काल वटपौर्णिमेच्या पूजेला एक जण गाऊन वर आलेली पाहून माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या उडी मारून बाहेर यायच्या बाकी होत्या ..... तिला वेळ नसल्याने अशी वेळ आली होती☺☺ तर दुसरी एक जण जीन्स वर ओढणी गुंडाळून घेत वर भलं मोठं कुंकू लावून "सेल्फी विथ वड ऑन वटपौर्णिमा " असा दिखाव्याचा वड पूजून वडाला शेंडी लावून गेली... वड मनात म्हणाला असेलही ,"एव्हढी मोठ्ठी शेंडी ! एव्हढी तर पारंबी नाही माझी"... एका जेष्ठ आजीबाईंच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली,"शेवटी भावना महत्वाची!"माझा नंदीबैल...झाला. काल वडाची आणि वडासारख्या पिकलेल्या माणसांची पोटातून दयाच आली.मागच्या पिढीला पुढच्या पिढीतील एकंदर पेहरावांची स्थित्यंतरे बघावी लागतात हे खरेच! मात्र ही स्थित्यंतरे त्यांच्या विश्वासाची ,भावनांची लक्तरे वेशीवर टांगत असतील तर... .. त्यांनी काय पांघरावे. आजीची गोधडी नकोशी असणारी ही पिढी.
एकंदर सध्याचा फॅशन ट्रेंड पाहता आपण पुन्हा आदिमानवासारखी पानं गुंडाळून राहू लागलो किंवा संपूर्ण दिगंबर अवस्थेचा ट्रेंड आला तरी मुळीच नवल वाटणार नाही.मुळात थंडी ऊन वारा पाऊस ह्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून शोधलेल्या पर्यायांचा वापर पुढे लज्जारक्षणार्थ होऊ लागला ...एकंदर परीधानावर ऋतुमान/ हवामानाचा प्रमुख प्रभाव होता. मानवाच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांवर पुढे त्यावर धर्म, देश, संस्कृती ,परंपरा, फॅशन वगैरेंचा प्रभाव पडू लागला .. आणि साधी सरळ कपडे घालणे ही क्रिया बहुआयामी होत गेली. कुणी काय घालावं याच स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं ... ते अगदी शतशः मान्य आहेच ... स्त्री काय किंवा पुरुष काय वाटेल ते घाला किंवा घालू नका .. असे म्हणायची वेळ आली आहे . कधीकधी तर कपडे घालताहेत हेच उपकार मानावे अशी देखिल टोकाची परिस्थिती येऊन ठेपली आहे. सुजाण माणसांपुढे मुळात कुणी काय घालावं हा प्रश्न नाहीच ... प्रश्न आहे कुठे काय घालावं???
साधारण एका वर्षांपूर्वी नाशिक मधील एका मंदिराबाहेर पाटी होती,"स्त्रियांनी गाऊनवर व पुरुषांनी बर्म्युडा घालून मंदिरात प्रवेश करू नये." नाशिक सारख्या परंपरांचा सार्थ पुरस्कार करणाऱ्या ठिकाणी हा नियम करायची वेळ यावी... नवल नाही का! पण गेल्या वर्षभरात ह्या स्वरूपाच्या पाट्या साधारण प्रत्येक मंदिराबाहेर दिसू लागल्या. लोकांचे कुठे काय घालावे हे भान मावळले आहे हे मात्र खरे! आधुनिक पेहराव / सोयीचे कपडे यांचा मी कायम पुरस्कार करतेच ... म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रिया जेव्हा पंजाबी ड्रेस, कुडते, जीन्स यांवर आत्मविश्वासाने वावरतात तेव्हा मला एक स्त्री म्हणून त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र स्त्रिया जेव्हा नाईट ड्रेस /गाऊन वर भाजी बाजारात हिंडतात किंवा मुलांना शाळेत आणायला सोडायला जातात ... तेव्हा मनांत अनेक प्रश्नांची गर्दी होते.... यातून काय दाखवितो आपण ,आम्ही कित्ती बिझी आहोत हे ??? की आम्ही कित्ती साध्या सरळ (बावळट ) आहोत हे??
रविवारच्या बाजारात एक आई मुलीची जोडगोळी भाजी खरेदी करीत होती... मुलगी साधारण 14/15 ची तिचा मिनी स्कर्ट वारंवार ती खाली खेचत होती ... पाहणारे खेडूत भाजीवाले आणि घालणारी दोघांचीही गैरसोय ... का घालायचे असे कपडे ?? अनेकदा पार्क मध्ये मुलांना खेळायला म्हणून आणलेलं असतांना त्यांचे हात पाय करकचून अवघडून टाकणारे मॉडर्न कपडे घातलेले दिसतात... त्या चिमण्यांना धावता येत नाही की खेळता येत नाही ... कश्याला हा सोस.. ऑफ शोल्डरच ओझं त्या इवल्या खांद्यांवर का? पार्टीत घाला की हवे ते पण खेळतांना तर मूल म्हणून जगू द्या. कुठे काय घालायचे हे भान खरेतर आधी पालकांना यायला हवे... मी पालक म्हणतेय फक्त आई नाही... पॅरेंट-टिचर मिटिंग ना बर्म्युडा च्या निम्मी शॉर्ट घालून आलेले थोर पप्पा मी पाहिले आहेत ... बिचारी पोराची टिचर मोंन्टेसरी कोर्स नुकतीच पास केलेली पोर ... मुलांना काय वळण लावणार जिथं बापाला वळण नाही.
या शॉर्टस नावाच्या राक्षसानी तर धुमाकूळ घातला आहे ... या वीतभर छोट्या कपड्याची किंमत जवळपास भारीच्या पाच सहा साड्यांइतकी असते..☺ हा प्रकार खरेतर स्पोर्ट्स क्लोथ या कॅटेगरी मधला ... खेळाडूंना खेळ सोयीचे व्हावेत म्हणून कापून अर्धा केलेला... समुद्रकिनारा, खेळांचे मैदान ,ट्रेकिंग अश्या ठिकाणी हा पोशाखाचा प्रकार योग्य पण सर्रास दररोज शाळा / कॉलेज आणि क्लासला घालून माणूस.... फारतर पहिलवान दिसू शकतो ... पाश्चात्य देशातील निमुळत्या शरीरयष्टीला साजेसे असणारे हे कपडे भारतीय व्यक्तींनी घातले तर खरेतर अत्यंत बेंगरुळ ध्यान दिसू शकतो ह्याची जाणीव ह्या कॉपी कॅट्स ना बहुदा नसतेच.... अनेकांचे पाय ह्या shorts मध्ये साक्षात गजगामिनी स्वरूप प्रकट करत असतात. तरीही माझा अजिबात आक्षेप नाही बरे! घाला काय घालायचे ते .. पण लग्नकार्यात अश्या अर्धउघड्या करवल्या पहिल्या की कितीही ठरवलं तरी प्रतिक्रिया तडक बाहेर पडतेच.
