सध्या सोशल मीडियावर "साधी राहणी ग बाई माझी" असे ढोल वाजविले जातात.मला कशी दागिने आणि भारीच्या साड्यांची मुळ्ळीच आवड नाही ... असे वारंवार सांगितले जाते.... आणि गंमत म्हणजे ह्या बायकांचे dp /फोटो ह्या विधानाच्या अगदीच विपरीत सत्य उघड करत असतात .मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली अशातला हा प्रकार..... दागिन्यांची आवड नाही असे असूच शकत नाही... कदाचित घालायची सवड आणि सांभाळायची जोखीम न परवडणारी असू शकेल.अर्थात दागिन्यांचा संबंध कोणत्याही विशिष्ट धातूला अधोरेखित करीत नाही बरं! हिऱ्यांचे, सोन्याचे किंवा सध्या चर्चेत असणारे प्लॅटिनमचे महागडे दागिने म्हणजेच दागिने असतात का हो?? आमचे जग खऱ्या अर्थानं पिवळं धम्मक केलं ते 2 ग्रॅम, बेनटेक्स वगैरे दागिन्यांनी... पण भारतीय स्त्रियांना सोन्याची चमक भुरळ घालते यात शंकाच नाही.
एका थोर विदुषिने फेसबुकवर #नवऱ्याने पाडव्याला मला खरे अनमोल दागिने भेट दिले ... असे म्हणत स्वतःचा पुस्तकांसोबत फोटो टाकला... मी कशी पुस्तकप्रेमी आहे हेच यातून दाखवायचे असावे पुस्तके अनमोल निश्चित आहेत...ते भेट म्हणून देणे यात काहीच गैर नाही मात्र पाडव्याला नवऱ्याने पुस्तके भेट देणे... म्हणजे पाणीपुरीवाल्याकडे पिझ्झा मागण्या सारखं आहे... मला तर कल्पनेत सुद्धा ती महान हस्ती एखाद्या समारंभात गळ्यात हातात पुस्तके बांधून दिसते☺☺ कदाचित काही पुस्तके वाचून तरी तिच्या विचार आणि वर्तनात बदल होईल अशी आशा बिचाऱ्याला वाटली असावी...पुस्तके आणि दागिने ह्यांची तुलना म्हणजे ईश्वराची नश्वराशी तुलनाच आहे... प्रत्येकाची योग्य जागा असते तेथेच ते शोभून दिसते...माझ्यासारख्या संसारी व्यक्तीला नश्वराने भुरळ घातली तर चूक काय त्यात?...मुळातच लोक पुस्तके किती वाचतात? त्याहीपलीकडे त्या पुस्तकात नेमके काय आहे? ह्या अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा होण्यापेक्षा पुस्तकांची आकर्षक ,महागडी प्रदर्शने दिवाणखान्यात मांडून मी कशी उच्च अभिरुची बाळगून आहे.. मराठीचे संवर्धन, संरक्षण जणू माझेच खांदे वाहत आहेत... अशी जाहिरातबाजी हल्ली सोशल मीडियावर प्रकर्षाने होतांना दिसते.....अश्या पोस्ट चुकूनही फॉरवर्ड होणार नाही (थोडक्यात आपापल्या नवऱ्यापर्यंत जाणार नाही )याची आपण प्रत्येकीने दक्षता घ्यायलाच हवी.... त्यात पुस्तके भेट देतांना मागच्या अनेक वादांचा वचपा नवरा काढू शकतो...जरा खर्चाला सैल असणाऱ्या बायकोला ,'पैश्याने पैसा वाढवूया' अश्या सारखे पुस्तक तर हात राखून खर्च करणाऱ्या बायकोला 'आर्थिक मंदीची गणिते'... असे पुस्तक खऊट नवरे भेट देतील.आर्थिक नियोजनात लक्षच न घालणाऱ्या आळशी बायकोला 'शेअर बाजाराचा अभ्यास' तर स्वयंपाकाची जरा कमी आवड असणाऱ्या बायकोला ...' सहज सोप्या 101 पाककृती' हे पुस्तक भेट म्हणून मिळणार... बरं पुस्तक देऊन गप्प बसेल तो नवरा कसला? थोड्या दिवसांनी वाचलं का पुस्तक ? एव्हढं प्रेमानं भेट दिलेलं म्हणून भुणभुण सुरू होईल... नंतर घरापासून जगापर्यंतचे आर्थिक धोरण कळल्यावर डोक्याला बाम लावायची वेळ येईल......नको रे बाबा ! त्यापेक्षा दागिनाच आवडेल मला...अगदी शे पाचशेची नोट सुद्धा चालेल.
अनेकदा पुरुष मंडळीचा... सोन्याचे दागिने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट कशी आहे? त्याच पैश्यांचे fd चे दहा वर्षांनी किती मिळतील आणि shares चे 18% रिटर्न्स कसे मिळतील... हा चर्चेचा अत्यंत आवडता विषय असतो.अश्या वेळी आपण अजिबात डोके खर्च करू नये... नवऱ्यापुढे..."आपण कित्ती हुशार आहात" हा भाव चेहऱ्यावर आणावा...शक्य झाल्यास इतर मंडळींसमोर "यांचं आर्थिक नियोजन वाह! वाह!" असा एक छोटेखानी कौतुक सोहळा जरूर करावा. मंडळी आपल्या माहेरची माणसं असतील तर कृतज्ञता चेहऱ्यावरून ओसंडून जायला हवी...मंद आचेवर शिजत घातलेल्या भातासारखा हा प्रकार आहे.घाईगडबड करून नुकसान करून घ्यायचं नाही...तर अश्या कौतुकाने खुश झालेला नवरा ,"तुला काय पाडव्याचं गिफ्ट देऊ राणी? "असं गोडीत येत विचारतो...तेव्हा चपखल दागिना मागता यायला हवा... यासाठी तुमचा गृहपाठ आधीच तयार हवा... साधारण सोन्याचा भाव काय आहे? नवऱ्याला बोनस वगैरे किती मिळाला आहे... आणि लग्नाला साधारण किती वर्षे झाली ह्या त्रिसूत्रीच्या गुणाकारातून आपल्याला योग्य उत्तर लाभू शकते. फॅक्टर 1सोन्याचा भाव काढणे फार काही अवघड नसते पण फॅक्टर 2 अर्थातच सहजी कळत नाही ... आपल्याला कितीही वाटत असेल की पाटल्या कराव्यात पण नवऱ्याच्या बजेट मध्ये 2 बांगड्या बसत असतील तर पाटल्यांचा हट्ट धरणे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं ... योग्य वेळी योग्य मागणी पदरात पाडून घेणे जमले पाहिजे... हळूहळू लग्नाला जसजशी वर्षे होऊ लागतात तसतसे हे स्कील जमू लागते.. मात्र एक नुकसान होते... घटत्या उपयोगीतेच्या नियमानुसार आपले रुसणे, अबोला, आपटधोपट .. ह्यांचा उपयोग लग्नाला होणाऱ्या वर्षाबरोबर घटत जातो.हळूहळू तर लग्नाला झालेली वर्षे वाढू लागली की आपला अबोला नवऱ्याला गोड वाटू लागतो...म्हणूनच फॅक्टर 3 लग्नाला झालेली वर्षे अत्यंत महत्वाची आहेत.
आमचा नवरा नाही बाई असलं काही विचारत... असे वाटत असेल तर गणिताचा नसून भाषेचा अभ्यास करायला हवा आहे. मावस नणंदेच्या लग्नाहून परतल्यावर ,"माझे हात कसे तरीच दिसत होते .. अगदीच सुने" असे तुमच्याच मामी म्हणाल्या याचे ... आवडीचा नाश्ता देतांना रसभरीत वर्णन असावे... ह्या वेळी बेफिकीरीचे भाव असावे...(वाईट वाटलं तरी डोळ्यांतून पाणी काढू नये.. त्याचा उपयोग पुढेे)... भिशीहून परतल्यावर..." दोन बांगड्यांच्या जोडीला अजून दोन करून घे ग.. हात भरून दिसेल " असे मैत्रिणींनी म्हटल्याचे पुन्हा पुन्हा सांगावे... आणि अखेर एखाद्या जावेने किंवा शेजारणीने पाटल्या किंवा बांगडया केलेल्या दाखवल्या की ,"माझी कित्ती दिवसांची इच्छा होती" म्हणून डोळ्यांच्या कडेला राखलेले पाणी बाहेर काढावे. या संधीचं सोनं करत आपण कसं मन मारून जगतो ...संसाराला प्राधान्य देतो ह्याचे प्रास्ताविक मांडावे.एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की नवऱ्याचा मेंदू आपल्यासारखा सरसकट सगळे साठवून ठेवत नाही..त्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीच तो सांभाळतो. आपलं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्या दृष्टीने आवश्यक माहितीची आपण वारंवार आठवण देत राहावी.
दागिने प्रत्येक स्त्रीचं हक्काचं धन...ज्यावर तिचा संपूर्ण अधिकार असतो... मात्र स्त्री धन म्हणून गौरवण्यात आलेल्या दागिन्यांचे मोल ; प्रत्येक स्त्री साठी पैश्यात नसतंच मुळी... लोकांसाठी अमुक ग्रॅम किंवा तोळे असणारा दागिना तिच्यासाठी आठवणींचा ठेवा असतो...फक्त शरीर जरी तो दागिना धारण करत असेल तरी खरंतर तिचं मन त्यात अडकलेलं असतं.... लग्नातलं मंगळसूत्र, दोघांनी जोडीनं घेतलेल्या साखरपुड्याच्या अंगठ्या... इथपासून आईच्या बांगड्या.. ताईचा तन्मणी, सासूबाईंचा पोहेहार,आजेसासूची नथ... इथपर्यंत ही यादी वाढती असते. दागिने जितके जुने तितके त्याचे महत्व अनन्यसाधारण असते...कारण त्याच्या वजनाइतकेच किंवा काकणभर अधिकच प्रेम, कौतुक, माया,ओढ यांत ओथंबलेले क्षण त्यात गुंतलेले असतात.आजकालच्या use n throw पिढीसाठी कदाचित वेडेपणा असेलही ... मात्र पिढ्यानपिढ्या वापरलेला दागिना आगळ्या झळाळीचा असतो... एका पिढीचा संघर्ष, कसोटीचे क्षण, सुखाच्या अनुभूती आणि आशीर्वाद यांचा तो जिवंत वारसा असतो....हा अनुभव शब्दांत मांडणं कदाचित अनुभवण्याइतकं सोपं नाही.... तरीही प्रयत्न करते
लग्नानंतर अनेक वर्षे सणासुदीला चांदीची उपकरणे नी दागिने काढून वापरली जायची नी जबाबदारीने ती आली तशी परत जात. घरातील जेष्ठ म्हणून सासूबाई हे काम जबाबदारीने करत... हळूहळू वर्षे सरली... अन् ही कामे जबाबदार गृहिणी या नात्याने माझ्यावर सोपविली गेली...त्याच वेळी मला "ती" सापडली... मोहक सुरेख देखणी चांदीची डबी...सुरेखशी वेलबुट्टी ची नक्षी....उघडून पाहते तर काय ?....लालबुंद मखमालीवर पहुडलेली अप्रतिम सुरेख ठसठशीत नथ... डबीवर आजेसासूबाईंचे नाव कोरलेलं.'पाहताच ही बाला कलीजा खलास झाला'... आधीच नथ मला प्रचंड प्रिय त्यात ही खरेच अप्सरा... मी प्रेमात पडले अक्षरशः... (होय! बायका दागिन्यांच्या प्रेमात पडतात..नवल नाही त्यात काही)... खरंतर... एकुलती सून म्हणजे ती माझीच होती पण ऑफीशिअली ती माझी नव्हती...लगेच सासूबाईं ना विचारणा केली ... त्या साफ विसरून गेल्या होत्या त्या नथेंबद्दल... ,"अग !माझ्या सासूबाईंची नथ ती...एकतर ती चांगलीच जडजूड आणि तिची दांडी खूपच जाड .. तुम्ही आजकालच्या पोरी कश्याला वापरताय... म्हणून मागे पडली .. त्यात तुझं नाकही टोचलेलं नाही ना!" म्हणजे थोडक्यात दिली असती पण नाक टोचलेलं नाही.. प्रश्न मोठा बिकट होता. मी खरंच नाक कधी टोचलच नव्हतं.. इतक्या वेगवेगळ्या चापाच्या नथ मिळत असतांना कश्याला टोचायचं नाक?? असं सारं माझ्या चांगलंच नाकाला झोंबलं.☺
नवऱ्याच्या कडव्या विरोधाला मोडून मी शांतपणे नाक टोचून घेतलं... या वयात टोचलेलं नाक पाहून मैत्रिणींनी हात जोडले... सहनशक्तीची खरंच कमाल होती.पुढे त्यात तार फिरवत राहणे, मग सुजणे, फुगणे सगळे प्रकार एक वर्षभर पुरले.. फक्त नाक टोचून भागणार नव्हतेच. नथेची दांडी चांगलीच मोठी होती.अखेर नाकातून तार काढून लवंग घाल, शोपेची काडी घाल करत ते मोठे केले. एक जाड तारेची रिंग घालून घेतली.. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता.. आणि कठिणही.. अखेर रिंग सेट झाली...आणि दिवाळीच्या दिवशी हिमतीने मी ती नथ घातली... काहीही त्रास न देता ती इतकी चटकन गेली की जणू तिला माझी ओढ, माझी धडपड सारे समजले होते. नथ सुरेख तर होतीच पण त्याहूनही काहीतरी अधिक त्या क्षणी मला मिळालं...कदाचित मी मनानं 100% रहाळकर झाले...इवलासा दागिना, मला अप्राप्य नव्हता पण दोन अडीच वर्षे त्यासाठी मी खूप काही केलं ...ती घातली नि मनात आनंद ,अभिमान, आदर, रुबाब या साऱ्या संमिश्र भावनांचा कल्लोळ झाला..... याचसाठी केला होता अट्टाहास....शब्दशः खरे होते.
म्हणूनच मी नेहमीच म्हणते बायकांना कितीही वेड्यात काढा दागिन्यांसाठी... त्यांचं ते वेड पुरुषांना समजण्या पलीकडचं असतं.असं म्हणतात... "दागिना घालतो तो अवयव तो दागिना अधोरेखित करतो, अधिक उठावदार अधिक आकर्षक बनवतो".... मी तर म्हणेन प्रत्येक दागिना तिचं कुटुंबातील गुंतलेपण अधोरेखित करतो.दागिना म्हणजे तिचा सासर माहेरचा सार्थ अभिमान असतो... "दागिने घालून मिरवणे" म्हणण्याची जी पद्धत आहे ती याचसाठी... हा दागिना तिचा अडीअडचणीला हक्काचा आधार असतो.वेळप्रसंगी वाईट वेळेला त्यातून पैसा उभा राहू शकतो... मात्र सतत चेन स्नॅचिंग च्या केसेस, लूट,भूल घालणे वगैरेंमुळे अधिक धोक्याचा, जोखमीचा भाग बनला आहे.पहाटे अंधारात सहा आठ तोळ्यांचे दागिने घालून फिरायला निघणाऱ्या स्त्रियांना तिथेच दंडवत घालावा वाटतो... जिमला किंवा योगा, एरोबिक्स ला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वर पाटल्या बांगड्या घालून येणाऱ्या बायकांमध्ये मला मिनी माऊस दिसते☺..(थोडक्यात कार्टून). "दागिना घालून लाखाला, हात शेअर रिक्षाला" ही नवी म्हण तर मी मराठीला द्यायलाच हवी.. कशाला आयांनो , बायांनो? काळजी घ्या की जरा... दागिन्यांची. काय होतं...आमच्या नवऱ्याला आयतच कोलीत मिळतं ना!अश्या मंगळसूत्र चोरीच्या बातम्या ते तिखट मीठ लावून वाचून दाखवतात....अश्या वेळी काय करायचं? बरोब्बर! "आजच्या काळात दागिने घेणे मूर्खपणा आहे.. पैसा पाण्यात जातो...त्यापेक्षा शेअर्स उत्तम एकदा मला शेअर बद्दल अभ्यास करायचा आहे....." वगैरे वगैरे मी बोलत बसते. खरेतर, पाटल्याचं design केव्हाच पाहून ठेवलंय... तुम्हाला तर माहितीच आहे नुसत्या बांगडयानी हात सुनाच दिसतो ...☺
©यशश्री रहाळकर

लेख अन नथ दोन्ही अतिशय सुबक अन सुंदर सुद्धा
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणे छान लिहीलस
उत्तर द्याहटवा