प्रेम जगातील आदिम भावना .. अत्यंत प्रामाणिक , अत्यंत खरीखुरी मानवी मनाची अभिव्यक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाची अनेक रूपे असू शकतील.. आई मुलांचं प्रेम, मित्रांमधील प्रेम , बहीण भावाचं प्रेम... मात्र सृष्टीच्या अखंड चक्रासाठी आवश्यक असणारं दोन भिन्न लिंगी व्यक्तीत असणारं, प्रियकर- प्रेयसीचं प्रेम... हाच प्रेमाचा पाया आहे. जग प्रेमावर चालतं.. प्रेम ही सर्वाधिक पवित्र भावना आहे असं आपण नेहमीच म्हणतो. मी देखील प्रेम केलं... जीवापाड प्रेम केलं... मात्र मी जिच्यावर प्रेम केलं ती कुणा दुसऱ्याची पत्नी होती...एका मुलाची आई होती. विचित्र वाटतेय का कल्पना?? माझं प्रेम पवित्र की अपवित्र ठरवण्यापूर्वी माझी कथा नक्कीच जाणून घ्या.
मी विश्वास जोशी... सरळमार्गी मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातील जेष्ठ अपत्य, माझ्या पाठीवर दोन भाऊ दोन बहिणी, वडील कोर्टात लिपिक आई गृहिणी . वाशीम सारख्या छोट्याश्या पण जिल्ह्याच्या ठिकाणी वाढलो.. साधं सरळ एकसुरी आयुष्य...एप्रिल 1984 साल माझ्यासाठी जीवनाची नवीन वाट घेऊन आले. मी M. Com. पूर्ण केले आणि लगेचच वाशीम जिल्हा बँकेत लिपिक म्हणून रुजू झालो. त्या काळात कुणीतरी कुणासाठी तरी शब्द टाकायचे , होतकरू मुले म्हटली की लगेच नोकरी मिळायची. प्रामाणिकपणे दोन वर्षे काम केलं.. साहेबांच्या मर्जीतला झालो... मंगरुळपीर नावाच्या गावात बँकेची नवी शाखा सुरू होणार होती... मी बॅचलर त्यामुळे मलाच मॅनेजर म्हणून प्रमोशन देत पिटाळण्यात आलं. नवीन ब्रँच मध्ये 1 कॅशियर, 1लिपिक आणि 1 प्युन असा स्टाफ होता.आधी राहण्याची सोय शोधली... गाव तसं गैरसोईचंच होतं... भाडेकरू म्हणून एका वाड्यातील खोलीवजा घरात सोय झाली... जुजबी गरजेचे सामान आईने लावून दिले.. तसा गरजेपुरता स्वयंपाक येत होता. सकाळी उठून पाणी भरून दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवायचा.. कपडे धुवून ,स्वतःचं सगळं आवरून बँकेत 10 च्या ठोक्याला हजर व्हायचं असा दिनक्रम ठरला... संध्याकाळी सगळे आवरून यायला चांगलाच उशीर होत असे. आईने माझ्यासाठी एव्हाना मुली बघायला, टिपण पत्रिका जुळवायला सुरुवात केली होती.. मात्र अजून 2 वर्षेतरी सगळं सेटल होईपर्यंत मला लग्न करायचं नव्हतं.
पहिल्या दिवशी बँकेत गेलो ... अगदी लहानशी खोली , स्टाफ ने स्वागत केलं... कॅशियर बेंडाळे , माझ्यापेक्षा वयाने मोठे मध्यमवयीन होते त्यांना काही वर्षांचा अनुभव होता ... त्यांचेच गाव म्हणून त्यांनी इथे बदली मागून घेतली. शेती सांभाळून बँकेत यायचे हे धोरण , त्यामुळे बेंडाळे आले तर आले अशीच परिस्थिती होती. सेवक ठोके अगदी नुकताच बारावी नापास झालेला अठरा वर्षांचा मात्र कामाचा अजीबात अनुभव नसलेल्या तरुण मुलगा. ठोके तरतरीत आणि हुशार होता. माझी कामे न सांगता त्याने समजून घेतली... मी नुसते पाहिले तरी तो चहा , फाईल्स किंवा गरजेची स्टेशनरी आणून देई . हळूहळू सारेच तो झटपट शिकून घेऊ लागला. लिपिक म्हणूननव्याने रुजू झालेल्या डोंगरे बाई मात्र घुम्म असायच्या सांगकाम्या सारखे सांगाल ते काम करायच्या एक चकार शब्द अधिकचा नाही. माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठ्या होत्या मात्र पोक्तपणा स्वभावात ठासून भरलेला... घट्ट आवळून दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन पडलेल्या चेहऱ्याने काम करायच्या. या बाईच्या चेहऱ्यावर कायमचे बारा वाजलेले असायचे. या सगळ्यांमध्ये ब्रँच उत्तम सुरू झाली... सहा महिन्यात बँकेचे चांगले नाव झाले.
एकदा महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून सारी जुळवाजुळव करून मी आणि ठोके उशिरापर्यंत काम करत होतो ... कॅशियर बेंडाळे आजारी असल्याने सुट्टीवर होते. डोंगरे बाईंना मी थोडा वेळ जास्त थांबून काम करण्याची विनंती केली , सुखरूप घरी सोडतो म्हणून आश्वासनही दिले ... मात्र एखादं तासात त्या चुळबूळ करू लागल्या.. घरून फोन आला तश्या भीतीने थरथरत घरी जाते सांगून निघाल्याही. मी जबाबदार म्हणून आणि सोबतीला प्युन ठोके दहा वाजेपर्यंत काम उरकून घरी निघालो. वाड्याच्या दारापाशी जेमतेम पोहोचलो असेन , शेजारच्या वाड्यातून मारहाणीचा आणि कळवळून रडण्याचा आवाज आला... मी क्षणभर विचार केला ; कश्याला दुसऱ्याच्या भानगडीत पडा?? हे तासभर सुरू होतं तो मनुष्य एका स्त्रीला घाणेरड्या शिव्या घालत बेदम मारत होता..अखेरीस मी बाह्या सरसावून निघालो.. पाहतो तर काय डोंगरे बाईंना मारहाण सुरू होती, तो इसम बहुदा नवरा असावा...चिकार प्यायलेला होता, लाथा बुक्क्यांनी त्यांना तुडवत होता. कोपऱ्यात आठ वर्षांचा मुलगा थरथरत ,"नको बाबा ! नको नको ! आईला मारू नका" असे विनवत होता. असा संताप डोक्यात गेला... त्या इसमाचं बखोटं धरून सण्णकन दोन कानाखाली वाजवल्या... ह्या अनपेक्षित वाराने तो पार कोलमडून पडला.
"ए बेशरम माणसा ! गुरासारखं बडवतोस माणूस आहेस का जनावर? खबरदार हात लावलास तर पोलिसांना फोन करतो."
पोलिसांचे नाव घेताच बिचकला जरासा. मागे सरकून जळजळीत नजरेने डोंगरे बाईंकडे पाहतच आतल्या खोलीत जाऊन पसरला. डोंगरे बाई जवळपास अर्धमेल्या झाल्या असाव्या... रात्रही बरीच झाली होती मुलाला त्यांना पाणी पाहायला सांगून मी उलट पावली ठोके शिपायाकडे गेलो. त्याला उठवून डॉक्टरांना घेऊन आलो , ती अमानुष मारहाण पाहून तेही जरा काळजीत पडले. त्यांनी काही औषधे दिली आणि सक्तीची विश्रांती सांगितली... मी माझ्या घरचे दूध हळद घालून डोंगरे बाईंना आणून दिले भाजी पोळी पोराला जेवू घातली. त्यांनी डोळ्यांत पाणी आणून हात जोडले. मी आराम करायला सांगून माझ्या खोलीत परतलो.. आज मी उपाशीच आडवा झालो.. डोळ्याला डोळा लागत नव्हता... सतत डोळ्यांपुढे डोंगरे बाईच दिसत होत्या.
दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यागेल्या मी आधी फाईल शोधून काढली आणि डोंगरे बाईंचा biodata काढला. मंजिरी डोंगरे... काय मस्त नाव आहे मंजिरी वा! मी मनाशीच म्हणालो. शिक्षण बीकॉम झाले होते ... इथे लागली ती नोकरी पहिलीच , अनुभव नव्हता. गरजू म्हणून कुणा पाटलांनी शब्द टाकला होता. ठोके आला तसा डोंगरे बाईंचा विषय निघाला... अचानक डोंगरे बाईंच्या माहितीत मला एव्हढा रस का वाटू लागला कोण जाणे? ठोके सांगत होता..
"साह्येब, काल तुमी व्हते म्हून वाचल्या बाई. त्याहैचा नवरा निर्हा राक्सस हाये."
एव्हढ्यात कॅशियर बंडाळेही आले. झाला प्रकार कळताच म्हणाले,
"कशाला साहेब नसत्या फंदात पडले तुम्ही? तो माणूस फार घाणेरडा आहे.... भयंकर संशयी. तुम्हाला त्रास दिला नाही म्हणजे मिळवलं. त्याच्या या स्वभावाने कुणीही मदतीला जात नाही त्यांच्या."
डोंगरे बाईंबद्दल दोघे जे जे सांगत होते ते मी जीवाचे कण करून ऐकू लागलो... अचानक मला ही आपुलकी का वाटी लागली होती? माझे मलाच कळेना.. ही फक्त दया असावी. एकंदर मंजिरी डोंगरे ह्याच गावातील तो वाडा तिच्याच वडिलांचा . वडिलांच्या माघारी आईने फायनल शिकत असतांना सांगून आलेल्या ह्या डोंगरेंच्या ठिकाणी लग्न लावून दिलं. नातवाचं तोंड पाहून म्हातारीने राम म्हटलं. डोंगरे माणूस भयंकर घाणेरडा होता... दारू पिणे, जुगार अशी सगळी व्यसने तो करायचा. कर्जबाजारी झाला की बरेच दिवस गायब व्हायचा, आला की मंजिरीला छळायचा, संशय घेऊन मारहाण करायचा. मुलगा वाढवतांना पैसे तर लागणार म्हणून कशीबशी हात जोडून तिने ही नोकरी मिळवली होती. आता डोंगरे स्वतः तर पैसे देत तसेच पण मंजिरीकडूनच घेऊन जायचा. घरातल्या वस्तू विकायचा निराधार मंजिरी सगळे सहन करायची. आता मला मंजिरीच्या घुमेपणाचं खरं कारण कळलं होतं. ... तिच्या डोळ्यांतली वेदना मी वाचू शकलो नाही बहुदा.
प्रेम दोन जीवांमध्ये निर्माण व्हायला कोणत्यातरी शिडीची गरज असते... आईबाळाच्या नात्यात ममता ही शिडी असते. ... तर प्रियकर प्रेयसीच्या नात्यात आकर्षण ही शिडी असते. प्रेमाच्या अंतिम रेशमी भावनेपर्यंत पोहोचवण्याचे काम तुमच्याही नकळत ही शिडी करत असते. मला मंजिरी डोंगरे बद्दल वाटणारी दया, कीव, सहानुभूती अशीच शिडी तर नव्हे ना! मी पुन्हा पुन्हा तपासून पाहू लागलो. ऑफिस सुटताच आधी मी मंजिरीचे घर गाठले. तिचा नवरा बहुदा निघून गेला असावा. ती बरीच सावरली होती पण बेदम मारहाणीमुळे अंग काळे निळे झाले होते... मी जुजबी चौकशी करून माझ्या खोलीवर परतलो... आंबेहळद शिजवून मुलाच्या हातात देत ,त्याला आईला लावून देण्यास सांगितले. थोड्या वेळाने दोघांपुरते खिचडी पापड देखील पाठवले . त्यांचा मुलगा प्रसन्न खरेच नावाप्रमाणेच हसतमुख होता, माझ्याशी त्याची मस्त गट्टी जमली. लवकरच तो माझा छोटा दोस्त बनला. माझी कामे करू लागला, संध्याकाळी आम्ही कॅरम खेळायचो तर रविवारी क्रिकेट खेळायचो. कधी अभ्यासाची पुस्तके मांडून प्रश्न विचारायचा... बहुतेक माझ्याच खोलीत पडलेला असायचा. मलाही मस्त विरंगुळा मिळाला होता. मुलांना माया लगेच उमजते.. माझ्यात तो बापाची माया शोधत असावा.
आठ दिवसांनी डोंगरे बाई कामावर रुजू झाल्या . आज नेहमीप्रमाणे पदर गुंडाळून न घेता मोकळा सोडला होता. फिक्या गुलाबी रंगाची साडी सैल वेणी आणि मोगऱ्याचा गजरा.... चेहऱ्यावर स्मितहास्य. मी पाहातच राहिलो, ही कसली कमालीची सुंदर आहे आजपर्यंत मी नोटिसच केलं नव्हतं... गोरापान रंग, टपोरे डोळे, लांब कमरेखाली रुळणारे केस, बांधेसूद आकर्षक देह... मुख्य म्हणजे प्रसन्नता. अशी मी यापूर्वी कधीही पहिली नव्हती. मंजिरीला माझ्या कडून आधाराची शिडी मिळाली होती. माझ्या सहानुभूतीच्या शिडीला आकर्षणाची शिडीही जोडली गेली... आम्ही प्रेमात कधी पडलो ते आमचे आम्हालाही कळले नाही. मुळात आमच्यामधली भावना नेमकी काय आहे हे काळायलाच आम्हाला उशीर झाला असावा... किंवा स्वतःशी कबूल करायला असेल. आम्ही शेजारीच रहायचो.. ती प्रसन्नच्या हाताने सतत काहीबाही पदार्थ पाठवी.. सुगरण होती ती.. प्रत्येक पदार्थ चविष्ट. हिवाळ्यात गुपचूप उबदार पांघरुणही पाठवले आणि एक स्वेटर देखील न सांगता विणून दिला... इतका तंतोतंत बसला ना! माझे माप बहुदा तिने डोळ्यांनीच घेतले असावे . आमच्या अनेकदा गप्पा होत.. अगदी वेगवेगळ्या विषयांवर, ती खरंच खूप अभ्यासू होती.. तिच्याकडून बँकेच्या परीक्षेचा फॉर्म मी भरून घेतलाच ,ती नको म्हणत असतांना. मग तिचा अभ्यास घेऊ लागलो.. कमाल म्हणजे ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली. आमच्याही नकळत आम्ही एकमेकांत गुंतत गेलो... ती कुणाची तरी बायको आहे, एका मुलाची आई आहे ह्याचा विसरच पडला मला.
एका संध्याकाळी आईबाबा दोघेही आले.. भयंकर संतापलेले दिसत होते. मी ज्या वाड्यात रहायचो त्या घरमालकीण बाईंनी ही बातमी तिखतमीठ लावून पुरवली असावी. आम्ही आपले साधे मित्र असल्याचा कितीही देखावा करत असलो तरी जगाला एक स्त्री आणि एक पुरुष ह्यांच्यातले नाते ओळखता येत होते.
आईने माझ्यापुढे 3 फोटो ठेवले ह्यातली एक मुलगी मी पसंत करावी आणि लगेच महिनाभरात लग्न करावे असे तिचे मत होते. मी नेहमीची कारणे देत चालढकल करू लागलो, बाबा संतापले...
"विश्वास .. तुझे काय चालले आहे हे जगाला आणि आम्हाला कळत नाही असे वाटते का तुला? ती दुसऱ्याची बायको आहे ह्याचे तरी भान ठेवा. ह्या सगळ्यांचे परिणाम चांगले होणार नाहीत."
दुसऱ्या दिवशी वाशीमला परतण्यापूर्वी आई मंजिरीला भेटून आली... काय बोलणे झाले कोण जाणे? ते दोघे गेल्यावर मंजिरी माझ्या खोलीवर आली.. तिला रडणे अनावर झाले होते हुंदके देत ती रडू लागली...
"मी तुम्हाला नादी लावलंय सगळे म्हणतात तुमची आई सुद्धा... किती पुरुषांना नादी लावलंस विचारत होत्या...मी धंदेवाली नाही हो! पुरुषांना नादी लावायचे असते तर फार सोपे होते... माझा नवरा हा असा ... ना आई ना बाप कुणाचा आधार नाही. खूप जणांनी खडे टाकून पाहिले आडून तर कधी प्रत्यक्ष विचारले.. सगळ्यांच्या डोळ्यांत वासना, सगळी गिधाडं ओरबाडायला टपलेली.. विश्वास !फक्त तुमच्या डोळ्यांत मी आदर पाहिला, माया पाहिली , माणुसकी पाहिली... "
मी मूकपणे तिचे हात हातात घेतले.. आज तिला बोलू द्यायला हवं होतं हृदयात कोंडलेलं सारं दुःख, साऱ्या वेदना मोकळ्या व्हायला हवा होत्या. ती बोलत होती, सगळ्या उजळणीने तिला होणारा त्रास मला जाणवत होता... तिचं सगळं दुःख महादेव होत हलाहलासारखं मला प्राशन करायचं होतं...
"अठराव्या वर्षी काही कळायच्या आत मामाने आणलेल्या ठिकाणी आईने लग्न लावून दिले. हा नवरा नावाचा प्राणी रक्तपिपासू आहे... एक दिवस सुखाचा गेला नाही... कधी मनांत आलं तर ओरबाडायचा कधी देह कधी पैसा कधी तुडवायचा.. त्यातच प्रसन्नचा जन्म झाला... मुलाच्या जन्माने तरी सुधारेल ही आशाही फोल ठरली... हा माझं मुलगाच नाही म्हणत वेगळाच त्रास सुरू झाला. प्रसन्नला अनाथ आश्रमात टाकायला निघाला तेव्हा मात्र मी विरोध केला, सहा महिन्यांच्या प्रसन्नला घेऊन सरळ आईकडे निघून आली ती कायमचीच...गावच्या पाटील काकांनी शब्द टाकला म्हणून ही नोकरी मिळाली... आताही येतो नीच हलकट.. कधीतरी मारहाण करतो पैसे मागतो, कर्ज काढून ठेवतो आणि वसुलीला लोक माझ्या दारात उभे राहतात.. वाईट बोलतात , बायका टोमणे मारतात .. ह्या सगळ्याचा वीट आलाय हो आता. कधीतरी वाटतं जीव द्यावा पण प्रसन्नचे काय ? हा विचार मनात येतो...
तुम्ही भेटलात आधार वाटला... मला काय वाटतं तुमच्याविषयी मीच सांगू शकणार नाही?काय चुकतंय माझं सांगा ना काय करू मी"
आवेगाने मंजिरी माझ्या मिठीत शिरली ... आमची हृदय जणू जोडली गेली. त्याच क्षणी मी ठरवलं.... मी मंजिरीला अंतर देणार नाही... जगाच्या दृष्टीने हा व्यभिचार असेलही ... मला फरक पडत नाही. मी कायम तिला साथ देईन. संकोचून सावरत बाजूला होत मंजिरी म्हणाली,
"तुम्ही खूप चांगले आहात विश्वास ,. मी तुमच्या आयुष्याचं नुकसान करणार नाही . तुमचे कुटुंब आहे, तुमची समाजात प्रतिष्ठा आहे ती मी मातीमोल होऊ देणार नाही. मात्र तुम्हाला ह्या जन्मात मला विसरता येणार नाही.. आयुष्यात लक्षात ठेवावे एव्हढे हेच तर क्षण आहेत."
मंजिरी निघून गेली... मी बावळटासारखा बघत राहिलो... ना व्यक्त झालो ना कोणते वचन दिले. मंजिरी बँकेची परीक्षा पास झालीच होती.. तिला अमरावतीला कॅशियर म्हणून पोस्टिंग मिळाले. ती निरोप घेऊन निघाली तेव्हा मी तिला एक सुरेख पेन दिले... असनी म्हणालो ,
"मंजिरी! मला तुला बँकेचे मॅनेजर झालेले पहायचे आहे. थांबू नकोस हार मानू नकोस ... खंबीर हो! परीक्षा देत रहा. आयुष्य खूप सुरेख आहे आणि ते आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे."
मान डोलावून तिने निरोप घेतला. मंजिरीच्या जाण्याने पुढे तीन वर्षे आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती म्हणजे प्रेम होतं का? एक क्षणही मी तिला विसरू शकलो नव्हतो. मला लग्नच करायचे नाही असे मी निक्षून घरी सांगितले... तुम्ही धाकट्या भावासाठी मुलगी पहा सांगून वाट मोकळी करून दिली. तीन म्हणता म्हणता पाच वर्षे मंगरुळपीरलाच गेली होती ... आता बँकेने माझी बदली नागपूर ब्रँचला केली. मी काय एकटा जीव सामान गुंडाळले आणि नागपूरला पोहोचलो.. वन रूम किचन भाड्याने घेतले.. बँकेजवळचाच एरिया पहिला. दुसऱ्या दिवशी हजर झालो. त्या ब्रँचचे मॅनेजर रिटायर्ड झाले होते. मला पदभार सोपवून सगळ्यांशी ओळख करून दिली... आणि काय आश्चर्य ? सुखद धक्का बसला मला कॅशियर होत्या मिस मंजिरी .. आमच्या अतिशय हुशार आणि मेहनती एम्पलॉय म्हणून साहेबांनी ओळख करून दिली. स्लीव्हलेस ब्लाऊज, गडद मोरपंखी साडी, नितळ रंग जरा अधिकच उजळलेला, वागण्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आणि गळ्यात मंगळसूत्र नाही. मी पहातच राहिलो.. ओळख करून देताच आम्ही दोघे पूर्वी एकाच ब्रँचला असल्याचे तिने सगळ्यांना सांगितले. माझा ह्या योगायोगांवर मुळीच विश्वास नव्हता.. देव नक्कीच काहीतरी योजना करत असावा.
थोड्या वेळात माझ्या केबिनमध्ये फाईल घेऊन मिस मंजिरी हजर.. माझ्यातकीच तिलाही ओढ असणार हे निश्चित होतं. ओळखीचं हसत मंजिरी म्हणाली ,
"कसे आहात साहेव? मिळाली का मनासारखी बायको?"
तिचा प्रश्न टाळत मी मिश्कीलपणे म्हणालो,
"डोंगरे मॅडम तुमचा तर मेकओव्हरच झाला. कोण आहे ती खास व्यक्ती?"
"होता एक मित्र. त्याने खूप आत्मविश्वास दिला मला."
विश्वास शब्दावर जोर देत मंजिरी म्हणाली. ऑफिसनंतर कॉफीला अमुक ठिकाणी भेटा सांगून मंजिरी कामाला लागली. कधी एकदा पाच वाजतात आणि मी बाहेर पडतो असं झालं होतं तळमळत होतो तिला भेटायला. अखेर आमची भेट झाली... खूप वर्षांच्या साचलेल्या गप्पा मारल्या. मारझोड करणाऱ्या नवऱ्याला तिने कायमची लाथ घातली होती.. त्याला डिव्होर्स देऊन ती मिस मंजिरी झाली होती. माझा सल्ला लक्षात ठेवत तिने बँकेच्या पुढील परीक्षाही दिल्या होत्या.. त्यातूनच कॅशियर म्हणून नुकतेच प्रमोशन मिळाले होते. ती आनंदात होती का?? मी शोधत होतो. माझ्या लग्नाचे पुन्हा एकदा तिने विचारले कदाचित ती सुद्धा हेच तपासून पाहत होती की मी आनंदात होतो का?
आता मात्र मी गप्प बसण्याचा मूर्खपणा करणार नव्हतो त्याच क्षणी मी लग्नच केले नाही आणि तिच्याशिवाय कुणाशीही करणारच नाही हे तिला सांगून मोकळा झालो.
" ... आता हे तुझ्या हातात आहे मंजिरी की माझ्यासारख्या माणसाला संसारी बनवायचे की पिंपळावरचा मुंजा. "
माझ्या घरच्यांचा विरोध असणारच होता , त्यांचे काहीही चुकत नव्हते. मात्र आता काहीही झाले तरी आम्ही दोघे लग्न करणार होतोच. प्रसन्न तर खूप खुश झाला मला पाहून ... एखाद्या जाणत्या माणसासारखा मला म्हणाला.
"तुमच्यासोबत मम्मी खूप खुश असणार आणि मी सुद्धा."
आम्ही साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. प्रसन्नने त्याचे डोंगरे आडनाव आणि आईचे नाव कागदोपत्री लावले मला मान्य होतेच.. पुढचे सारेच दिवस स्वप्नवत होते.. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवणे ह्यापेक्षा मोठे भाग्य ते काय? आम्हाला साक्षी आणि नंतर प्रेम अशी दोन मुले झाली... आमच्या प्रेमाची ग्वाही देणारी लेक साक्षी आणि प्रेम वृद्धिंगत करणारा प्रेम. चार वर्षांत आईबाबांचा विरोध निवळला . कुटुंबाने मंजिरीचा आनंदाने स्वीकार केला... आज मी बँकेत झोनल हेड आहे... आम्हा दोघांना कधी एकत्र राहता येते तर कधी बदली झाली की वेगवेगळ्या ठिकाणी.. मात्र प्रेम वाढत जाते. होय आमच्या मध्ये प्रेमच होते नव्हे आहे... आज माझ्या आयुष्यातील सगळ्यांत आनंदाचा दिवस आहे... सौ मंजिरी विश्वास जोशी अमरावतीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारणार आहे.. अजूनही तिने ते पेन जपून ठेवलं आहे. लोक म्हणतात मंजिरीच्या मला नादाला लावले.. काय फरक पडतोय? आज आम्ही दोघेही आनंदात आहोत. मंजिरीवर माझं प्रेम गेल्या 16 वर्षांत 16 पट वाढलं आहे. ... शिवाय एक जोडीदार म्हणून मला तिचा अभिमान आहे.. तिने पूर्ण केलेल्या माझ्या स्वप्नाचे सेलिब्रेशन आता जोरदार करण्याची मी तयारी करतोय... surprize party !👍
©🔏 यशश्री

आम्ही साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. प्रसन्नने त्याचे डोंगरे आडनाव आणि आईचे नाव कागदोपत्री लावले मला मान्य होतेच.. पुढचे सारेच दिवस स्वप्नवत होते.. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवणे ह्यापेक्षा मोठे भाग्य ते काय? आम्हाला साक्षी आणि नंतर प्रेम अशी दोन मुले झाली... आमच्या प्रेमाची ग्वाही देणारी लेक साक्षी आणि प्रेम वृद्धिंगत करणारा प्रेम. चार वर्षांत आईबाबांचा विरोध निवळला . कुटुंबाने मंजिरीचा आनंदाने स्वीकार केला... आज मी बँकेत झोनल हेड आहे... आम्हा दोघांना कधी एकत्र राहता येते तर कधी बदली झाली की वेगवेगळ्या ठिकाणी.. मात्र प्रेम वाढत जाते. होय आमच्या मध्ये प्रेमच होते नव्हे आहे... आज माझ्या आयुष्यातील सगळ्यांत आनंदाचा दिवस आहे... सौ मंजिरी विश्वास जोशी अमरावतीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारणार आहे.. अजूनही तिने ते पेन जपून ठेवलं आहे. लोक म्हणतात मंजिरीने मला नादाला लावले.. काय फरक पडतोय? आज आम्ही दोघेही आनंदात आहोत. मंजिरीवर माझं प्रेम गेल्या 16 वर्षांत 16 पट वाढलं आहे. ... शिवाय एक जोडीदार म्हणून मला तिचा अभिमान आहे.. तिने पूर्ण केलेल्या माझ्या स्वप्नाचे सेलिब्रेशन आता जोरदार करण्याची मी तयारी करतोय... surprize party !👍
©🔏 यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!