पूर्वार्ध:-
https://kattayashashri.blogspot.com/2019/10/blog-post_31.html?m=1

समोरच्या समईचा प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले....देवाला हात जोडून वळत नाही तोच घरातला कोलाहल कानी पडला. बंटीचे बाबा आणि आजी यांचे भांडण विकोपाला गेले होते.दोघांनाही बंटीची काळजी होतीच पण आपापल्या मुद्द्यावर दोघे ठाम होते... आजींच्या मते... सुजॉयने बंटीला झपाटले होते... त्याला बाहेरची बाधा झाली होती... तर बंटीच्या बाबांसाठी ह्या साऱ्या अंधश्रद्धा होत्या, थोतांड होते.त्यांच्या मते बंटीचा मानसिक तोल ढळला होता...त्याला उपचारांची गरज होती. मी दोघांनाही शांत करत म्हणाले,"आपण सारेच आपापल्या परीने प्रयत्न करूया... सुजॉयला बंटीपासून वेगळं करायचं आहे .. हे नक्की. मी ते करणारच..." तेव्हढ्यात आतून खदाखदा हसत बंटी बाहेर आला...,
" बंटीची आई.. कशाला हवाय तुम्हाला हा असला बावळट, बिंडोक, ऍव्हरेज मुलगा... भित्रा कुठला! नेहमी त्याला सांगायचा ना! बघ त्या सुजॉयकडे .. शिक त्याच्याकडून काहीतरी.... तुम्हाला माझ्यासारख्या स्मार्ट, क्लास मध्ये फर्स्ट येणारा.. हुशार मुलगाच हवा होता ना!... तसाही तो बंटी तुमचं प्रेम डीझर्व करतच नाही.सुजॉय हक्कदार आहे सगळ्याचा... सगळ्यांचे लाड, लक्ष, आईचे प्रेम ... सारे सुजॉयचे आहे..." पुन्हा त्याचं ते अंगावर काटा आणणारं विकल हास्य... आम्ही सारे जागीच गोठून गेलो होतो.क्षणात बंटीचा आवाज बदलला... ढसाढसा रडत बंटी माझ्या गळ्यात पडला... " आई सांग ना सुजॉयला... जा आता . सोडून दे मला... मला नकोय तो ... नकोय माझ्या आत... मला म्हणाला... माझ्या विश कॉम्प्लिट नाहीत.. मला हेल्प कर त्या पूर्ण करायला... आई हेल्प करणं चांगलं असतं ना! तूच सांग? मी हेल्प केली आता तो जाणार नाही म्हणतो... मलाच बाहेर जायला सांगतोय...आई मला नाही जायचं तुला सोडून..." मोठी किंकाळी मारून बंटी बेशुद्ध पडला. डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू झाले.. बंटी खंगला होता... मानसिक ताणाने ताप आला होता... सुजॉय माझ्या बंटीपेक्षा प्रभावी होत होता..माझं पिल्लू दुबळ होतं.. पण त्याची आई दुबळी नक्कीच नव्हती.
खाली उतरताच मी एक मोठ्ठा धोंडा उचलला आणि त्या काळ्या सायकलवर घातला.. दामाजी पहातच राहिला...मी पुन्हा पुन्हा त्वेषाने धोंडा उचलत होती नि सायकलवर पुन्हा पुन्हा घालत होती... अखेर सायकलचे तुकडे तुकडे झाले तशी बंटीला शुद्ध आली... त्याने डोळे उघडले... बंटीच्या बाबांनी वरूनच आवाज देऊन मला बोलावले...माझ्या हातानी दोन घोट पाणी पाजतांना मी बंटीला म्हणाले...,"बंटी राजा.. मला तू खूप खूप आवडतोस... का? माहितीये.. कारण तू सगळ्यांना मदत करतोस... अरे! अभ्यास करून कुणीही फर्स्ट येईल पण .. असा स्वभाव मात्र कुणाकडे नसतो बरं!" सारं कळून बंटी फिकट हसला.. पुन्हा डोळे मिटून घेतले.दामाजीला परिस्थितीच गांभीर्य कदाचित न सांगताच कळलं असावं...तेव्हढ्या वेळात त्याने ते सायकलचे तुकडे गोळा करून कुठल्याश्या भट्टीत स्वाहा! केले .
सुजॉयला जाऊन आज 28 दिवस पूर्ण झाले होते. सकाळी बंटी उठला तोच गरम शिऱ्याची मागणी करत ... त्याला खूप भूक लागली होती...मी कांद्याचे खमंग थालीपीठ त्याच्यापुढे ठेवत म्हटले..."माझ्या बंटीला गोड मुळीच आवडत नाही." संतापाने प्लेट उधळून देत बंटी म्हणाला, "बंटीची आई.. मला शिरा हवाय..मला शिरा आवडतो." मी शांतपणे म्हणाले,"मी बंटीची आई आहे ... मला माहितीये त्याला शिरा मुळीच आवडत नाही." ...बंटी तोंड फिरवून बसला.. मी मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.. नी एकेक घास स्वतः त्याला भरवू लागले," बंटी.. तू लहान असतांना मी अशीच तुला एकेक घास भरवायचे... तू घरभर फिरायचा नी मी तुझ्या मागे मागे ताट घेऊन..."त्याचं बालपण आठवेल तसं तसं त्याच्याच पुढे मी मांडू लागले...बंटी शांत झाला होता.. माझ्या बोलण्यात रमला होता.त्याच्या बाबांनी आम्हाला पाहिलं नी लहानपणच्या त्याच्या फोटोंचा अल्बम समोर ठेवला.. एकेक फोटो दाखवून आम्ही त्याचे किस्से त्याला सांगत होतो... आणि काही गमतीशीर प्रसंगांची उजळणी करीत होतो....एका फोटोत वर्षाच्या बंटीने सगळ्या अंगाला आईसक्रीम फासून घेतलं होतं... तो फोटो पाहून मी हसत हसत बंटीला म्हणाले,"बंटी हे सारे क्षण म्हणजे आमचा अनमोल ठेवा आहेत.. तू कित्तीही मोठा झालास ना तरी आम्हाला तुझे हेच दिवस आठवणार..."बंटी गोळ्या घेऊन शांत झोपला.
त्या आईस्क्रीम च्या फोटोमुळे मला अमूल पार्लरची आणि शिंदे आजोबांची आठवण झाली... खरेच या धामधुमीत त्यांना भेटायला जायचा विसरच पडला होता ... मी यांना तडक गाडी काढायला सांगितली ... दुकानातील मुलाकडून शिंदे आजोबांच्या घराचा पत्ता घेऊन आम्ही निघालो... एव्हाना त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. आजोबा पार खंगले होते... त्या अपघाताचा विषय निघताच त्यांच्या पत्नीने हात जोडले...,"आत्ता कुठं जरा सावरले आहेत आता पुन्हा तो विषय नको" म्हणून गयावया करू लागल्या...मी त्यांचे पाय धरले...अक्षरशः पदर पसरला... माझ्या बंटीला जे काय झाले ते सारे सांगू लागली..आतल्या खोलीत पडल्या पडल्या बहुदा शिंदे आजोबा सारे ऐकत असावेत... हळूहळू चालत ते बाहेर आले...बायकोला हातानेच थांबण्याची खूण करत.. बोलू लागले... बहुदा बोलतांनाही त्यांना खूप कष्ट पडत असावेत... " पोरी माझ्या मुलीच्या वयाची तू..कित्येक वर्षे रोज सकाळी भेटतो तुला...त्या मुलाचा अपघात काय नाव म्हणालीस???"..."सुजॉय".मी मध्येच घाईने उत्तरले...जरा दम खात शिंदे आजोबा म्हणाले,"हो.. तोच.. तोही यायचा सकाळी शाळेच्या बस करता...त्या दिवशी.. मी दुकानात कुणी नाही म्हणून बाहेर उगाच फेऱ्या मारत होतो... एव्हढ्यात एक मोठ्ठ ट्रेलरचं धूड धडधड आवाज करत जाऊ लागलं... माझ्या दुकानापुढे स्पीड ब्रेकर आहे ना!... तेव्हढ्यात मागून येणारं हे पोरगं .. कसं कोण जाणे सायकल डिव्हाईडरवर आढळून ट्रेलरमध्ये ओढलं गेलं... अरे अरे! म्हणेपर्यंत ड्रायव्हर पळाला... दहा बारा वर्षाचा इवला जीव... कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता"......
आजोबांना धाप लागली ते पाणी पिण्यासाठी थांबले... माझ्या डोळ्यासमोर जणू अख्खा प्रसंग उभा राहिला... भयाची एक शिरशिरी उभी राहिली.पुन्हा विषयाकडे वळत आजोबा म्हणाले," त्याही अवस्थेत पोरगं उठून बसलं ... एक आचका दिला नी देह सोडला.. हे सारं एकट्या मी पाहिलं होतं... त्याचा काळ आला होता हेच खरं! गर्दी जमली.. पोलीस आले.. सारे सोपस्कार झाले..मन उतरलं हे सारं पाहून.. दुकान वाढवून संध्याकाळी घरी निघालो तो हा त्या स्पीड ब्रेकरवर बसलेला....तसाच कवटी फुटून मेंदू बाहेर आलेल्या अवस्थेत... माझ्याकडे पाहून ओळखीचं हसला.. इवलासा जीव तो काय इच्छा असतील त्याच्या?जग कितीसे पाहिलं असेल त्यानं?... मी फार विचार केल्याने असेल भास झाला... असं वाटून मी सोडून दिलं... ... दुसऱ्याही दिवशी दुकान वाढवून जरा लवकरच घरी निघालो... पुन्हा तोच प्रकार...तिसऱ्या दिवशी तसेच घडले... आता मात्र तो उठून माझ्याजवळ आला... मला मदत करा माझ्या विश पूर्ण केल्या की मी सुटेन म्हणाला...माझ्यावर कुणी विश्वास ठेवे ना .... मी दुकानात जाणेच बंद केले...पण त्या दिवसापासून शांत झोप नाही मला... डोळे मिटले की तोच मुलगा येतो नि पुन्हा पुन्हा गयावया करतो... डोकं फुटलेलं.. मेंदू लोम्बतोय .. अंग रक्तानं माखलंय... कपाळावरन रक्ताची धार ओघळतेय...." हे सांगताना शिंदे आजोबांचे डोळे भीतीने मोठमोठे होत गेले..."पुरे पुरे ! नाही ऐकवत "म्हणत मी कानावर हात ठेवले.
शिंदे आजोबांचा निरोप घेतांना एव्हढीच उकल झाली होती की सुजॉयची इच्छा अपूर्ण राहिली होती... काय असेल? हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या घरातून बाहेर पडतांना बंटीच्या बाबांनी प्रांजळपणे कबूली दिली, "हे असं काही असू शकत ह्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.बापरे! भयंकर आहे हे." मी आपल्याच तंद्रीत होती...काय असेल बरं मनात ह्याच्या?? त्याच्या घरी शोधायला हवे..तडक आम्ही देशपांडे आजींचे घर गाठले...त्या बऱ्याच सावरल्या होत्या.. सगळी हकीगत थोडक्यात त्यांना ऐकवली...बंटी सुजॉयचे माध्यम होता... त्याच्या अपूर्ण इच्छेविषयी मात्र त्यांना सांगता आले नाही.तेव्हढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा म्हणजे सुजॉयच्या आईचा फोन आला.. तिचीे flight एअरपोर्ट ला लