फॉलोअर

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

रस्ता

                     शहरांत माणसांच्या खरंतर दोनच जाती  अस्तित्वात आहेत एक श्रीमंत आणि दुसरी गरीब.... या दोन्ही वर्गांची एकत्र गाठ पडते ती रस्त्यावर. शहरात राहणाऱ्या माणसांचे निम्म्याच्यावर आयुष्य जाते ते ह्याच रस्त्यावर. अजगरासारखे लांबच लांब शहरभर पसरलेले हे रस्ते कित्येकांना स्वप्नांच्या वाटेने घेऊन जातात, कित्येकांना रोजी रोटी साठी मार्ग दाखवतात ....अचानकपणे कधीतरी हे रस्त्यांचे अजगर आपला जबडा उघडतात आणि ह्या अजगरांच्या तोंडात सापडून होत्याचं नव्हतं होतं . हा अजगर मग श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता माणसं गिळत जातो . बळी रस्ता नव्हे तर अपघात घेतात... आणि अपघात मानवी चुकांमुळे घडतात हे जरी खरे तरी ते घडतात ते ह्या रस्त्यांवर. रस्ता काळ बनत किड्या मुंग्यांसारखे माणसं चिरडत जातो, त्या माणसांना जात नसते, धर्म नसतो... माणूस म्हणावा असंही अस्तित्व उरत नाही मग उरतो तो रक्ता-मांसाचा चिखल....पण फारसा फरक कुणालाच पडत नाही . रस्त्याचा अजगर माणूस गिळून सुस्तावतो .. रस्ता अखंड आपल्याच वेगात सुरू राहतो.
                         काल मध्यरात्रीही अश्याच एका रस्त्याच्या आंधळ्या वळणावरचा अजगर जागा झाला.... एका कोवळ्या पोराचा घास घेऊन त्याची भूक शांत झाली की नाही कोण जाणे?....दुसरा पोर मरणाच्या दारात उभा होता. गज्या बेरड वय 16 वर्षे...जागीच ठार झाला... तर रणजीत मेहता वय 17 वर्षे मृत्यूशी झुंज देत होता.... रणजित वाचायलाच हवा होता . तो मेहता बिल्डरचा एकुलता एक लेक होता... त्यांच्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस होता आणि कांतीलाल मेहतांचा जगण्याचा एकमेव आधार होता. पत्नीच्या मृत्यूपश्चात दुसरं हृदय सांभाळावे इतक्या प्रेमानं त्यांनी तो वाढवला होता.... शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फॉरेनच्या निष्णात डॉक्टरांचा ताफाच कांतीलाल मेहतांनी दिमतीला ठेवला होता. रस्त्यावर नेमकं काय झालंय?? ह्याने कांतीलाल मेहतांना अजिबात फरक पडत नव्हता . मागच्याच महिन्यात रणजीतच्या 17 व्या वाढदिवसाला त्यांनी अत्यंत महागडी मर्सिडीज घेतली होती... त्याच कोट्यावधींच्या कारचा या अपघातात चुराडा झाला होता.... रणजीतच्या शरीरात अनेक प्रकारच्या नशेचे ट्रेसेस एकत्रित सापडले होते.. तसा तो बरेचदा हाय प्रोफाइल पार्टीज ना जायचाच... हे सगळं एन्जॉय तो नाही करणार तर कोण करणार?? एक माणूस चिरडून गेला होता त्याच्या गाडीखाली ..मीडियाने मुलाचे वय आणि नशेत गाडी चालवणे सारे उचलून धरले. कांतीलाल मेहतांना ह्या साऱ्यांमुळे काहीही फरक पडला नाही, पडणार नव्हताच. त्यांच्यासाठी रणजीत वाचणे गरजेचे होते, नंतर साऱ्यांची तोंडे कशी बंद करायची हेही त्यांना पुरते माहीत होते. "रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या त्या मेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या तोंडावर काही नोटा फेकून मारायला हव्यात", त्यांनी मनाशी ठरवले...पैश्याने सगळे विकत घेता येते... मीडिया, पोलीस, न्याय....फक्त रणजीत वाचायला हवा ....वाचायलाच हवा.
                    गज्या बेरड त्याच्या आईचा आधार होता. पाच वर्षांपूर्वी विषारी दारू पिऊन त्याचा बाप मेला... तेव्हापासून गजाने कुटुंब सावरले.. सांभाळले होते.रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे हे कुटुंब... गज्याचा आईवर भारी जीव होता.मिळेल ते काम तो करायचा. सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुसून दे, बूट पॉलिश, गजरे विक,फुलमाळा विक... एक ना अनेक उद्योग करून तो आपले व भावंडांचे पोट भरायचा.त्या रात्री फुलांच्या माळा करत फुटपाथवर बसलेल्या गज्याला एक गाडी त्याच्या दिशेने वेडीवाकडी येतांना दिसली... काही कळायच्या आत तो गाडीखाली चिरडला गेला. गज्याच्या आईने टाहो फोडला... मग पोलिसांचा ससेमिरा पाठी लागला. त्यात न्युज चॅनल वाल्यांनी गज्याच्या आईवरचा अन्याय भडक चित्रित केला. काही सोशल वर्कर्सने गज्याच्या जीवाचे किती पैसे मागायचे हेही सांगितले...मात्र यासाऱ्या साठी तो रणजीत मेहता वाचायलाच हवा होता.... त्याच्यासाठी प्रार्थना करा असेही काही शहाण्यांनी गज्याच्या आईला सुनावले.कुणालाही ह्या तीन दिवसांत गज्याच्या कुटुंबाला पोटाला अन्न द्यावे वाटले नाही.... जगाचा व्यवहार सरत नाही,पोटाची खळगी भरत नाही.. गज्या तर परत येणार नव्हता पण बाकीच्या पोरांना भूक लागली होती.. त्यांना जगवायचे होते.गज्याची आई सारं बाजूला सारून उभी राहिली... चेहऱ्याला रंग फासून... गिऱ्हाईकांची वाट बघत त्याच रस्त्याच्या कडेला उभी राहिली... आज पहिल्यांदा ती पोरांच्या भुकेसाठी देहाचा सौदा करणार होती...देह नश्वर असतो हे तिला ह्याच तर रस्त्याने शिकवले होते.
©🔏 यशश्री                     शहरांत माणसांच्या खरंतर दोनच जाती  अस्तित्वात आहेत एक श्रीमंत आणि दुसरी गरीब.... या दोन्ही वर्गांची एकत्र गाठ पडते ती रस्त्यावर. शहरात राहणाऱ्या माणसांचे निम्म्याच्यावर आयुष्य जाते ते ह्याच रस्त्यावर. अजगरासारखे लांबच लांब शहरभर पसरलेले हे रस्ते कित्येकांना स्वप्नांच्या वाटेने घेऊन जातात, कित्येकांना रोजी रोटी साठी मार्ग दाखवतात ....अचानकपणे कधीतरी हे रस्त्यांचे अजगर आपला जबडा उघडतात आणि ह्या अजगरांच्या तोंडात सापडून होत्याचं नव्हतं होतं . हा अजगर मग श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता माणसं गिळत जातो . बळी रस्ता नव्हे तर अपघात घेतात... आणि अपघात मानवी चुकांमुळे घडतात हे जरी खरे तरी ते घडतात ते ह्या रस्त्यांवर. रस्ता काळ बनत किड्या मुंग्यांसारखे माणसं चिरडत जातो, त्या माणसांना जात नसते, धर्म नसतो... माणूस म्हणावा असंही अस्तित्व उरत नाही मग उरतो तो रक्ता-मांसाचा चिखल....पण फारसा फरक कुणालाच पडत नाही . रस्त्याचा अजगर माणूस गिळून सुस्तावतो .. रस्ता अखंड आपल्याच वेगात सुरू राहतो.
                         काल मध्यरात्रीही अश्याच एका रस्त्याच्या आंधळ्या वळणावरचा अजगर जागा झाला.... एका कोवळ्या पोराचा घास घेऊन त्याची भूक शांत झाली की नाही कोण जाणे?....दुसरा पोर मरणाच्या दारात उभा होता. गज्या बेरड वय 16 वर्षे...जागीच ठार झाला... तर रणजीत मेहता वय 17 वर्षे मृत्यूशी झुंज देत होता.... रणजित वाचायलाच हवा होता . तो मेहता बिल्डरचा एकुलता एक लेक होता... त्यांच्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस होता आणि कांतीलाल मेहतांचा जगण्याचा एकमेव आधार होता. पत्नीच्या मृत्यूपश्चात दुसरं हृदय सांभाळावे इतक्या प्रेमानं त्यांनी तो वाढवला होता.... शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फॉरेनच्या निष्णात डॉक्टरांचा ताफाच कांतीलाल मेहतांनी दिमतीला ठेवला होता. रस्त्यावर नेमकं काय झालंय?? ह्याने कांतीलाल मेहतांना अजिबात फरक पडत नव्हता . मागच्याच महिन्यात रणजीतच्या 17 व्या वाढदिवसाला त्यांनी अत्यंत महागडी मर्सिडीज घेतली होती... त्याच कोट्यावधींच्या कारचा या अपघातात चुराडा झाला होता.... रणजीतच्या शरीरात अनेक प्रकारच्या नशेचे ट्रेसेस एकत्रित सापडले होते.. तसा तो बरेचदा हाय प्रोफाइल पार्टीज ना जायचाच... हे सगळं एन्जॉय तो नाही करणार तर कोण करणार?? एक माणूस चिरडून गेला होता त्याच्या गाडीखाली ..मीडियाने मुलाचे वय आणि नशेत गाडी चालवणे सारे उचलून धरले. कांतीलाल मेहतांना ह्या साऱ्यांमुळे काहीही फरक पडला नाही, पडणार नव्हताच. त्यांच्यासाठी रणजीत वाचणे गरजेचे होते, नंतर साऱ्यांची तोंडे कशी बंद करायची हेही त्यांना पुरते माहीत होते. "रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या त्या मेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या तोंडावर काही नोटा फेकून मारायला हव्यात", त्यांनी मनाशी ठरवले...पैश्याने सगळे विकत घेता येते... मीडिया, पोलीस, न्याय....फक्त रणजीत वाचायला हवा ....वाचायलाच हवा.
                    गज्या बेरड त्याच्या आईचा आधार होता. पाच वर्षांपूर्वी विषारी दारू पिऊन त्याचा बाप मेला... तेव्हापासून गजाने कुटुंब सावरले.. सांभाळले होते.रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे हे कुटुंब... गज्याचा आईवर भारी जीव होता.मिळेल ते काम तो करायचा. सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुसून दे, बूट पॉलिश, गजरे विक,फुलमाळा विक... एक ना अनेक उद्योग करून तो आपले व भावंडांचे पोट भरायचा.त्या रात्री फुलांच्या माळा करत फुटपाथवर बसलेल्या गज्याला एक गाडी त्याच्या दिशेने वेडीवाकडी येतांना दिसली... काही कळायच्या आत तो गाडीखाली चिरडला गेला. गज्याच्या आईने टाहो फोडला... मग पोलिसांचा ससेमिरा पाठी लागला. त्यात न्युज चॅनल वाल्यांनी गज्याच्या आईवरचा अन्याय भडक चित्रित केला. काही सोशल वर्कर्सने गज्याच्या जीवाचे किती पैसे मागायचे हेही सांगितले...मात्र यासाऱ्या साठी तो रणजीत मेहता वाचायलाच हवा होता.... त्याच्यासाठी प्रार्थना करा असेही काही शहाण्यांनी गज्याच्या आईला सुनावले.कुणालाही ह्या तीन दिवसांत गज्याच्या कुटुंबाला पोटाला अन्न द्यावे वाटले नाही.... जगाचा व्यवहार सरत नाही,पोटाची खळगी भरत नाही.. गज्या तर परत येणार नव्हता पण बाकीच्या पोरांना भूक लागली होती.. त्यांना जगवायचे होते.गज्याची आई सारं बाजूला सारून उभी राहिली... चेहऱ्याला रंग फासून... गिऱ्हाईकांची वाट बघत त्याच रस्त्याच्या कडेला उभी राहिली... आज पहिल्यांदा ती पोरांच्या भुकेसाठी देहाचा सौदा करणार होती...देह नश्वर असतो हे तिला ह्याच तर रस्त्याने शिकवले होते.
©🔏 यशश्री रहाळकर

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

तुलना

                                  थोरली सुट्ट्यांमध्ये धाकटीकडे जाऊन आली रे आली की तिचं काहीतरी बिनसतं... हे एव्हाना विठाबाईंच्या चांगलंच ध्यानात आलं होतं.तसं पाहायला गेलं तर थोरली प्रेमळ होती, माणसं जोडून ठेवायची, कामाला वाघ होती,घर वावर आला गेला पैपाहुणा सारं निगुतीने करायची... थोरलीकडे पाहून  गावात तर सगळे विठाबाईंनी नशीब काढलं म्हणत. तशी थोरली उगा मत्सर करत जुळकुकडेपणा करणारी नव्हती... त्यात धाकटी तर तिची सख्खी मावस बहीण, लै जीव होता थोरलीचा तिच्यावर...मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांना घेऊन चार दिवस धाकटीकडे राहून परतली की थोरली दुःखी असायची, चिडचिड धुसफूस करायची. एरव्ही सहजतेने जी कामे ती करीत असे त्यांचाच तिला त्रास होई.. मग कटू बोलणं, पोरांना धपाटे घालणं हे सुरू राही.
                         विठाबाईंना दोन लेक.. नवरा तरुणपणीच वारल्यावर शेतात राबून विठाबाईंनी त्यांना लहानाचे मोठे केले.थोरला प्राथमिक शिक्षक बनून गावीच राहिला. शेती , नोकरी, घर सारं उत्तम राखून होता.त्याची बायको उज्वला त्यांची लाडकी सून ... दोघे मोठ्या प्रेमानं विठाबाईंचा सांभाळ करत. अकरा वर्षांच्या त्यांच्या संसारात सुखाचं सुख विठाबाईंनी अनुभवलं. दहा वर्षांचा नातू अन आठ वर्षांची नात... विठाबाईंच्या मायेच्या दुधावरली साय होती. याउलट धाकटा लेक जरासा स्वार्थीच होता. शिकून शहरात गेला तो तिकडचाच झाला... त्याची बायको श्यामला....श्यामला बरी होती म्हणजे जे काय चार दिवस सणावाराला यायची तेव्हा बरी वागायची.दोघेही शहरात नोकरी करतात.. सहा वर्षे झाली अजून मुलबाळ नकोच म्हणतात... त्यांना सेटल का काय ते व्हायचंय म्हणे! हे सेटल म्हंजे काय असते ते सत्तरीच्या विठाबाईंना अजून कळले नाही. धाकटा गेल्याच महिन्यात त्याच्या वाट्याची जमीन विकणार म्हणाला... त्याला शहरात घर घ्यायचं म्हणून इरेला पेटला.... हेच ते सेटल होणं असावं बहुदा.. ," बापजाद्याची जिमीन इकुन खानं.." विठाबाई मनाशीच म्हणाल्या.थोरली उज्वला नातवाचा अभ्यास घेतांना त्याला सांगत होती, " काकासारखा हुशार हो बाबा! शहरात जा अन सुखात रहा.. माझ्यासारखे तुझ्या बायकोचे हाल नको व्हायला." थोरलीला खडसावून तुझे हाल कसले होताहेत ग? विचारावे असे तीव्रतेने विठाबाईंच्या मनांत आले पण विषय कश्याला वाढवा म्हणून त्या ,"पांडुरंग! पांडुरंग!" म्हणत उठल्या अन मंदिराच्या दिशेने रवाना झाल्या.
                     उज्वला खरेच खूप खूप सुखात होती. तिच्या सरळमार्गी नवऱ्याचं तिच्यावर नितांत प्रेम होतं.मोठं चौसोपी घर होतं, दोन हुशार गोजिरवाणे लेकरं होते,शेतीतून उत्तम पीकपाणी येत होतं, नवऱ्याला शाळेतील गुरुजी म्हणून गावातले सगळे मान देत होते... सासुरवास नावाला नव्हताच उलट आईची माया मिळायची.आपले दोन्ही पोरं सासूच्याच आधाराने कसे मोठे झाले कळलंही नाही ह्याची जाणीव उज्वलला होती.अंगावर चार ठसठशीत दागिने होते... यंदाही कपाशीतून चांगले पैसे हाती आले की नवरा तिला पाटल्या करणार होता. घरचं दूध दुभतं होतं, गडिमाणस होती, घरचाच भाजीपाला, धान्य , मोकळी शुद्ध हवा... ह्या साऱ्यांमुळे लाभलेलं उत्तम आरोग्य.ह्यापेक्षा निराळं काय हवं होतं तिला??धाकटी जाऊ श्यामला तिच्या मावशीची लेक... श्यामलावर मोठ्या बहिणीची माया होती तिची. तिला डाळीसाळी, धान्य उज्वला निवडून पाठवे, गाईम्हशींचा खरवस,लोणची पापड आवर्जून घेऊन जाई. दिवाळीच्या सणाला श्यामला गावी येई... चार दिवस आनंदात जात. उन्हाळ्यात उज्वला पोरांना तिच्याकडे सुट्ट्यांना घेऊन जाई... तिथून परतली की मात्र उज्वला दुःखी असायची.
                उज्वलाचं दुःख काही असण्या-नसण्याचं नव्हतंच मुळी... दुःख होतं तुलनेचं.शहरातल्या वरवरच्या दिखाऊ सुखांना ती भुलली होती. शहरात सुट्टीसाठी चार दिवस जावेकडे राहिले की उज्वलाला सारी प्रलोभने भुरळ घालू लागत. नळ सोडला की घरात 24 तांस पाणी, राजाराणीचा गुलाबी इवलासा संसार, सारं कसं व्यवस्थित आवरलेलं.. किचन ट्रॉलीज ने झाकलेलं सुटसुटीत, धाकट्या दिरांचं बायकोशी गोड गोड बोलणं, तिची सारखी स्तुती करणं,श्यामलाच मोकळं राहणं कधी ड्रेस तर कधी बिनबाह्यांचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालणं, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन राखलेलं त्वचेचं गुलाबीपण... येणारा जाणारा नाही की पाहुण्यांचा त्रास नाही. शिवाय दर शनिवार रविवार  मॉल ला जाणं खरेदी करणं, पिच्चरला जाणं मग बाहेरच हॉटेलमध्ये जेवून येणं... हळूहळू हेच सुख आहे हे उज्वलाला वाटू लागलं...घरी परततांना ती नाखूष असे.. कल्पनेत ती स्वतःला श्यामला प्रमाणे सुंदर ड्रेस मध्ये नटवायची... लिपस्टिक लावून हिलच्या सॅंडल घालून नवऱ्याचा हात सगळ्यांसमोर हातात घेऊन फिरायला निघायची... मात्र गावी येताच ह्या स्वप्नावर वास्तवाचं विरजण पडे मग तिची चिडचिड होत असे.
                   एकदा धाकट्या दिराचा तातडीने येण्यासाठीचा फोन आला.. श्यामलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते.. मदतीला कुणीही नव्हते.. धाकटा दिर चांगलाच घाबरला होता. उज्वला आणि थोरला लगेच निघाले.. पोरांना विठाबाई सांभाळणार होत्या... जेवणाची सोय शेजारच्या घरी स्वतः हुन झाली... चार जण धावून आले आणि उज्वलाला काळजी करू नको निवांत जा सांगितले...हॉस्पिटलमध्ये पोहोचताच दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली... श्यामलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, थोडक्यात बचावली म्हणायचे. थोरल्याने गरजेला हवे म्हणून सोबत आणलेले पैसे आणि उज्वलाच्या 2 बांगड्या मोडून पोलीसांचे तोंड बंद केले... झाला प्रकार अपघात म्हणून नोंदवण्यात आला . धाकट्याची नोकरी वाचावी म्हणून सारे प्रयत्न झाले... श्यामलाला समजावून जबाब बदलण्यात आला...या साऱ्या धावपळीत आठवडा उलटला. अखेर श्यामलाला आरामाला म्हणून सोबत घेऊन दोघे गावी परतले. उज्वलाला कळत नव्हते नेमके श्यामलाला दुःख तरी काय आहे की तिने जीव द्यावा? ती वेळ मात्र हा प्रश्न विचारण्यास योग्य नव्हती.. जरा शांत झाली की पुढे विचारू असा विचार समंजस उज्वलानी केला.
                     विठाबाईंनी सासू म्हणून झाल्या प्रकारावर चकार शब्द काढला नाही..बहुदा न सांगता सारेच अनुभवाने ताडले होते त्यांनी . अधिक अजून अधिक चा हव्यास माणसाला बर्बाद करतो , खरे सुख उपभोगत नसून समाधानात आहे हे धडे पिकल्या केसांनी त्यांना केव्हाच शिकवले होते. चार दिवस मूर्ती सारख्या वावरणाऱ्या श्यामलाचा बांध फुटला.. थोरली जाऊ आणि बहीण असणाऱ्या उज्वलाकडे तिने आपले मन मोकळं केलं... तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत, तिचे डोळे पुसत उज्वला सारे ऐकू लागली... धाकटा दिर अत्यंत महत्वाकांक्षी होता...शहरांत हात जोडून दिमतीला उभी असणारी सारी सुखे त्याला ओरबाडून घ्यायची होती.. त्याच्या स्वप्नांमध्ये आडवे येणारे कुणीही त्याला नको होते... घर होईपर्यंत स्वतःचं मूल नकोच ह्या कारणाने आजवर तीन वेळा त्याने श्यामलाला गर्भपात करण्यास भाग पाडले होते..."ताई! माझे हात बाळाच्या स्पर्शासाठी शिवशिवतात हो!" म्हणत श्यामलाने टाहो फोडला. 
                     अनेकदा माहेरून लहानमोठ्या गरजांसाठी तिला पैसे आणावे लागत..घर घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून तिचे दागिने तर कधीच विकून झाले होते... ऑफिसमधल्या एका स्त्रीशी नवऱ्याचे अफेअर असल्याचेही तिला कळले होते.मात्र 18 ते19 तास एकत्र काम करणार म्हणजे असे कॉम्प्लिकेशन्स होणारच... हे पासिंग अफेअर आहे असे नवऱ्याने तिला समजावले.तिला तिचे कामही मनाविरुद्ध करावे लागत असे.. तेथील पुरुषांचे टोमणे, स्त्री देहावरील कॉमेंट ह्याची तिने सवय करून घेतली होती.. कारण नोकरी सोडणे नवऱ्याने कदापि मान्य केले नसते. मन मारून रोज रोज नीटनेटकं तयार होणं, प्रेझेंटेबल राहणं किती मनःस्ताप देणारं आहे ह्याची कुणी कल्पनाच करू शकणार नव्हतं..... ह्या साऱ्यात स्वार्थीपणाचा कळस गाठला नवऱ्यानं...गेल्या शनिवारी धाकटा तिला आपल्या बॉस कडच्या पार्टीत तिला घेऊन गेला... त्याच्या बॉसनी प्रमोशन आणि मोठ्या पगाराच्या बदल्यात श्यामला सोबत एक रात्र सहवास मागितला... श्यामलाने निक्षून नकार दिला ... नवऱ्याचा दबाब वाढत चालला होता... नवऱ्याचा तिने एव्हढं करावं म्हणून हरतर्हेचा दबाब तिने मोडून काढला.. पण एक दिवस नवरा घटस्फोटाची नोटीस घेऊन आला... श्यामला वाईट चारित्र्याची असल्याने तिला घटस्फोट देणार असे त्यात होते...नवरयाने सरळ दोन पर्याय ठेवले ...बॉसची ऑफर मान्य कर किंवा घराच्या बाहेर निघ...बाहेर पडूनही नवरा तिच्यावर चिखलफेक करणारच.. शेवटी तिला मरण जवळ करावेसे वाटले.श्यामला म्हणाली,"ताई तुला नेहमी वाटायचं ना मी किती मजेत आहे.. शहरांत कसे सुखाचं सुख आहे.. पण ही शहरे म्हणजे भावनांच्या थडग्यावर वसवलेल्या महत्वाकांक्षेच्या वस्त्या आहेत.. इथे सुख आहे पण ओरबाडून घेतलेलं... इथे आनंद आहे पण तो विकत घेतलेला... क्षणिक! ह्या मोहाच्या चक्रात अडकलेल्या माणसाची सुटका नाही बघ. घर घेतलं की अधिक मोठं घर हवं... गाडी घेतली की अजून महागडी गाडी हवी .. सगळा सतत हव्यास..." दोघी बहिणी एकमेकींच्या कुशीत शिरून रडू लागल्या... थोरल्या उज्वलाचे अश्रू उपरतीचे होते ...सच्चे होते.
©🔏यशश्री रहाळकर

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

तो एक राजपुत्र

                      आमच्या शाळेच्या सोशल मीडियाच्या ग्रुप वर एका गर्भवती मैत्रिणीला दुसरीने विचारले , "तुला मुलगा हवा की मुलगी?" तिनं चटकन मनातले खरेखुरेे ..... "मुलगा" हे  उत्तर दिले आणि सगळ्या जणी जणू तुटूनच पडल्या तिच्यावर. मुलगी किती छान असते... तीच कशी काळजी घेते मुले कशी विचारत नाहीत वगैरे... काही दिडशहाण्यांनी तर जणूकाही ती गर्भलिंग परीक्षाच करून आली आहे अश्या भाषेत तिला सुनावले. हीच मनोवृत्ती स्त्री भ्रूण हत्यांचे कारण असल्याचेही एक म्हणाली...मी थक्क होऊन तो सारा संवाद वाचत होते.गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलगी होणे भाग्याचे, मुलगीच खरा आधार.... अश्या आशयाचे ढोल वाजवले जाताहेत. खरंतर मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं हा निसर्गधर्म आहे ... मुलीच्या जन्माला प्रोत्साहन वगैरे योग्य आहेच म्हणून मुलाच्या जन्माची अपेक्षा नकोच हा विचारही चुकीचा नव्हे का?आज मी जरा विरुद्ध बाजूचे विचार मांडणार आहे.
                        गेल्या काही दिवसांत स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या भयंकर निर्घृण कृत्यांची आठवण सुद्धा अंगावर काटा आणणारी आहे...निर्भया पासून काल परवाच्या जळीत कांडा पर्यंत... सगळ्याच घटनांमध्ये कुमारवयीन आणि कमी वयाची मुले गुन्हेगार आहेत. या अनुषंगाने एक आई म्हणून एक गोष्ट नक्कीच जाणवली की आता मुलगे अश्या घरात जन्माला यावेच जिथे आई त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवू शकेल... ज्या घरातला पिता मुलाला स्त्री चा आदर करायला शिकवेल..,अर्थात स्वतः च्या वागणुकीतून 👍 अलक्ष्मी ने उन्मत्त झालेले, पैसेवाल्यांचे माजोरडे बैल वेसण घालून बांधू शकतील असे भाऊ असणे, असे मित्र असणे ही येत्या पिढीची तीव्र गरज आहे. नुसता पैश्याला वारस नको तर संस्कारांचा, सद्विचारांचा वारसा घेऊन जन्माला येणारा मुलगा हवा.आजवर मुलीच्या आईची जी जबाबदारी होती ती शंभर पटीने आता मुलाच्या आईच्या खांद्यावर आहे... निर्व्यसनी, सुजाण, स्त्रियांचा आदर करणाऱ्या घरांमध्ये मुलगा जन्माला यायला हवा.... ज्या घरांत विपरीत परिस्थिती आहे तेथील आईने तर त्या मुलाला आपल्या वरचा अन्याय अत्याचार पुन्हा होऊ नये म्हणून विशेष दखल दिली पाहिजे.
                       वरील काही किंवा तत्सम  घटनांमधील राक्षस सोडले ना तर मुलगा वाईट नसतो हो ! प्रत्येक बापाची लेक जशी राजकन्या असते ना तसा तोही एक राजपुत्र असतो...लाडाकोडात वाढलेला, करीयर , जबाबदारी ह्यांचे ओझे सतत डोक्यावर घेऊन जगणारा, सततच्या स्पर्धेत पिचून गेलेला.... जगभरातल्या आकर्षणाने भुलणारा... निसर्गधर्म म्हणून तिला असतात तश्या वयात येतांना अनेक अडचणी असणार त्यालाही. त्याने रडायचं नाही कारण तो कणखर व्हायला हवा.. बहिणींचा तो आधार त्याने सगळं सांभाळून घ्यायला हवं... सतत त्याला ,"आज तू विचारत नाहीस आम्हाला उद्या उतारवयात वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवशील" ह्या शब्दांत त्याला हिणवलं जातं. लग्नानंतर मुलीच्या अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचे ओझे ......आपण कित्ती कौतुक करतो त्यांचे👍 मुलाचे करतो कधी कौतुक??? तो तर जन्मजात जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊनच येतो. मोठं व्हायचं ... कुणीतरी मोठ्ठ माणूस व्हायचं, खूप पैसे कमवून आईवडिलांना सुखात ठेवायचं... हा ताण इवलासा असल्यापासून झेलणारा तो जीव किती घुसमटून जात असेल. प्रत्येक नात्यांकडून त्याच्यावर  येतात त्या अपेक्षा... आईवडील म्हातारे झाले की सांभाळायचे, बहीण सासरी गेली की तिचे सगळे नीट करायचे, धाकटा भाऊ असेल तर त्यालाही सांभाळून घ्यायचे.... त्यात दुसरे भावंड हुशार म्हणजे हा बेजबाबदार ठरणार.मुलेही आजकाल शिक्षणाच्या निमित्ताने दूरच्या गावांना किंवा परक्या देशांत जातात... तिथे जुळवून घेणं सासरी जाण्याइतकच अवघड आहे... जपान , चीन , आफ्रिका ह्या देशांमध्ये 2/3 महिन्यांच्या प्रोजेक्ट किंवा इंटर्नशीप साठी गेलेली 20/22 ववर्षांची मुले आईला फोन करून रडतात अक्षरशः... खाण्याचे प्रचंड हाल करून अर्धे होऊन परततात.त्यांचं हे शिक्षण नोकरीच्या निमित्ताने जाणं कधीकधी आयुष्यभराचं असतं... सासरी जाणंच नव्हे का एकप्रकारचं???
                         बरं ह्या सगळ्यांत 27 ते 30 वर्षे मित्रांसोबत चकाट्या पिटत स्वतंत्रपणे घालविल्या नंतर एक दिवस लग्न होऊन बायकोची जबाबदारी अंगावर पडते.स्त्री चा लग्नाआधी पिता तर लग्नानंतर नवरा कायदेशीर पालक असतो...आजवर मस्तमौला जगणाऱ्या त्याला अचानकपणे बंधनांत बांधले जाते. मुली आईवडिलांना सोडून सासरी जातात , जनरीतच आहे ती.. त्याची पूर्वतयारी मानसिक पातळीवर केल्या जाते... त्यांचे नवीन कुटुंबात सामावून जाणे, आईवडिलांना सोडून येणे ह्याचे खूप कौतुक होते... खचितच कौतुकास्पद आहेच ते👍 पण ह्याच वेळी त्याच्या आयुष्यातही आमूलाग्र बदल होत असतात... एक वेगळ्या स्वभावाची नवीन व्यक्ती आपली म्हणून सामावून घेणं सोपं नसतं.पुरुष म्हणून निसर्गानं देऊ केलेलं पुरुषत्व सिद्ध करण्याचे परफॉर्मन्स प्रेशर नक्कीच असते त्याच्यावर. त्यात नवीन पत्नीवर आपली छाप पाडायची, सासरी जरा सांभाळून टेचात राहायचं, त्यांनाही आपलं मानायचं ...त्यांचे वाढदिवस लग्न कार्य साजरे करायचे.... या साऱ्यात आई आणि पत्नी ह्या दोघींना सांभाळत त्यांचे मन जपायचे... अवघड .....तारेवरची कसरत आहे ही. मात्र ह्या साऱ्यांचा स्त्रियांना स्वतः चा उदोउदो करतांना विसरच पडतो.पुढे कधीतरी हाच अल्लड मुलगा ... एकदिवस बाबा होणार असल्याचे त्याला समजते. मुलीची आई होतांना तिच्या शरीरात निसर्ग सोयीने सारे बदल घडवत मातृत्व फुलवत असतो... मात्र मुलाचा बाप होतांना त्याच्यावर कोसळते ती नवीन जबाबदारी ..बाप म्हणून त्याला स्वतः ला घडवावं लागतं. आता आणिक एका इवल्या जीवाला सांभाळणं वाढवणं ....त्याला मोठं करत जातं.. सगळ्यांच्या शिक्षणाची, लग्नाची , भविष्याची तरतूद त्याला करायची असते... त्याचं डोकं अखंड हिशोब करणार कॅल्क्युलेटर बनत.... किती कविता आणि किती लेख त्याच्या ह्या ताणाची दखल घेतात??? आईपणाचा ताण खरेच मोठा पण बाप होतांना तो आपसूक असला तरी सहज सोप्पा मात्र नाहीच.
                          मुलगी म्हणजे नक्षत्र, देवाचं वरदान, पूर्वजन्मीचे पुण्य .....सारं मान्य पण मग मुलगा म्हणजे काय??? आपण आता ह्या प्रगत जाणिवांपर्यंत निश्चित पोहोचलो आहोत की मुलीचं काम/ क्षेत्र वेगळं आणि मुलांचं वेगळं असा भेद उरला नाहीये... आता घराघरांतून बाबा लोक झटपट होणारे पदार्थ करून आपले आणि घरच्यांचे पोट भरतात, बाहेर पडताच मुले बाबांच्या जवळ असताना दिसतात... मॉलमध्ये बघा, मुलांना क्लास ला सोडणं आणणं, कपडे मशिनला लावणं , भाज्या चिरून देणं वगैरे बरीचशी काम आनंदाने करतात👍 थोडक्यात संसार दोघांनी मिळून करायचा आहे ह्याची जाणीव असल्याचे दिसते.ज्या घरांत मुलगी नाही तिथे चटपटीत पणे पाने घेणे, वाढणे ,मागचं आवरणे ही कामे करून मुले आपल्या आईला मस्त मदत करतात.आईच्या आजारपणात ही कणखर मुले हळवी होतांना दिसतात..भर उन्हात कारचे टायर पंचर झाले की हीच मुले सगळ्यांना सावलीत बसवून भर उन्हात तापलेल्या गाडीचे टायर बदलतात.. मुलगी जन्मास येणं ही नशीबाची कृपा असेल तर मुले त्याच नशिबाचा आधार आहेत. एक पुरुष यशस्वी होतांना त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हणतात ... पण एक स्त्री यशस्वी होते तेव्हा तिला घडविणारे, स्वातंत्र्य, आधार देणारे, साथ देणारे अनेक पुरुष असतात. एखाद्या वडिलांनी तिला शिक्षणाची संधी दिली असते, एखाद्या भावानी अभ्यासात मदत केली असते, एखाद्या कलीगनी कामाला हातभार लावला असतो...एखाद्या नवऱ्याने सांभाळून घेतलेले असते.....स्त्री स्वयंपूर्ण आहे हाही अतिरेकच म्हणावा लागेल विचारांचा.... मुली हल्ली आईवडिलांचा सांभाळ करतांना दिसतात तेव्हा त्यांच्या नवऱ्याने सुद्धा मोलाची साथ दिलेली असते ,हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे.म्हातारपणी वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठविणारे मुलगे आहेत... असतील काही स्वार्थी पण त्याच वेळी स्वतःच्या आईवडिलांचे सारे व्यवस्थित करून आपल्या पत्नीच्या आईवडिलांना ही सांभाळणारी मुले आहेत ना!त्यांना विसरून कसे चालेल?? मुलगी सासरी जाते हा क्षण जितका अवघड आहे तितकाच कदाचित आपला आपला मुलगा करत वाढविलेला मुलगा, घर, संसार एका नवख्या मुलीच्या हवाली करणे आहे👍 सियाचीनला सारख्या ठिकाणी ज्या लष्करातील मुलांच्या बदल्या होत असतील त्या 20/22 वर्षांच्या मुलाच्या आईचे काळीज काय म्हणत असेल हो?? मुलाची आई होणेही सोप्पे नाही.. आयुष्याची बाजी लावून वाढविलेल्या मुलाला मातृभूमीसाठी पाठवणे केव्हढे महान आहे हे.
                       कुणालाही मुलगा असो वा मुलगी, त्यांना वाढवतांना आईवडील म्हणून फारसा फरक पडत नाही. आपण जन्माला येणाऱ्या बाळाकडे अपत्य म्हणून बघायला हवे,तसेच विकासाच्या, फुलण्याच्या सर्व संधी देऊन वाढवायला हवे. सध्या जिकडे तिकडे मुलीच्या आईचा गौरव होतांना दिसतो.. सोशल मीडियावर तिला महान म्हणून चितारलेलं असतं... मात्र मला सुजाण, सुयोग्य मुलांना घडविणारी आई जास्त श्रेष्ठ वाटते... मी स्वतः मुलीची आई आहे मात्र मुलाची आई देखील तितकेच किंवा बरेचदा अधिक त्याग करत असते. ती देखील तितक्याच आदराची हक्कदार निश्चित आहे.आपल्याकडे राजपुत्र जन्मलाय तर आपण अधिक नशीबवान आहात.. भविष्यातील एक अख्खे कुटुंब आपण घडविणार आहात... जिथे घरांतला पुरुष तंगड्या पसरून सोफ्यावर लोळत जागेवर पाणी मागणार नाही, जिथे स्वतः चे कपडे स्वतः धुणारा पुरुष असेल ,स्वतः तो पान वाढून जेवायला बसेल, जिथे स्त्रीचा ..तिच्या कष्टांचा आदर होईल, जिथे माणुसकी, स्वधर्म, स्वराष्ट जागे करता येईल.मुलांच्या आईंनो!....खरेच नशीबवान आहात तुम्ही ... तुमच्या राजपुत्राला तुम्हाला स्त्रियांचा आदर करणारा, त्यांना मनुष्य म्हणून वागविणारा, जाणीवपूर्वक घडवता येण्याची संधी मिळाली आहे... उद्याचा येणारा प्रत्येक दिवस, साराच समाज तुमच्या संस्कारांकडे डोळे लावून बसला आहे.
©🔏 यशश्री रहाळकर




                       

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

अहिल्या

                   पुन्हा एकदा, मी माझ्या मनाशीच "रिटायरमेंट घ्यायची आता"... असं ठरवलं. ऍडव्होकेट विद्या सबनीस गेली 35 वर्षे अखंड काम करताहेत आणि आता त्या थकतात कधी कधी;असं सकाळीच मी स्वतःला बजावलं.आज बाबांना जाऊन पाच वर्षे झाली .त्यांच्या फोटोला मस्त गुलाबांचा हार घातला...अहं! मला आवडतात गुलाब म्हणून.एक प्रसन्न smile स्वतःलाच देऊन मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. आताश्या माझ्याकडे कुणीही पाहत नाही . नव्हे वय नाहीये ते!.... फुलण्याचेही नाही अन् टोचण्याचेही  नाही... नजरांच्या काट्यांनी.... मी जमेल तश्या चार फेऱ्या मारल्या आणि एका बेंचवर स्वतःला झोकून दिलं. इथे शांतपणे बसून माझा स्वतःशी संवाद व्हायचा, झालेच तर येणाऱ्या जाणाऱ्याचे निरीक्षण माझा आवडता छंद.नेहमीची चांडाळ चौकडी बाजूच्या बेंचवर बसून एकमेकींना टाळ्या देत हसत होती. मी ह्यांना Lipstick Gang असं नाव दिलंय.... रोज नवनवीन कपडे आणि संपूर्ण रंगरंगोटी करून  या भवान्या जमत. चालतात किती ? कोण जाणे?? पण ओठांचे लिपस्टिक फिके होईपर्यंत कुणातरी बद्दल चहाड्या अन् कुटाळक्या करीत . "चला निघावे" असा विचार मनांत यायला अन् त्यांनी समोरून जाणाऱ्या 'तिच्यावर' जहरी अस्त्र फेकायला एकच गाठ पडली.
                         'ती' नाजूक ,सुंदर पण फिकुटलेली; आधीच संकोचून खाली मान घालून निघालेली.... बहुदा दूध आणायला... हातात किटली होती. "कित्ती निलाजऱ्या झाल्यात हो मुली आत्ताच्या! लग्न करतात कश्याला?? उघड उघड धंदाच करावा."चांडाळ चौकडी विकृत हसली. तिच्या डोळ्यांत पाणी चमकलं... ओघळू मात्र दिलं नाही तिनं... ती नजरेआड होईपर्यंत ह्या भवान्यांनी नजरांनी तिला पुरतं रक्तबंबाळ केलं.तिचा अपराध नेहमीचाच....नवऱ्याचं घर ती सोडून आली होती. त्यात तिचा बाप गरीब म्हणजे तिची कृती माजोरडेपणाच होती. नवऱ्याच्या उच्चभ्रू कुटुंबाने ती पळून गेली म्हणून  अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता..... भरमसाठ रक्कम मागितली होती. गरीब बाप लाचारही झाला होता कारण वकिलाच्या फी करता पैसा नव्हता. एव्हढी माहिती पुरवून चांडाळ चौकडी मार्गस्थ झाली. मी घरी येऊन नाश्ता करेपर्यंत फक्त तिची नजर आठवत राहिले. तेव्हढ्यात बेल वाजली.. प्रकाश असणार . सुरुवातीच्या दिवसांत, प्रकाश माझा असिस्टंट होता . आता स्वतंत्र प्रॅक्टिस करू लागलाय... उत्तम चालते, हुन्नरी आहे. मुळात अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न असून अनेकांना हातभार लावत असे.
                           माझ्याकडे एक केस घेऊन आला होता. मला म्हणाला," मॅडम! रिटायरमेन्ट पुढे ढकलणार तुम्ही आता!" अनेकदा मी त्याला," आता थकली आहे रे! प्रॅक्टिस थांबवणार रिटायर्ड होणार... सेंड ऑफ चे भाषण तयार ठेव" म्हणून सांगितले होते. माझे नेहमीचे कुतूहल जागे झाले."कोणाची केस आणली आहेस आता?" म्हणत मी भुवया उंचावल्या. "आमच्या घरासमोरील मंदिराच्या गरीब पुजाऱ्याची लेक आहे. तिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. रक्कमच काय फी चे पैसे देणेही शक्य नाही तिला.ही केस तुम्हीच लढू शकता .... कारण विरुद्ध पार्टी आहे नागपूरचे प्रसिद्ध इनामदार कुटुंब... श्रीरंग व्यंकटेश इनामदार..." त्याने एका श्वासात सांगितले आणि समोरचे पाणी घटाघटा प्यायला. माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत... दोन क्षण शांततेत गेले... मी ठामपणे म्हणाले," केस घेतली... facts ची मला गरज नाही." ,दुपारीच त्यांना भेटायचे आम्ही दोघांनी ठरवले नी तो मार्गस्थ झाला.
                    मी तशीच तटस्थ बसून होते....कितीकाळ कोण जाणे?? भूतकाळाच्या गर्तेत भरकटत... आईविना पोर बाबांनी बारावी होताच लग्न लावून दिलं... श्रीमंत स्थळ ,देखणा नवरा काही कमी नाही. पंधरा दिवस असेन सासरी... सोळाव्या दिवशी माहेरी परत... मग सारं सुटून गेलं हातातून. परत सासरी जायचे नव्हतेच..... मग कोर्ट केस, बदनामीची भीती, लोकांच्या नजरा .. आयुष्य दगड झालं. बाबांनी हे सारं  थांबावं म्हणून म्युच्युअल कँसेन्ट ने काही कागदांवर सह्या दिल्या, प्रकरण संपले. आयुष्य सुरू रहावं म्हणून शिकत गेले, वकील झाले... हळूहळू जम बसत गेला मात्र आयुष्याची घडी विस्कटत गेली ती गेलीच. कारण जाणून घेण्यात अनेकांना रस होता... कसं सांगू कुणाला नी काय सांगू?? सारं नीती अनितीच्या चौकटी बाहेरचं होतं. अखेर माझ्यावर चरित्र्यहीनतेचा ठप्पा बसला. मी कितीही ओरडून सांगितलं तरी मिटणार नव्हताच तो.
                      18 वर्षांच्या कोवळ्या देहात जगाविरुद्ध लढण्याची ताकद कितीशी असणार??? 15 दिवसांच्या वास्तव्यात ते दिसलं होतं जे कदाचित नरकातही बघायला मिळणार नाही. माझ्या सासर नावाच्या नरकात मारहाण नव्हती, अत्याचार नव्हते होते ते निलाजरे कोडगेपण. माझ्या सासऱ्यांच्या सगळ्यात धाकट्या लेकाची मी पत्नी.... घरांत सासू सासरे, दोन मोठे दिर, जावा, त्यांची मुलेबाळे, दोघी जणी नातेवाईक, दोघी कुणीतरी आश्रित, दोन किंवा चार सासऱ्यांच्या माघारी धाडलेल्या बहिणी...वीस बावीस माणसाचं घर... कुटुंबाचा भलामोठा एकच व्यवसाय. चांदीच्या ताटापासून ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत श्रीमंतीचा ओघ... घराण्याला प्रतिष्ठा ,समाजात मोठे नाव. अवघ्या पाच सहा दिवसांत जावांचे सूचक बोलणे... खरेच उमजले नाही. आठवडाभरात थोरल्या दिरांना रात्री खोलीत धाडण्यात आले तेव्हा उकल झाली. बाकी काहीही मान्य असले तरी हे कसे होणार??? नवऱ्याने समजूत घातली... सासूबाईंनी द्रौपदीचे उदाहरण दिले,ती पंचकन्यात पवित्र झाल्याचेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीदेहावर मादी म्हणून प्रत्येक नराचा अधिकार असल्याचे बोलून दाखवले.मी देखील मादी म्हणून मला असणारा निसर्गदत्त नकाराधिकार वापरत ते घर सोडले. ... मग काय त्यांच्या प्रतिष्ठेच्या डोलाऱ्यासाठी मी पळून गेले अशी खोटीच तक्रार दाखल करून अब्रू नुकसानीचा दावा टाकला. मुकाट्याने मान्य कर ,म्हणत दोन्ही जावा भेटून गेल्या. मी बधत नाही म्हटल्यावर साम, दाम, दंड ,भेद सारी अस्त्रे वापरून पहिली...व्यर्थ. शेवटी 'अपवित्र' म्हणत बदनामीचे अस्त्र उगारले... बाबा त्याला नमले.
                           मनाच्या ओल्या जखमांना पुन्हा एकदा मलमपट्टी करत मी तयार झाले. दुपारी दोनच्या सुमारास प्रकाशच्या सोबत जाऊन देवळापाठच्या खोलीवजा घराचे दार वाजवले. पुजारी बुवांनी दार उघडले... आत पाहते तर तिच... ती सकाळचीच पोर. प्रकाशने त्यांना ओळख करून देत सांगितले,"ह्या ऍडव्होकेट विद्या सबनीस मॅडम, मोठ्या वकील आहेत..." मी  त्याला हातानेच पुरे!अशी खूण केली. त्या पोरीला बसायला सांगितले. तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिले... क्षणभर मीच दिसले तिच्याजागी मला.,"मी तुझी केस घेतली.. एक पै नकोय मला" तिच्या वडिलांकडे पाहत मी म्हणाले. ती अविश्वासाने पाहत राहिली... एकटक.... अचानक म्हणाली,"कीव वाटतेय म्हणून??"... मी अश्वासकपणे म्हणाले," नाही. विश्वास वाटतोय म्हणून."... "काहीही माहीत नसतांना???" पुन्हा तिला प्रश्न पडला होता. मी स्थिरपणे एकेक शब्द उच्चारत म्हणाले," मी तुझे सासरे व्यंकटेश इनामदार ह्यांची प्रथम पत्नी...तुला मला काहीही सांगावे लागणार नाही." तिचा बांध फुटला ,ती हमसाहमशी रडू लागली.
                         तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला शांत करत मी म्हणाले, "हे कलीयुग आहे बेटा ! स्वतःची अहिल्या करू नकोस... राम येणार नाही मुक्त करायला शिळा झालीस तर..." तिच्याघरुन परततांना मनांत विचार डोकावला..स्त्रीचे पातिव्रत्य कोण ठरवणार? ?? तिचा पती??? पुरुषाच्या वासनांची पूर्ती करायला नकार देणारी सुद्धा 'अहिल्या' ठरते नाही! ... आयुष्याचा दगड होऊन पडते ती... तो मात्र इंद्र, देवलोकीचा राजा असतो... खुशाल राजरोस राजपद भूषवितो. मी कागदपत्रे जुळवून स्टेटमेंट तयार केलं.... मी आता ह्या अहिल्येची शिळा होऊच देणार नाही. मी निर्धारानं पुन्हा एकदा कोट चढवला.
🔏© यशश्री रहाळकर

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

सिंहवंशी

            'शहर' म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहतात x आणि y अक्षांशाचे आलेख...उंचच उंच वाढणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि तेव्हढ्याच वेगाने आडव्या विस्तारत जाणाऱ्या झोपडपट्टीच्या बकाल वस्त्या. वस्त्यांच्या कडेने वाहणारी गटारे,उघडी नागडी मुले,घाणीचं साम्राज्य....त्यात राहणारीे जगण्याच्या संघर्षात पिचून गेलेली....पोटाच्या आगीने होरपळून गेलेली माणसे. गगनचुंबी इमारतीतलं आयुष्य सुखसाधनांनी उंचावत जाणारं तर ह्या झोपडपट्ट्यांमधील आयुष्य समस्यांसह विस्तारत जाणारं.दोन्ही जीवनाच्या आपापल्या समस्या आहेत...अधोरेखित होते ती वरच्या वर्गाची धावपळ, त्यांचे प्रश्न ... मात्र काही समस्या ह्या झोपडपट्टयांनी पर्यायाने शहरांनी जन्मास घातलेल्या आहेत.
                         कुठल्याश्या दुष्काळी खेड्यातून अश्याच एका बकाल वस्तीत ती लग्न होऊन आली...वय वर्ष 15. आडोश्याला झोपडी होती...सासू भांडी धुणे करून पैसे मिळवत होती..एव्हढ्या भांडवलावर तिचं लग्न झालं..ती बाई असणं आणि काम करण्याजोगी असणं हे पुरेसं होतं. तिची सासू माझ्या घरी कामाला यायची... आता ती येऊ लागली . चटपटीत स्वच्छ नीटनेटकं काम.... तशी फारशी बोलायची नाही पण कधीतरी निवांतपणे गप्पा मारत बसे.. माझे न तिचे गेल्या 17 वर्षांत वेगळेच भावबंध तयार झाले होते. मी मालकीण आणि ती मोलकरीण असे नाते उरलेच नव्हते.. जणू ती घरातली एक झाली होती . तिचं नाव कामवालीला न शोभणारे, टिपिकल रखमा किंवा पारु बाई नव्हते ..अगदीच मॉडर्न 'शिल्पी' होते...तिच्या पतीपरमेश्वराने प्रेमाने ठेवले होते . शिल्पी नावाप्रमाणेच संसार नावाच्या चरकात पिचून निघालेले शिल्प होती...देहाची सपाट काडी,पाठ पोट एक झालेले आणि नियमित बाळंतपणे..माझ्या अर्ध्या वयाची असावी..3 मुलगे आणि 2 मुलींच्या जन्मानंतर नित्यनेमाने दरवर्षी जाऊन 'पोट पाडून यायची'... अबोर्शन साठी हा शब्द कळला तो तिच्याच कडून . पहिला मुलगा 16 वर्षांचा झालाय.. आतातरी फॅमिली प्लँनिंग चे ऑपरेेशन करून घे म्हणून मी तिच्या मागे लागले.. तिला काही पटेना. ऑपरेेशन करतांना आपण मरू आणि मुलींचे काय ? ही काळजी तिला पोखरायची..दर अबोर्शन च्या वेळी 3 दिवसांची सुट्टी टाकून ती लगेच कामावर हजर असायची.
                  शिल्पीचा नवरा काहीही करत नसे... तिचा सासराही तसाच होता . त्याला नेमाने दारूला पैसे दिले की तो मारझोड करीत नसे . एकदा त्याने कोणत्यातरी जुगारात बरेच पैसे मिळवले ... ते सारे घेऊन तो एका फटाकडी बरोबर राहू लागला. शिल्पीला काहीच फरक पडला नाही उलट ती खूषच वाटली, मला म्हणाली,"मुडद्याच्या बाटलीच्या पैशात माही लेकरं पोटभर खात्यात... ती सटवी का जलमभर ठेवणार हे.. पैसे संपले की लाथ घालन मंग येईलच परतून .. कुटं जाईन?" तसंच झालं , महिन्याभरात नवरा परतला.शिल्पी मनापासून नवऱ्यावर, संसारावर प्रेम करायची. तिच्या नवऱ्याच्या उर्फ "मुडद्याच्या" डोळ्यांत कसलेसे इन्फेक्शन झाले... किती जणांकडून कर्ज काढून उत्तम औषधोपचार  ,शुश्रूषा सारे तिने केलं.तिच्या एकूणात जीवन जगण्याच्या पद्धती माझ्या समजशक्ती पल्याड होत्या.विशेष म्हणजे शिल्पीचा मुलगा देखील काहीही कमवत नसे जे काही थोडेफार कधी मिळवलेच तर खाण्यापिण्यावर उडवून टाकायचा.तो शिकतही नव्हता..मोफत शिक्षणाचा फायदा घेऊन त्याने बँकेत प्युन व्हावे ,असे शिल्पीला फार वाटे. पण मोफत तांदुळापूरतेही हा हिरो शाळेत जायला तयार नव्हता..हिरो हा शिल्पीचाच शब्द. बरेचदा हे पुत्ररत्न पळून जाई..गायब होई चार दिवसांनी परत येई.एकदा कसल्याश्या मारामारीत पोलिसांनी धरून नेला.. मग त्याला सोडवून आणायला शिल्पी पुन्हा कर्जबाजारी . "मोक्ष मिळायला मुलगा हवाच "असे शिल्पी नेहमी म्हणायची.. मोक्षाचे माहीत नाही पण कपाळमोक्ष मात्र नक्की हाच हिरो करणार ,शंकाच नाही. तोच काय तिचे तीनही मुलगे आपल्या बापाचा ऐदीपणाचा वारसा पुढे चालवीत तिच्या उरावर बसून मजेत जगत होते
                    याउलट शिल्पीच्या दोन्ही लेकी सुमा आणि वसू चौथीत असल्यापासून आईला मदत करायच्या, पुढे दुपारच्या शाळेपूर्वी 2 घरे करून त्या शाळेत जात . वर्षीचे वर्षी पास होत होत्या आणि कधी शिल्पीचे काम निघाले, आजारपण असले तर बिचाऱ्या पोरी सारी कामे करायच्या..सुमा 14 /15 वर्षांची असेल... एके दिवशी कुणाचातरी हात धरून पळून गेली. दोन दिवसांनी शिल्पी उगवली.. एकतर कामे करून मी वैतागले होतेच त्यात डोळ्यांसमोर वाढलेली पोर काळजी वाटू लागली. शिल्पी शांतपणे म्हणाली,"म्याच म्हनलं जाय पळून..त्यो मुडदा काई लगीन लावून देयाचा न्हाई." आता मात्र मी थक्क झाले.माहेरी असो वा सासरी ... बाप,नवरा, मुलगा हे पुरुषवर्गीय प्राणी कष्ट करून पोसायचे असतात हे सुमाला ठाऊक असावे.सुमाचा नवरा वर्षभरात वारला... एक पोर पदरात घेऊन ती माघारी आली.तिनेही शिल्पी सारखे स्वतःला कामाला जुंपून घेतले.शिल्पी नवऱ्याबरोबर आता तिच्या दोन्ही मोठ्या लेकांना दारूसाठी पैसे देऊ लागली. सुमा बापाच्या घरात राहत होती.. त्यामुळे जुगाराचे पैसे ती पुरवायची. बाप आणि भाऊ डोकं फिरलं की सुमा पूर्वी कुणाचा हात धरून पळून गेली होती... म्हणून मार मार मारायचे.धाकट्या वसुचे लग्नही भाऊ करू देईनात.एकदिवस सुमाला बापाने काहीतरी क्षुल्लक  कारणावरून गुरागत मारलं... मध्ये पडलेल्या शिल्पीलाही काळं निळ करून सोडलं. शिल्पी रडत रडत नेहमीप्रमाणे आपली रामकहाणी सांगू लागली.
                       गेल्या दोन आठवड्यातील ही चौथी वेळ... मी तडकून शिल्पीला म्हणाले,"अश्या कश्या ग बावळट मायलेकी आहात तुम्ही? तुझ्या नवऱ्याला आणि पोराला तुम्ही पोसताय.. आणि वर मार खाताय. सोडून द्या त्यांना... म्हणजे आपोआप डोकं ठिकाणावर येईल." शिल्पी शांतपणे शून्यात नजर लावून बसली. मी आपल्या वकील धर्माला जागत तिच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचे पाढे म्हणून दाखवले... वर बोधमृत पाजत म्हणाले.."शिल्पी, तू आणि तुझ्या लेकी मिळून उत्तम कमावता.. छान चालेल तुमचं. वेगळ्या व्हा.. किंवा हाकलून द्या त्यांना." शिल्पी कमालीच्या थंड स्वरात उत्तरली..." हे आसं आमाला वाटलं नसन का वो बाई? रोज रोज वाटतं.. कदीकदी तर त्या मुडद्याचा जीव घेवा वाटतो...शप्पत! नुसतच वाटून चालत व्हय कुटं?."पुन्हा काही क्षण शांततेत गेले...शिल्पी समजूतदारपणे सांगत होती की स्वतः लाच समजावत होती कोण जाणे?.... "आमचं जग येगळ हाये... तिथं मानसं न्हाई जनावरं राहत्यात.. जंगलाचा कायदा हाय साराच... तुमाले शिंव्ह माहीत असन ना वो बाई! जिंदगीभर साऱ्या सिहिणी शिकार करून आनीतात.. अन निस्ता बसून शिंव्ह खाते फुकट... तसं सिहिनीच काय अडते सांगा बरं??" मी निरुत्तर .. खरंच एकदा पिल्लं झाली की सिंहिण सरळ सिंहाला सोडून देऊ शकते... आयुष्यभर कश्याला पोसायचं?? शिल्पी पुढे म्हणाली, " एक शिंव्ह आसला ना की बाकीचे फिरकत नाहीत तिकडे.. नाहीतर शिंव्हच काय गिधाडं, तरस, कोल्हे लचके तोडीतात. सीहीन असून उपेग न्हाई ... चार शिव्हास उरावर पोसण्यापरी एकच बरा न्हाई का?"... मी स्तब्धपणे विचार करत बसली...,"निघतो म्या! लई टाइम झाला" म्हणत शिल्पी उठली. मी मनोमन ह्या सिंहवंशी सिंहिणीला नमस्कार केला.... जंगलचा कायदा ती कोळून प्यायली होती.किती खरं होतं तिचं... समाजाच्या वाईट नजरांपासून वाचायचे असेल तर एक सिंह पाहिजे... भलेही त्याला आयुष्यभर पोसावे लागले तरी चालेल...त्याची पुरुषपणाची नुसती आयाळ पुरेशी आहे... जंगलात टिकून रहायला.शहर म्हणजे सिमेंटचे जंगलच नाही का?..मग इथेही जंगल राज चालणारच.👍
©🔏 यशश्री रहाळकर