोरी पान व्यक्तीच जोडीदार म्हणून असते... मग मुलांनाच का नावे ठेवा? मुलींनाही गोराच नवरा हवा असतो.. आणि बाळ होणार आहे अश्या प्रत्येक गर्भवतीला गोरेपान बाळच हवं असतं.. 80% गर्भवतींचे प्रश्न असतात ,"बाळ गोरे होण्यासाठी काय खावे?" मग केशर घातलेल्या दुधाचा बळेच मारा सुरू होतो. गंमत म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात त्यांचं प्रेम जुळलं ... दोघांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या इतका रंगांचा फरक होता. 
                    
गौरी गोखले माझी रुममेट... गौरी नावाप्रमाणे गोरीपान... दुधाळ वर्णाची , घारे डोळे .. सुखवस्तू घरातील मुली असतात तशी जराशी स्थूल प्रकृती ... बाकी नाकात मार खाल्लेला... अंमळ अपरं नाक आणि गोल चेहरा. चेहऱ्यावर मोहक गोडवा. गौरी दिसायला गोड होतीच पण पाहता क्षणीच जाणवायचा तो तिचा गोरापान रंग... तिच्यापुढे आम्ही सगळ्या आम्हालाच काळ्या ठिक्कर वाटत असू.... प्रत्यक्षात आम्हीही बऱ्याच उजळ असलो तरीही. आम्ही चार मैत्रिणी जवळपास 3 वर्षे एकाच रूम मध्ये राहत होतो. गौरीच्या घरचे सगळे तसेच धप्प गोरेपान... काळा रंग औषधालाही नव्हता .आम्हाला तिच्या रंगाचं कोण कौतुक!  "हा रंग गौरीला शोभून दिसेल... तिला काय सगळेच रंग शोभतात ना!" असा साधारण संवाद असायचा.  गौरी मात्र बेफिकीर होती... ना तिला त्या रंगाचं भूषण होतं ना काळजी... कध्धी म्हणून उन्हात स्कार्फ बांधला नाही की सनस्क्रीन लावली नाही. म्हणतात ना भरभरून एखादी गोष्ट देवाने दिली की त्याची मुळीच किंमत उरत नाही तसं काहीसं गौरीचं झालं होतं.

गौरी बरेचदा लपून छपून तिच्या मित्राला भेटायला जायची. आमच्यासाठी हे एक ओपन सिक्रेट होतं. रात्री तासनतास त्याच्याशी फोनवर गप्पा मारायची. विशेषतः अभ्यास करतांना डुलकी येऊ लागली की फोन ठरलेला. तिचा मित्र पुण्याला कुठल्याश्या कॉलेजला इंजिनिअरिंग करत होता... हिच्यासाठी मात्र तो कायम available असायचा. महिन्यातून 3/4 वेळ तरी तो खास तिला भेटायला म्हणून औरंगाबादला यायचा. आम्ही लॉ कॉलेजच्या गर्ल्स होस्टेलवर ... नियम कडक .. त्याला थेट भेटता येत नसे.. मात्र ही काहीतरी कामे काढून बाहेर पडायची आणि ते दोघे भेटत असत. एकदा मी उत्सुकतेने विचारलं...

" गौरी नाव काय ग तुझ्या मित्राचं?"

"तो काही मित्र नाहीये नुसता.. माझा बॉयफ्रेंड आहे. कृष्णा ढोकणे नाव त्याचं... आमचं सातवीत असल्यापासूनच प्रेम आहे एकमेकांवर."

गौरी लाजत माहिती देत होती.
गौरीसारख्या सुंदर मुलीला बॉयफ्रेंड असणारच ना!... असा आम्हा बावळ्यांचा विचार होता . आम्हाला कुणालाच साधा मित्रही नव्हता... वर्गांत मुली वेगळ्या, मुलं वेगळी बसत. साधं कुणी कुणाला ओळख दाखवत नसे की स्माईल देत नसे... या साऱ्यात गौरीचं प्रकरण फार भारी वाटायचं. तो भेटून गेला की गौरी खूप खुश असायची ..... मस्त रोमँटिक गाणी गुणगुणायची. तो आवर्जून एखादी छोटीशी भेट तिला आणायचा.. फार महागडी नाही पण पाहताच आवडावी अशी सुरेख... कधी बांगडी, कधी कानातले , कधी अंगठी. आणि प्रत्येक वेळी एक सुरेख प्रेमपत्र गुलाबी सेंटेड पेपरवर जांभळ्या शाईने लिहिलेलं... त्याच अक्षर पाहूनच गौरी प्रेमात पडली असावी... इतकं सुरेख...  कागदभर अक्षरे नाचायची जणू. हळूहळू गौरीचा आम्हा मैत्रिणींवर विश्वास बसल्यावर तिने ती प्रेमपत्रे दाखवण्यास सुरुवात केली. मजकूर टिपिकल असायचा... तिची किती आठवण येते असे काही ,कधी प्रेमकविता तर कधी आयुष्यभर साथ दे वगैरे मजकूर असायचा. मात्र पत्रातून तो प्रामाणिक वाटायचा... तो गौरीत चांगलाच गुंतला असावा.

"तू नाही कधी पत्र लिहीत गौरी?"

"नाही ग ! एकतर मला त्याच्यासारखं काही लिहिताच येत नाही आणि माझं अक्षर पाहून तो सोडून देईल ना मला !"

म्हणत गौरी खो खो हसत सुटली. गौरी त्याला कधी गिफ्ट देत नसे , ना ग्रीटिंग ,ना लव्हलेटर .....  गौरी त्याच्या बाबतीत बेफिकीर असायची... दर वेळी कोणत्या नवीन ठिकाणी हे भेटायचे कोण जाणे? जवळपास दोन वर्षांनी आम्हाला कृष्णा ढोकणेला भेटण्याचा योग आला. म्हणजे आम्हीच तो आणला... दोन वर्षे गौरीकडून त्याच्याविषयी ऐकून ऐकून आमची उत्सुकता कमालीची वाढली होती. गौरीचा चार दिवस पिच्छा पुरवल्यावर ती आम्हाला बरोबर घेऊन त्याला भेटायला गेली. एका गार्डनमध्ये आम्ही भेटलो.. गौरीने आम्हा तिघींची ओळख करून दिली..  ... आणि घोर निराशा.. कृष्णा नावाप्रमाणेच होता अगदी. व्यवस्थित नीटनेटका जंटलमन वाटावा असा असला तरी.. पाहता क्षणी जाणवायचा तो त्याचा काळाभोर रंग... येथे काळेपणाची मर्यादा संपते असला काळा. आमची घोर निराशा झाली... चांगलं कलरफुल आयुष्य गौरीने black आणि white करून टाकल्याचं मनस्वी वाईट आम्हाला वाटलं.

रूमवर परतल्यानंतर आम्ही गौरीला झाप-झाप झापलं. मुळात आमचा आक्षेप त्याच्या रंगावर होताच पण तो न दाखविता आम्ही इतर मुद्दे पुढे केले... "ढोकणे" हे काय आडनाव आहे?? गौरीला अज्जिबात शोभणार नाही .. मग जात आठवली.. एकीने तर स्पष्ट सुनावले..

"गौरी त्याच्याकड खूप पैसे असतील ना ! इतकी वेडी झालीस का पैश्यासाठी?"

"नाही ग तो गरीब घरचा आहे . पार्ट टाइम नोकरी करून शिक्षण घेतो."

"अरे देवा! मग पहिलंस तरी काय तू त्याच्यात?? पैसेवाला असता तरी एकवेळ समजू शकलो असतो."

आमचं निलाजरी अनावश्यक ढवळाढवळ सुरू होती.. गौरी ते अगदी सहज घेत होती.

"अग पुढे मुलं कसे होतील हा तरी विचार कर जरा."

" त्यात काय झेबऱ्यासारखे होतील काळे पांढरे..."

मिश्किल हसत दिलेले गौरीचे उत्तर ऐकून आम्ही गप्प बसलो.. आम्ही तिचा नाद सोडला की तिने आमचा कोण जाणे.? ह्या अश्या मुलाच्या प्रेमात पडली ही ...तेही सातव्या वर्गात म्हणजे अगदीच टिन एज वेडेप्रेम. पुढे आम्ही कधीही कृष्णा ढोकणे चा विषय काढला नाही की तिनेही काढला नाही. काळ लोटला तसे आम्ही आपापल्या मार्गाने आयुष्यात पुढे निघालो. नवीन नवीन रोज फोन, मेल्स ,चॅट असायचे नंतर जो तो आयुष्याच्या व्यापात बुडून गेला... हळूहळू संवाद कमी होत कधी थांबले कळलेच नाही. दोनेक वर्षांनी कळले... तिच्या गावातल्या एका मुलीकडून की तिचे लग्न ठरले आहे  .. तिने आम्हाला बोलावले नाही की सांगितले नाही... कुणी अभ्यंकर होता , तोलामोलाचा फॉरेनला सेटल... हे ऐकून आनंदच झाला. ते वेड्या वयातलं प्रेम का कुठे खरं असतं? एकुणात कृष्णा ढोकणेचा नाद सोडला असावा... त्याचे काय झाले असेल बिचाऱ्याचे कोण जाणे? हळूहळू गौरी आणि कृष्णा विषय , रोजच्या कटकटींत डोक्यातून पार हद्दपार झाला.

मध्यंतरी चांगला 10 वर्षांचा काळ लोटला. नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला जाण्याचा योग आला. आम्ही ट्रेनने आदल्या दिवशी दुपारीच पोहोचलो.. हाताशी बराच वेळ होता .. मग आहोंना घेऊन जरा औरंगाबाद फिरवून आणते म्हणून बाहेर पडलो. गुलमंडीतमस्त पायी दुकाने धुंडाळली, स्पेशल भल्ला खाऊ घातला.. मग निराला बाजारात फिरत मँगो मस्तानी खाल्ली. शेवटी वरद गणेशाचे दर्शन घेऊन परत जायचे ठरले. हे वरद गणेश मंदिर अगदी आमच्या हॉस्टेल जवळ पायी जाण्यासारखे... आम्ही उठसुठ जायचो, विशेषतः परीक्षा असली की, पेपर कठीण गेला की, रिझल्टच्या दिवशी... सगळ्या आठवणी गोळा करत डोळे मिटले.. मागे फिरणार तर गौरी उभी. तिने कडकडून मिठीच मारली... दोघींचेही डोळे वाहू लागले.खूप वर्षांनी आम्ही दोघी भेटलो होतो... तिचे घर जवळच होते .आम्हाला खूपच आग्रह केला तिने चला घरी म्हणून... शेवटी हो नाही करता करता हे तयार झाले. अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर तिचे घर होते.

प्रशस्त म्हणावे असा 3 बेडरूमचा फ्लॅट... सुरेख सजवलेला..अप्रतिम सुंदर पडदे, भिंतींचे रंग , फर्निचर, टेरेस गार्डन त्यात झुला... अतिशय कलात्मकता सगळीकडेच जाणवत होती. ह्यांनी पाहता क्षणी घराची स्तुती करताच... घराचे इंटेरियर तिच्या नवऱ्याने स्वतः दखल देऊन केल्याचे ती म्हणाली ...नवऱ्याची सौंदर्यदृष्टी सुरेख असल्याचेही ती बोलली. तिने तिच्या नवऱ्याला फोन करून बोलवून घेतले... चहा नाष्ता होईपर्यंत दाराची बेल वाजली... माझे डोळे बाहेर पडायचेच बाकी होते... दारात कृष्णा ढोकणे उभा होता... गप्पांच्या नादात मी दाराबाहेर नेमप्लेट बहुदा पहिली नसावी. निर्मळ हसत त्याने माझ्या आहोंशी ओळख करून घेतली.. आणि विविध विषयांवर त्यांच्या गप्पा रंगल्या. गौरी मला आतल्या खोलीत घेऊन गेली. मलाही तेच हवं होतं.. कित्येक प्रश्न तिला विचारायचे होते... तिने ते माझ्या चेहऱ्यावर वाचले असावेत.

आत जाताच मी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तिने हातानेच मला थांबवत नेहमीच्या मिश्कीलपणे प्रश्न केला..

"तू पहिलंस का मला नीट?? कशी दिसतेय मी?"

मी निरुत्तर... गौरीचं पुढे म्हणाली..

"मी खूप खूप सुखात आहे.. मज्जेत आहे हे पुरेसं नाहीये का?"

माझे दंड धरून गौरीने गरागरा मला फिरवले...तिचे अवखळपण ...बालिशपण अजूनही तसेच होते.

"अग पण अभ्यंकर??"

"हां ! ती स्टोरी एव्हढीश्शी आहे... आमचं लग्न मान्य नव्हतंच घरी कुणाला अपेक्षितच होतं ते ! आईने जीव द्यायची धमकी दिली... मग सांगेल त्याच्याशी लग्नाला तयार झाले.. देवव्रत अभ्यंकर त्यांना हवा तसा जावई होता..  लग्नाचा धडाका उडवला.. त्यांच्या 100 अटी पूर्ण करत प्रचंड पैसे ओतून साखरपुडा झाला... लग्नही  ठरले.  फॉरेनचा जावई मिळतोय म्हणून अक्षरशः पैसा ओतला होता बाबांनी. लग्नाच्या दिवशी सकाळी मी तयार होत होती... साडे दहाचा मुहूर्त होता... आणि पावणे दहा ला कळले.. देवव्रत पळून गेलाय त्याच परधर्मीय मुलीशी आधीच लग्न झालेलं होतं... घरी सांगायची हिंमत नव्हती.."

"मग"
मी उत्सुकतेने विचारलं..

"मग काय ? हे त्याने मला आधीच सांगितलं होतं .. मीच त्याला पळून जायचा पर्याय सुचवला.. फट्टू होता ग तो."

म्हणत ती खो खो हसत सुटली..  माते तुम्ही धन्य आहात ,अश्या अविर्भावात मी हात जोडले.

"मग वेळेवर कृष्णाची एन्ट्री मी प्लॅन केलीच होती. तुम्ही पाहिलेल्या मुलगा फसवून पळून गेला आता मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणार मी ठणकावून सांगितले... आई बाबा तयार झालेच... आणि ठरल्या मुहूर्तावर माझे आणि कृष्णाचे लग्न थाटात पार पडले... शिवाय घरच्यांनी बिनबोभाट जावयाला स्वीकारले, उलट वेळ निभावून नेली म्हणून जास्तीच मानाने वागवले."

मी पार क्लिन बोल्ड... पोरीने काय वेड्यात काढलं मायबापाला! 

" हे बघ . आम्हाला पळून जाऊन लग्न करणं सहज शक्य होतं पण मग मी कायमचे माझ्या घरच्यांना दुरावले असते. दुःखी झाले असते.. तेही आणि मीही. शिवाय मला माझी सगळी हौस मौज करून लग्न करायचे होते.... थाटात"

म्हणत गौरीने डोळे मिचकावले.

"हे सगळं कसं सुचलं बाई धन्य आहेस तू?"

"मी नाही ग हा सगळा प्लॅन कृष्णाचा हं!... आता लाडका जावई आहे गोखलेंचा...  होणारच होता तो... माहितीच होते मला.. त्याच्या ह्याच हुशारीवर तर भाळले होते मी. हुशार , माणसे न तोडता जपणारा, प्रेमळ समंजस... आईबाबांचा रोज त्याला फोन असतो.. मस्त गप्पा होतात . त्याच्या आईवडिलांसारखी माझ्याही आईबाबांची काळजी घेतो... सगळे चेकअप कंपनीकडून करून घेतो मागच्या महिन्यात बाबांच्या डोळ्यांचे ऑप्रेशनही इथेच करून घेतले स्वखर्चाने "

तेव्हढ्यात तिचा पिल्लू शाळेतून परतला....  4 वर्षांचा गौरव जरा बिचकतच माझ्या जवळ आला... मी त्याला म्हणाले ,
"तुझं नाव मी गेस करू .. झेब्रू !"
 तसा टाळ्या पिटत हसत सुटला... " बरोब्बर ! मम्मी मला लाडाने झेब्रू म्हणते."
त्याच्या बरोबर आम्ही दोघीही हसत सुटलो... फोन नंबरची देवाण घेवाण झाली आणि आम्ही निरोप घेतला.

परततांना अहो म्हणाले, 
"काय भन्नाट हुशार माणूस आहे... इंप्रेस ! प्रचंड माहितीचे भांडार आहे...एव्हढ्या मोठ्या चीफ मॅनेजरच्या पोस्ट वर आहे पण किती साधा किती प्रामाणिक, दिलखुलास गप्पा मारल्या... फार आवडला बुवा आपल्याला .. लकी आहे तुझी मैत्रीण."

मी मनापासून म्हणाले,

"खरंच लकी आहे गौरी."

कित्येकदा आपण सगळेच जोडीदार निवडतांना अत्यंत फुटकळ मुद्द्यांना अनावश्यक महत्व देतो नाही ! पुढे प्रत्यक्ष आयुष्यात ते मुद्दे अगदीच बिनमहत्वाचे आहेत हे कळून चुकतं. रंग हा त्यातलाच एक... खरं प्रेम ह्या रंगापलीकडे पाहू शकतं.... वरवरचं रुपरंग ह्या पलीकडे जाऊन गुण पाहणं गौरीला लहान वयांत शक्य झालं... सगळ्यांना जमेलच असं नाही.
©🔏यशश्रीफार काही रसाळ वर्णने असावीत अशी ही कथा नाही किंवा फारच भयंकर काही घडले असाही भाग नाही... अजूनही आपण भारतीय लोक रंगांच्या बाबतीत फारच आग्रही असतो.. म्हणजे तसे वागतांना दाखवतो की "रंगाने कुठे काय फरक पडतोय?" पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मनात मात्र गोरी गोरी पान व्यक्तीच जोडीदार म्हणून असते... मग मुलांनाच का नावे ठेवा? मुलींनाही गोराच नवरा हवा असतो.. आणि बाळ होणार आहे अश्या प्रत्येक गर्भवतीला गोरेपान बाळच हवं असतं.. 80% गर्भवतींचे प्रश्न असतात ,"बाळ गोरे होण्यासाठी काय खावे?" मग केशर घातलेल्या दुधाचा बळेच मारा सुरू होतो. गंमत म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात त्यांचं प्रेम जुळलं ... दोघांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या इतका रंगांचा फरक होता. 
                    
©🔏यशश्री रहाळकर

शुक्रवार, २० मार्च, २०२०

रेशीमगाठी

       आज एका आगळ्या विवाह सोहळ्याचं साक्षीदार व्हायला मिळालं... वाजंत्री, सनई चौघडे,अक्षदा , जेवणावळी, विधी ,अत्तराचा घमघमाट , मुंडावळ्या बांधून सुरेख नटलेले नवरी नवरदेव .... आता तुम्ही म्हणाल यात काय आगळं ? सगळ्याच लग्नात हे आणि असच असतं ना! ... फरक फक्त एव्हढाच आहे की नवरदेव फक्त 64 वर्षांचा तर नवरी 59 वर्षांची ... दोघेही प्रथमवर हे विशेष... त्यातही 50 वर्षे एकमेकांवर अखंड केलेले आगळे प्रेम .💖💖
                  साधारणपणे 60 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ... पालखेडच्या पाटलांचा मोठा चौसोपी वाडा होता... जमीन जुमला, सोनं- नाणं , गुरेढोरे, गडी माणसे सारं सारं भरभरून होतं; पण पाटलीण बाई तरीही खूप खूप दुःखी असायच्या... गडी माणसांकडे दरवर्षी पाळणा हलायचा पण त्यांची कूस सुनीच होती.नवस सायास, गंडेदोरे पीरही झिजवून झाले... शेवटी लग्नाला 15 वर्षे झाल्यावर त्यांनी पाटलांना दुसऱ्या लग्नाची गळ घातली. पत्नीवर मनापासून प्रेम असणाऱ्या पाटलांना ही कल्पना मुळीच मान्य नव्हती .. शब्दाने शब्द वाढला .. रागारागाने पाटील घरातून निघाले ते थेट नदी किनाऱ्यावरील महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले... तेथेच 4 वर्षांचा एक बालक त्यांना भेटला... कोण कुठचा काहीही त्याला सांगता येत नव्हते ... हरवला का कुणी आणून सोडला कोण जाणे?? मायाळू स्वभावाचे पाटील त्याला घरी घेऊन आले ... पत्नीला म्हणाले , " हा शंकराचा प्रसाद हाये.. आता ह्योच आपला लेक ... पुन्यानंदा दुसऱ्या लग्नाचा विषय काडलासा तर बगाच." त्या पोराचं नाव शिवा ठेवलं .. मोठ्या मायेनं दोघे त्याचा सांभाळ करू लागले.. त्याचा पायगुण होता का काय कुणास ठाऊक ? पाटलीण बाईंची कूस उजवली. नक्षत्रासारखी लेक जन्मली. शिवानेच तिचं नाव ठेवलं गौरी... तिच्या जन्माने शिवावरच्या प्रेमात जराशी वाढच झाली. आपली दोन्ही लेकरं शिकताहेत , जोडीनं मोठी होताहेत याचा त्यांना केव्हढा अभिमान होता.. शिवा आपला लेक नाही हे त्यांनी कधीही लपवले नाही मात्र शिवाच्या सगळ्या कागदपत्रांवर त्यांनी बाप म्हणून आपलं नाव जोडले...पण हे असे सारे निर्मळ नियतीला मान्य नसावे.
                         शिवा आणि गौरीचे जग एकमेकांत गुंतलेलं होतं... क्षणभरही दोघे एकमेकांशिवाय राहत नसत. शिवा कायम गौरीची पाठराखण करत अवतीभवती असायचा... तिच्या मस्तीखोर आणि हट्टी स्वभावाशी जुळवून घ्यायचा. तिच्या उपदव्यापांनी शिक्षा झालीच कधी तर तिच्या वाटचा मारही मुकाट खायचा. गौरी 10 वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट... मामाच्या मुलीच्या लग्नाला पाटलीण बाई तिला सोबत नेणार होत्या. शिवाची नवव्या वर्गाची महत्वाची परीक्षा त्याला नेता येणार नव्हते. चार दिवस शिवा आणि गौरीनं रडून रडून घर डोक्यावर घेतलं... शिवाला सोडून गौरी जायला तयारच नव्हती... पाटील बाई वैतागून म्हणाल्या " गौराई उद्या लगीन झाल्यावर कसं हुनार... नवऱ्याच्या घरला जातांना शिवाला संग नेता यायचं न्हाई..." जरा विचार करून गौरी म्हणाली " तर मग मी शिवाशीच लगीन करीन."
                       सोप्यात पेपर वाचत बसलेले पाटील चमकलेच ...गौरी तशी लहान होती पण शिवा आता कळत्या वयात होता... त्याच क्षणी शिवाने ठरवलं लग्न करीन तर गौरीशीच. हळूहळू काळ जसजसा जाऊ लागला तसतसे शिव अन गौरी एकमेकांत गुंतून जाऊ लागले... सहवासाने झालेली मैत्री अन फुललेले प्रेम वाढतच गेले...दोघेही कागदोपत्री बहिणभाऊ असले तरी प्रत्यक्षात कुणीही नव्हते. शिवाचे 12 वी पर्यंतचे शिक्षण जाऊन येऊन तालुक्याला झाले .. तो अभ्यासात तल्लख होता ..
                      पाटलांच्या मनाने वेगळेच घेतले . शहरात त्याची राहण्याची व्यवस्था केली त्याच दिवशी त्याच्याकडून वचन घेतलं पुन्हा कधीही परतून त्यांच्या घरी येणार नाही... आपला इतक्या प्रेमानं सांभाळ केलेल्या पित्याला त्यानी सहज ते वचन देऊन टाकले. त्याची वर्षातून एकदा भेट घेऊन त्याचा राहण्याचा व इतर सर्व खर्च ते देत असत. मात्र घरी चल असे कधीही म्हणाले नाही. इकडे गौरीकडून वचन घेतले की ती कधीही  नागपूरला जाणार नाही ... तिथेच शिवा शिकायला होता. त्या दोघांना ही न दुखावता पाटलांनी त्यांची ताटातूट घडवून आणली. मानलेल्या का असेना;  आपल्याच दोन लेकरांनी लग्न करणे त्यांना मान्य होत नव्हते...
                     पाटलांनी गौरीच्या लग्नाची मोहीम जोरात हाती घेतली.शिवा आणि गौरी थोड्याच काळात काय ते समजून चुकले..गौरीने शिवाला अखेरचे पत्र पाठवले आणि सांगितले ," मला विसरून जा. लग्न कर सुखात रहा. माझे कुणाशीही लग्न झाले तरी हृदयात तूच असशील." शिवाने लग्नाचा विचार मनातून काढून टाकला... स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित केले.पदवी पर्यंतचे शिक्षण त्याने पाटलांची मदत स्वीकारत घेतले पुढे नम्रतेनं त्यांची मदत नाकारून तो लहान मोठ्या नोकऱ्या मिळेल ती कामे करू लागला. त्याच्या मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन तो कलेक्टर बनला. ही आनंदाची बातमी पाटलांना धावत जाऊन द्यावी असे त्याला वाटले पण आपले वचन स्मरून त्याने मन आवरते घेतले. 4 ओळींची बोटभर तार करून त्याने पालखेडशी कायमचा संपर्क तोडला.
                   इकडे गौरीचे आयुष्य खडतर योगायोगाने भरलेले होते. तिच्या पत्रिकेत असणाऱ्या कुठल्याश्या वाईट योगांमुळे तिचे लग्न जुळता जुळेना. पाटलांनी खूप प्रयत्न केले पण योग नव्हता हेच खरे... एक स्थळ त्यांनी जमवून आणले तर दोनच दिवसांत साप चावल्याचे निमित्त होत तो मुलगा गेला... 😢 एक स्थळ तर सुपारी फोडूनच पाठवले त्यांनी ;त्याची गाडी घाटात उलटून तो गेला.. सोन्यासारख्या पोरीवर ठप्पा बसला.कोणीही तिच्याशी लग्नाला तयार नव्हते,पंचक्रोशीत चर्चा झाली.तिचे वय 30 चे वर उलटले .. काळजीने खंगुन एके दिवशी पाटलीण बाईंनी राम म्हटले. उतारवयात झालेल्या पोरीचे आपल्या पश्चात काय होणार? या काळजीने पोखरून पाटीलही इहलोकीची यात्रा संपवते झाले... गौरी एकाकी पडली. गडगंज संपत्तीची मालकीण पण आपले म्हणावे असे कोणी नाही...अनाथ, टाकून दिलेल्या, निराधार बालकांना तिने आपलेसे केले... वाड्याचे रूपांतर मोठ्या आश्रमशाळेत केले... हळूहळू कार्याविस्तार होत गेला आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून तिने मोठ्ठा नावलौकिक मिळविला.
                  12 जानेवारी 2020 ला जिजाऊंच्या जन्मदिनी तिचा "उपेक्षितांची माता' म्हणून मोठा सन्मान होणार होता.. ती सत्कार स्वीकारायला गेली आणि भोवळ येऊन कोसळली. तिचा सत्कार माजी जिल्हाधिकारी शिवा पाटील ह्यांच्या हस्ते होता. कित्येक वर्षांचा विरह तरीही मनातील प्रेम जसेच्या तसे ताजे होते. आता त्या प्रेमाच्या आयुष्यात आपल्याला स्थान आहे की नाही दोघेही संभ्रमात पडले. शिवाने तिची सारी माहिती काढली.. एक दिवस धीर करून तिला भेटायला बोलावले... कित्येक तास दोघे त्याच्या बंगल्यावर गप्पा मारत होते .. काळाची वर्षे जणू मध्ये नसावी असे. ती जायला निघाली तेव्हा शिवाने तिला राहिलेले आयुष्य माझ्या सोबत घालविणार का ? म्हणून विचारले. "आता ह्या वयात लोक काय म्हणतील?" गौरीने विचारले. शिवाने जरासा विचार करत हसत हसत उत्तर दिले "आपण लग्न करूयात.. मस्त धुमधडाक्यात" अश्या प्रकारे 14 फेब्रुवारी 2020 प्रेमादिनाला 50 वर्षे दुरावा सहन केलेलं हे प्रेमी युगुल एक झालं. दोघांनीही आपली वचने कायम पाळली ... शिवा कधीही पाटलांच्या घरी आणि गौरी कधीही नागपूरला गेलेच नाही ..😊👍
🔏©यशश्री रहाळकर

बुधवार, १८ मार्च, २०२०

प्रेमा तुझा रंग कसा??

प्रेमा 💘तुझा रंग कसा 💞

            प्रेम म्हटले की लाल गुलाबी रंग डोळ्यांसमोर तरळून जातो... लाल गुलाब 🌹लाल हार्ट❤ गुलाबी भावना 💗वगैरे वगैरे म्हणजेच प्रेम असं काहीसं वाटून जातं.. प्रेम मैत्री असेल तर पिवळा 💛असूही शकेल कधी तर कधी एकतर्फी क्रूर 🖤काळाही असेल .💙आकाशा सारखं नीळ प्रेम ..... म्हटलं तर पटेल का हो?? अश्याच एका अथांग मोठ्या मनाच्या 'त्याची' ही कहाणी.
                निलय गुणवंत कुलकर्णींचा एकुलता एक लेक ... घरात आजी आजोबा काका काकू त्यांच्या 2 मुली आणि निलंयचे आईबाबा असं 9 माणसांचं भरलं गोकुळ ... सगळे एकत्र आनंदात राहत. निलय सगळ्यांचा लाडका . शेजारी राहणारे देवळे कुटुंब त्यांचे अगदी घरोब्याचे...कुटुंबप्रमुख लक्ष्मीकांत देवळेेंचा मोठ्ठा business चा पसारा होता.. घरात त्यांची पत्नीआणी लेक सोहा असे इवले कुटुंब. निलय आणि सोहा अगदी खेळघरापासून एकाच वर्गात ... दोन्ही घरे शेजारी म्हणण्या पेक्षा सख्खे शेजारी म्हणावे असा दृष्ट लागण्याजोगा सलोखा....
                  सोहा 11 वर्षांची होती तेव्हा एका तापाच निमित्त झालं नी सोहाची आई देवाघरी गेली ... या काळात निलयच्या आईनं तिला खूप सांभाळून घेतलं. लक्ष्मीकांत देवळेंनी स्वतः ला business च्या व्यापात बुडवून घेतलं. सोहा वयात येण्याच्या अवघड काळात निलयच्या आईनं ह्या पोरक्या लेकीला मायेच्या पदराआड घेतलं होतं . सोहा बहुतेकवेळ निलयकडेच असे .. त्याच्या बहिणींमध्ये ती रमून जाई . हळूहळू ती त्याच घराचा जणू भाग बनली. सोहा आणि निलय दोघेही वाढत्या वयासोबत एकमेकांचे जिवलग मित्र नी पुढे जाऊन प्रियतम बनले... ह्या गोष्टीला आक्षेप घेण्याचं कुणालाच काही प्रयोजन नव्हतं. सोहा सगळ्यांची लाडकी होती. निलय स्थिरस्थावर झाला की दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ असा विचारही दोन्ही घरून बोलल्या जात होता.
                       निलय त्याच्या नव्यानेच लागलेल्या नौकरीत चांगलाच व्यस्त होता.. इंजिनियरींग पूर्ण होताच त्याला हा जॉब कॅम्पस मध्येच मिळाला. जरा बेताचा पगार पण खुश होता तो ..  आता officialy सोहाच्या वडिलांना लग्नाचे विचारावे असा बेत त्याने पक्का ठरवला. पण तेव्हढ्यात त्याला एका प्रोजेक्ट साठी हैदराबादला जावे लागले... 2 महीने त्याला तिथून हलताच आले नाही... त्या प्रोजेक्ट च्या यशासह निलय प्रमोशन देखिल घेऊनच परतला.
                 दुसऱ्याच दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी तो देवळे काकांकडे गेला... आणि आढेवेढे न घेता त्याने सरळ सोहाचा हात मागितला... आता त्याला लवकरात लवकर सोहा त्याची पत्नी झालेली हवी होती. अपेक्षेप्रमाणे त्याला होकार मिळाला नाही... "सोहाची तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाही "असे सांगून देवळे काकांनी नकार दिला. निलयच्या पायाखालची जमीनच सरकली. कालपासून सोहाची आपल्याकडे एकही चक्कर नाही ... एव्हढ्या दिवसांनी आलोय तरी भेटलीही नाही ... हळूहळू एकेक गोष्ट त्याला आठवायला लागली.
घरात तो परतला तोच उध्वस्त होऊन ..घरी त्यानं झाला प्रकार सांगितला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला  "एकदा माझ्याशी बोलायला नको का?? असं अचानक काय झालं ते?" निलयाच्या आईच्याही सोहाच्या वागण्यातील बदल लक्षात आला होता. काहीतरी बिनसलंय नक्कीच! बडबडी सोहा गेले काही दिवस गप्प गप्प होती... त्यांच्या घरी येणं टाळत होती.  काही दिवसांतच तिच्या बाबांनी तिचं लग्न ठरवल्याच निलयला कळलं... अतिशय श्रीमंत बीजवर शिवाय वयाने बराच मोठ्ठा असं ते ठिकाण होतं... एकंदर सोहाला पैसा हवा होता तर... कुलकर्णी कुटुंब मनातून दुखावले.
                  एक दिवस निलयची आई सोहाकडे जाऊन धडकली...अतिताण असल्याने फिकुटलेली निस्तेज अर्धी झालेली सोहा पाहून अक्षरशः पोटात तुटलं .त्यांनी स्पष्ट केलं," इथं मी निलयची नाही तर तुझी आई म्हणून आलेय. काय झालं ते सांग पाहू तुला माझी शपथ" म्हणून  त्यांनी तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. निलयाच्या आईच्या गळ्यात पडून सोहा धाय मोकलून रडू लागली. उरातली जखम तिनं उघडी केली. काही दिवसांपूर्वी घरी राहायला आलेल्या आत्याच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला होता... तिचे पापा नेमके उशीरा घरी आले त्यांना सारेच कळून चुकले पण उशीर झाला होता.अर्धमेला होईपर्यंत त्यांनी त्या नराधमाला चोपले.. बहिणीचा नवरा म्हणून जीव घेता येईना. पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवावी तर बहीण पाय धरून रडू लागली.. तिलाही दोन लग्नाच्या मुली होत्या.. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार शिवाय एकदा तक्रार केली की मीडिया तिखटमीठ लावून बदनाम करणार... तीन मुलींचे आयुष्य उध्वस्त होणार ...असे त्या आत्याने सोहाच्या बाबांना समजावले. सोहाचे कुणालाच काही न सांगता लग्न लावून देण्याचे ठरले. तसेही निलयचे आणि तिचे प्रकरण सगळ्या जगाला ठाऊक होते . घरात घडलेली गोष्ट बाहेर न सांगता दाबून टाकणे शक्य होते.
मात्र सोहाचे निलयवर खरेखुरे प्रेम होते .त्याला अश्या प्रकारे न सांगता फसवून लग्न करणे तिला खरंतर शक्य होते पण तिच्या आत्म्याला ते मंजूर होत नव्हते. तिने निलयला लग्नाला नकार कळविला ....पण त्याच्याविना राहण्याची कल्पना तिला मान्य नव्हती. पाण्याविना माश्याची व्हावी तशी तिची तडफड होत होती. 
              तिच्याशी एक अक्षरही न बोलता तिच्या डोक्यावर थोपटून निलयची आई त्याच्याकडे परतली. आज त्यांच्या संस्कारांची, निलयच्या प्रेमाची आणि त्यांच्यातल्या स्त्री ची परीक्षा होती. घडला प्रकार हृदयावर दगड ठेवून त्यांनी निलयला सांगितला... क्षणभर तो विचारात पडला आणि आईला म्हणाला , 
" हे सारं एक दुःस्वप्नं म्हणून विसरता येईल तिला किंवा accident म्हणून ...जखमा भरून येतात शरीराच्या.. तश्या मनाच्या येतील भरून?" आईनं आश्वासकपणे उत्तर दिलं," कुणी साथ दिली तर कदाचित... " निलयनी आईच्या डोळ्यांत पाहत विचारलं ," तो कुणी मी असेन तर ..." प्रसन्न हसत आई म्हणाली.. " एक स्त्री म्हणून तुझ्यावर केलेल्या संस्कारांसाठी तो माझा सर्वांत मोठा गौरव असेल." 😊
           दुसऱ्याच सकाळी निलय सोहाला भेटला .. तिला एकच वाक्य म्हणाला ," मी लग्न करीन तर केवळ तुझ्याशी. आता मी आयुष्यभर अविवाहित राहावे असे तुला वाटतंय का?" 😢 सोहा त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली... साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केलं .. तितकंच मायेनं निलयनी सोहाला जपलं देखिल... स्त्री देह म्हणजे पावित्र्याच्या संकल्पना आल्याचं .. ... तिचा दोष असो नसो. फारच थोडे लोक असे असतात जे तिच्या पवित्रतेचा संबंध मनाच्या पावित्र्याशी जोडतात. त्याला निलय आणि त्याच्या आईसारखं मोठ्ठ मन असावं लागतं. आकाशासारखं अथांग सारे उल्कापात ,ग्रहणे सामावून घेणारं...... लग्नानंतराचा पहिला प्रेमदिन होता . सोहानी आपलं प्रेमपत्र लिहायला आवर्जून निळ्या रंगाचा पेपर निवडला...प्रिय निलय... पुढचं सारं तिच्या अश्रूंनी पुरं केलं.
©🔏यशश्री रहाळकर

गुरुवार, १२ मार्च, २०२०

पुरणपोळी

                         बालपणीचा प्रदीर्घ काळ एकमेकींसोबत काढलेल्या  आम्ही 7/8 माहेरवाशीणींनी एकाच वेळी आपापल्या माहेरी यायचे आणि  मस्त धम्माल करायची ठरवले. मध्यंतरी खूप वर्षांचा काळ  गेला होता .. प्रत्येकीच्या सुट्ट्या वेगळ्या, आधी मुले लहान म्हणून मग त्यांच्या परीक्षा म्हणून...  
निमित्ताने चार-दोन दिवस जो तो गावी येऊन जाई पण भेटीचा योग काही येईना. आता मात्र व्हाट्स अँपच्या कृपेने संपर्कात असणाऱ्या आम्ही ठरवून एकत्र जमलोच . आमची घरे अगदी लागूनच त्यात इतके वर्षांचा घरोबा..एक मोकळं कौटुंबिक वातावरण झालं आहे. कुणाच्याही घरी कधीही जावं नी तयार पदार्थ अगदी शिळ्या पोळीचा फोडणीचा कुचकरा सुद्धा मस्त चापावा.. "बस ग !" म्हटलं की जेवायला बसावं इतका अनौपचारिक मोकळेपणा माणसांत होता. दुपारच्या वेळी उन्हे चटचटू लागली अन् आमची बैठक बसली... एव्हाना आमची अजून मर्कट सदृश्य अवस्थेतील कार्टी दंगा करून , दमून गार कुलरपुढे आडवी झाली होती... जरा मोठे कुमारवयीन वारसदार मोबाइलमध्ये डोके खुपसून बसले होते... मस्त निवांत वेळ एकीकडे गप्पा आणि एकीकडे पत्त्यांमधील बदाम सातचा डाव रंगात आला होता... जिचे जास्त पॉईंट तिला संध्याकाळी कुल्फीची ट्रीट द्यावी लागणार म्हणून सगळ्या चुरशीने खेळत होत्या.
                       एकीच्या आईने मस्त गारेगार वाळ्याचे पन्हे दिले... तर दुसरीची आई मस्त फतकल मारून शेजारी बसत कांदा टोमॅटो चिरु लागली... कुणाच्या तरी आईने शेव आणली तर कुणाच्या आईने कैऱ्या... अशी आमच्या सोबत आमच्या आई लोकांची मैफिल रंगली..

"आता जरा थांबून भेळ खाऊन घ्या ग पोरींनो!" 

म्हणत फर्मान सुटला तसे या ही वयात आम्ही कसे आईला घाबरतो असा अभिनय करत आम्ही खेळ बाजूला केला... एव्हढ्यात दारावर हाक ऐकू आली..

"माय वं ! पुरनपोळी वाढ वो !"

जरा लक्षपूर्वक शांत होण्याचा इशारा करत आम्ही ऐकू लागलो. पुन्हा हाक आली...

"पुरनपोळी वाढ वो माय!"

" काय ग बाई , भलतेच फॉरवर्ड भिकारी आहेत गावाकडले..? डायरेक्ट पुरणपोळीच मागताहेत..."
एक म्हणाली... आणि आम्ही अक्षरशः खदाखदा हसत सुटलो..घुडघ्यांवर हाताने जोर देत , कांदा चिरणाऱ्या काकू उठल्या , तिथूनच जोरात..

"चंदे! मेले कुठे उलथली होतीस. साजूक तुपातला शिरा लावून ठेवला होता तुझ्यासाठी"

तेव्हढ्यात दुसऱ्या काकू दार उघडत म्हणाल्या, 
"चंदे ! तू तर पौर्णिमेचाच चंद्र झालीस...लोणचं ठेवा काढून सांगून जे गेलीस ते आज उगवलीस."

हे चंदा प्रकरण काय आहे म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहू लागलो. चंदा...दारातून तरातरा आत येत असता आम्हाला पाहून दाराशीच थबकली.

"पाहुणे नव्हे ग पोरी आल्यात माहेरपणाला"

एका काकूंनी सांगताच चंदा चटकन आत आली . कोपऱ्यात अंग चोरून बसून घेत आम्हाला टकामका पाहू लागली. आमच्याच वयाची असेल चंदा... जरा लहानच असेल. ऊसाच्या चिपाडागत देह, काम करून रापलेलं अंग, त्यात मूळचाच अमावस्येच्या चंद्राचा रंग.... डोळे मात्र पाणीदार टपोरे आणि धारदार नाक. आम्ही कोण ?कोणाच्या मुली आहोत ,कुठल्या गावांना असतो अशी ओळख परेड झाली... अन् चंदा आमच्याकडे पाहून मोकळं हसली... तसे तिचे पांढरेशुभ्र मोत्यांसारखे दात लकाकून गेले.

"माय ! लक्षुम्याच आल्या घरला."

म्हणत चंदाने लोटांगण घातले... आम्हाला हसू आवरत नव्हते. काकूंनी भेळेच्या प्लेट भरल्या पहिली ताटली चंदा पुढे ठेवत... "किती दिवस उपाशी?? " असे खुणेनेच विचारले... चंदाने 3 बोटे नाचवीत खुणेनेच सांगितले. लगेच एका काकूंनी 2/3 पोळ्या भाजीही आणून ठेवली... चंदा आमच्या सोबत चवीने खाऊ लागली. एक पोळी खाऊन झाली तशी उरलेल्या पदरात गुंडाळू लागली तसे आईने दटावले...

"चंदे पोटातल्या जीवाचा तरी विचार कर... घरी न्यायला देईन मी तुला चार."

चंदाला पाचवा महिना लागला होता... ही तिची सातवी खेप... पैकी 3 पोरं जिवंत होती. पोटात अन्न जाताच भूक शांत झाली तशी चंदा मजेत गप्पा मारू लागली..

"हे आंबट गोड लै भारी काय म्हणत्यात याले??"

" याला भेळ म्हणतात ...अजिब्बात नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते" म्हणून काकूंनी दटावलं .... त्यांच्याच सुरात सूर मिसळत आई म्हणाली 

"नाही तर काय? केव्हढ्या हसल्या तुझ्या पुरणपोळीला पोरी.. एकदा  कधीतरी होळीच्या दुसऱ्या दिवशी हिला पुरणपोळी दिली... तेव्हापासून पुरणपोळीच मागते ... वेडी कुठली !"

सगळ्या हसल्या तशी चंदाही खळखळून हसली. मग पुरणपोळी मागताना किती भारी वाटतं हे चंदा रंगवून सांगू लागली . मग तिच्या आणि आमच्या आई गँगच्या गप्पा रंगल्या. आईच्या कॉटनच्या मऊसूत जुन्या साड्या तिने बाळासाठी राखून ठेवायला सांगितल्या... कुणाकुणाला शोपा, ओवा, मेथ्या असे गरजेचे सामान वाटूनच दिले. आमच्या आयाही मान डोलावत खुशीने होकार देत होत्या. उन्हे कलली तशी चंदा उठली... भराभर अंगण झाडून काढू लागली .  झाडांना आळी केली पाणी घातले... वाळलेल्या पानांचा कचरा वेचून फेकला. "येते वो माय! " म्हणत पोळ्या घेत झपाझपा निघून गेली.
                     आमच्या गावच्या वस्तीपासून जरा लांब मोकळे मैदान होते . तेथील हापशीला (Hand pump) भरपूर पाणी असायचे.. त्याच्या शेजारी पाल ठोकून (तात्पुरत्या कपड्यांच्या झोपड्या) भटक्या जमातींचे लोक बरेचदा राहायला येत... कधी लमाण, कधी पाथरवट तर कधी पारधी. चंदा पाथरवट होती.... तिच्या कबिल्यात 6 कुटुंबे ,4 गाढव, 2 खेचर नि एक घोडा होता........ माणसे अगणित असावी. सहा महिने वर्षभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे लोक मुक्काम हलवीत असत... मात्र गेली 2 वर्षे चंदाचा कबिला गावातच मुक्काम ठोकून होता . माणसांना वीटभट्टीवर काम मिळत होते. शिवाय मजुरी भरपूर म्हणजे दारूचे पैसेही सुटत होते. एकदा पाटा-वरवंटा विकायला म्हणून आलेली चंदा.. आमच्या आई गँगची लाडकी बनली. चंदा सुरेख दगडी खल बत्ते बनवायची... आम्ही आलो तसे टाकवलेले पाटे घेऊन आली नी घ्या म्हणून आग्रह करू लागली. आमच्या फ्लॅट मध्ये कुठे ठेवणार म्हणून आम्ही नकार देऊ लागलो. आमची जागा लहान आहे एव्हढे तिला बरोबर कळले . दुसऱ्याच दिवशी तळहाता एव्हढे इवले पाटे-वरवंटे आणि वाटीएव्हढे दगडी खल बत्ते घेऊन चंदा हजर.. काय सुरेख कलाकृती होती ती! आम्ही अगदी अँटिक शो पीस म्हणून ठेऊन घ्यायचे ठरवले... "पैसे किती देऊ?" असे विचारले तर चंदा आपले शुभ्र दात चमकवीत म्हणाली...

" पैका नग माले .माजी आठवन म्हनून ठिऊन घ्या ."

आतून आई गँग बाहेर आली नि तिला दटावू लागली,

"ते काही नाही. चंदे ! ..पैसे घे सगळ्यांकडून... सगळ्या मोठ्या घरच्या राण्या आहेत चांगल्या...100₹ कमीत कमी होतातच प्रत्येकीचे"

"काय माय? भयनी हायेती माज्या.. पैका नग"

अखेर चंदा पैसे न घेताच गेली... आम्ही अवाक होऊन पाहत राहिलो. चंदा सगळ्यांना जीव लावायची..आमच्या चार आठ दिवसांच्या मुक्कामात आम्हालाही 'चंदा' आपलीशी वाटू लागली.. गावात अजूनही सारे दारावर विकायला येते. ऊसाचा रस, बोरे, डाळ फुटाणे, मुरमुरे... आम्हा मैत्रिणींचे टोळके कुणाकडे तरी एकत्रच असायचो... मग एखादीची आई कुणातरी विक्रेत्याला थांबावे नि सगळ्यांना काहीतरी खायला प्यायला घेतले जाई. वरच्या मजल्यावरून हाक मारली की चंदा हजर होई... तिलाच आधी खाऊ देऊन मग आमचा नंबर लागे.. ती चांगलीच गपिष्ट होती.. आम्हाला तोंडी लावणेच मिळाले जणू.
                   चंदाचे जग आम्ही पाहिलेल्या गुलाबी सुरक्षित जगाहून फारच निराळे होते. ती जन्मली अन आई गेली... रागाने बापाने तिला एका तांडे वाल्याला विकून टाकली... तांडेवाला भला माणूस होता.. तिला पोटभर जेवू घालायचा.. मारझोड करत नसे... पोटभर जेवण आणि मारझोड नाही ,हे चांगुलपणाचे दाखले आमच्या शब्दकोशात नव्हतेच. हे तर आमचे माणूस म्हणून मूलभूत अधिकार होते. चंदा 8 वर्षांची असतांना तो भला माणूसही गेला... त्याच्या बायकोने चंदाला दुसऱ्या एका माणसाला विकले... तो ही माणूस भला होता . त्यांच्या जमातीत पोरींना भरपूर हुंडा देऊन लग्न होत.. त्याने आपल्या पोराशी चंदाचे लग्न लावून दिले. चंदा 9 वर्षांची आणि मुलगा 27 वर्षांचा... त्याने एखाद्या कोठेवालीला विकले नाही... भला माणूस म्हणायचे. 12व्या वर्षी चंदा वयात आल्यापासून सातव्यांदा गर्भवती होती... तिच्या जिवंत राहिलेल्या तीन मुलांची नावेही मोठी गंमतीदार होती...सचिन, राहुल आणि युवराज...
आम्ही तिला गंमतीने म्हणालो,

"चंदा! सगळी क्रिकेटर्स ची नावं आहेत. क्रिकेट टीम पुरी करणार तू एकूण 11 पोरं."

"बाबू जित्ता हाय तवर पोरं हुतील."

चंदा सहज म्हणाली... बाबू तिचा नवरा.  अधून मधून पोलीस पालावर येत आणि चोर म्हणून बाबूला पकडून नेत... हा त्यांचा जीवनातील अविभाज्य आणि सवयीचा भाग होता. आमचे डोळे विस्फारले... मग चंदाची मुलाखत सुरू झाली.

"बाई ग ...तुला भीती नाही वाटत."

"न्हाय बा! भ्याच कशाले? हथला पोलीस साहेब भला मानूस हाये."
आम्ही कपाळावर हात मारून घेतले...

"भला म्हणजे कसा ग?" एकीने चटोर प्रश्न केलाच.

"म्हंजे बाबूला मारत न्हाई. माले घरकाम दितो.. नजर वाईट ठिवत न्हाई."
बराच भला माणूस होता म्हणायचे... तिच्या अब्रूला हात घालत नाही तर काही दिवस घरची धुणीभांडी करून घेतो म्हणायचे... असा न तसा देहाचा वापर..

"तुझा बाबू चोऱ्या का करतो पण?"

"न्हाई बा! बाबू कंदीच चोरी करत न्हाई... म्या तरी करन पन त्यो न्हाई"

आमची उत्सुकता थंडगार झाली होती... म्हणजे बाबू पालं वाला घर नसलेला... म्हणून त्याला वाट्टेल तेव्हा धरून न्यायचे, त्याला सोडवण्याच्या बदल्यात त्याच्या बायकोकडून राबून घ्यायचे... भयंकर! सगळे कल्पनातीत होते. न्याय हा शब्द आहे केवळ..... वास्तव नाहीच,असे वाटू लागले

"तू चोरी करतेस चंदा?"

खळखळून हसत चंदा म्हणाली,

"एकदा पाव चोरले म्या दुकानातून. लैच भूक धरवना.
एकदा कापडं बी चोरल्यात... अंग झाकाले. का करावं??"

आम्ही गपगार.. चंदा पुढे म्हणाली...

"पन आता सोल्ड ....माय म्हंते चोरी पाप हाये ...करू नको ग बाय माझे?" 

चंदा आमच्या आई गँगचे सारे ऐकायची... सगळ्यांनाच 'माय' म्हणायची. आमच्या आई आणि तिचं नातंच जगावेगळं होतं..... विलक्षण होतं. उभयतांना एकमेकांचे दुःख चेहरा पाहून कळायचे. एव्हढ्यात कलिंगडाच्या कापा आल्या अन् आम्ही सगळे तुटून पडलो.
                   आम्हा सगळ्यांची माहेरची घरे प्रशस्त बैठी मागे पुढे भरपूर अंगण असणारी. त्यात हौसेने झाडे लावलेली.... आमच्यापैकी केवळ दोघींनाच भाऊ तेही हैद्राबाद आणि बंगलोरला सेटल झालेले.. मोकळ्या हवेची आणि ऐसपैस वागण्याची सवय असणाऱ्या आमच्या पालकांचे शहरात मन रमत नसे. गड्या आपला गाव बरा! म्हणत गावीच राहिलेल्या ह्या वयस्कर लोकांचे आयुष्य मोठे नीरस ,एकसुरी. पिल्ले उडून गेलेल्या पक्ष्यांसारखे..... आई गँगचेही आता वय झालेले, शरीर थकत जाणारे. झाड लोट, उचल दडप आता होईनाशी झालेली... चंदा कायम त्यांच्या हाताशी असायची. अंगण झाड, झाडांना पाणी घाला,पडदे उतरवून धुवून दे,गव्हाला ऊन दाखव.. असली अवजड कामे ती सहज करायची... नवल हे की एक पै चाही मोबदला न घेता. कुणाच्या जड पिशव्या उचलून आण, कुणाच्या मुरगळलेल्या पायाला तेल चोळून दे, कुणाच्या लोणच्याला कैऱ्या आंबे फोडणीने फोडून दे... असली कामे ती अत्यंत आनंदाने करायची. ती सगळ्यांना माय म्हणायची आणि माय मानायचीही. कोणत्याही कामाचा चंदा मोबदला घेत नसे, तिला तो नकोच होतो.   
                         चंदा भिकारी नव्हती, चोर तर त्याहून नव्हती. ती उपाशी होती... तिची भूक मायेची होती, प्रेमाच्या दोन शब्दांची होती . आयुष्यभर पोरक्याने जगलेल्या त्या जीवाला आईची माया हवी होती... ती तिला आमच्या आईंकडून भरभरून मिळत होती.... पुरणपोळीच्या पोटात दडलेल्या पुरणासारखी. 'पुरण' भारीच कौशल्याचा पदार्थ... भल्याभल्या सुगरणींची परीक्षा घेणारा .. वरवर मऊसूत माया आतून खमंगपणा राखून असणारा....दुसऱ्याच भांड्यात खमंग शिजलेले, गोड पुरण .....पोळी पोटात घेते तेव्हा ती बनते 'पुरणपोळी'... त्या मायेची सर कशालाच नाही.पोटच्या पोरीवर अन् जन्मदात्या आईवर कुणीही माया करेल मात्र ना नात्याच्या, ना जातीच्या, ना आर्थिक वर्गाच्या... दुसऱ्याच्या पोरीला पोटाशी धरून माया करणे... सोपे नाही.फार मोठं मन लागतं त्याला. अगदी पुरणपोळी सारखं दुसऱ्याला सामावून घेता यायला हवं, आपलंसं करता यायला हवं... ते आमच्या आई गँगला किती सहज जमले होते.
एव्हढ्यात नेहमीची कासारीण दारी आली...

"बांगडया भरून घ्या ग पोरींनो!" 
आईने आवाज दिला... तशी आम्ही अंगणात रिंगण घालून बसलो...  

"चंदे! कुठे निघालीस ? बैस हो ... तू काय परकी आहेस. हिलाही बांगड्या निवडा ग .. "

एकीची आई म्हणाली, तसा खाली मान घालून गुपचूप निघून जाणाऱ्या चंदाचा चेहरा उजळला.. तिनेही बसून घेतलं... आमच्या आई गँग मधील प्रत्येकीपुढे आपले हात नाचवत अत्यंत आनंदाने आपल्या बांगड्या ती दाखवू लागली.. प्रत्येकीच्या आईने हाताचा मोर करून छान आहे म्हटले की तिला भारी आनंद वाटायचा.
सगळ्यांपुढे चहाचे कप धरत आई म्हणाली,

"उद्या सगळ्या सकाळी माझ्याकडे जेवायला या ग!"
आम्ही आळीपाळीने एकमेकींकडे जाऊन खादाडी करीत असू...आम्ही माना डोलावल्या.

"काय बेत करू सांगा बाई काही सुचत नाहीये."

 "पुरनपोळी कर वो माय!"
आम्ही चंदाच्या थाटात एकसुरात उत्तरलो.

"चहाटळ ! कुठल्या.." म्हणत आम्ही आणि आई गँग हसत सुटलो... चंदाही आपले शुभ्र दात झळकवत हसत होती..एकीकडे डोळ्यांत वाहणारे अखंड पाणीही पुसत होती

©🔏 यशश्री रहाळकर