सध्या जास्तीत जास्त उघडा तितका महाग असं समीकरण कपड्यांच्या बाबतीत पाहायला मिळतं.सध्या जीन्स पेक्षा त्या फाटक्या ripped jeans दुप्पट हो!...ऑफ शोल्डर( ढगळ झाल्याने खांद्यावरून घरंगळणारा) , कोल्ड शोल्डर (इंजेक्शन बाह्या) एव्हढंच काय शोल्डरच नको (tube top)... घाला माऊली ... बिचारे मंदिरातले देव काही म्हणणार नाही . शिवाय भाव महत्वाचा हे टूमण आहेच ; पण प्रसंगाची तर लाज बाळगा ..मंगळागौरीला हल्ली मुली असे कपडे घालतात की साक्षात मंगळागौर उठून चौरंगा वरचे झाकलेले वस्त्र मुलीवर पांघरेल अशी भीती वाटू लागते. डोहाळे जेवणालाही हल्ली मुली सर्रास फ्रॉक घालतात... खास हजारो रुपये देऊन बोलविलेला ग्रुप गाणी गात असतो ... "शालू हिरवा चोळी हिरवी हाती भरला हिरवा चुडा ???" डोहाळे जेवण आपल्या षोडश संस्कारातील महत्वाचा संस्कार... बेबी शॉवर करायचा असेल त्यांनी खुशाल वाट्टेल ते घालून फोटो काढावेत ... ना आलेल्या जेष्टांची चाड ना देहाची भीड. असाच प्रकार मी मौंजीत देखिल पाहिला ... बटू इवलासा आठ वर्षांचा , त्याचे बाबा सोवळ्यात मात्र माय माउलीने designer वन पीस घातलेला... त्यावर शोभतं नाही म्हणून गळ्यात मंगळसूत्र नाही आणि कपाळाला टिकलीही नाही .
या बाबतीत मला साऊथ इंडियन लोकांचं प्रचंड कौतुक वाटतं. शिक्षणाचं प्रमाण सर्वाधिक, मोठमोठ्या पोस्टवर तरीही त्यांच्या पूजा पहा किंवा मंदिरात जाऊन पहा ... सात्त्विकता ! शुभ्र पांढऱ्या साड्या पुरुषांचाही पारंपारीक पेहराव ... त्याचा त्यांना अत्यंत अभिमान असतो. तसेच पंजाबी लोक देखिल खूप मॉडर्न असतात .. सगळ्या मुली अगदी मस्त लेटेस्ट कपडे घालतात पण मंदिर किंवा अन्य प्रार्थना स्थळांना डोक्यावर पदर डोळ्यात आदर! आम्ही मात्र ते सारं सोडून कसं देता येईल, स्वातंत्र्याच्या डरकाळ्या फोडून धुडकावून कसं लावता येईल हाच विचार करीत असतो.
अनेकदा तरुण मुली अमुक एक हिरॉईन आदर्श मानून तिने सिनेमात घातलेले कपडे follow करीत असते. त्या मुलींच्या आया कंटाळून जातात समजावून ... ह्या अश्या वेड्या फॅन्स नी सामान्य आयुष्यात ती नटी किती साधे कपडे घालते हे जरूर पाहिले पाहिजे... एअरपोर्ट वर, जिमला जातांना किंवा इतर वैयक्तिक प्रसंगात पहावं.शूटींग पुरत्याा घालण्यात येणाऱ्या चिंध्यासाठी त्यांच्याकडे बॉडी गार्ड, सेक्युरिटी, बाऊन्सर्स चा ताफा असतो हे मुळीच विसरू नये.शेवटी कपड्यांचे मूळ उत्पत्तीस्थान काय आहे तर... कपडे अंग झाकण्यासाठी आहेत ते अधोरेखित करण्यासाठी नव्हे.... या निमित्ताने विदर्भात अत्यंत प्रसिद्ध म्हण आठवते.. .. ज्याच्यासाठी लुगडं ...बाई तेच माझं xxx माहिती असेलच !
©यशश्री रहाळकर

How true.....well said yash
उत्तर द्याहटवाखूपच छान!
उत्तर द्याहटवाखरं आहे, कुणी काय आणि कुठे घालावे एव्हढं तरी कळायला हवं
उत्तर द्याहटवामस्त लिहिले आहे
Very true
उत्तर द्याहटवा100% agree..कपडे हल्ली प्रदर्शन जास्त करतात अन जे लपवायच तेच दाखवतात. एकदम tightfit त्यातला अजून एक प्रकार! ! ! सगळ झाकलेल असत पण इतक फिट असत की घालतात कसे हा प्रश्न पडतो मला वरून शोभा दिसायची ती दिसतेच
उत्तर द्याहटवा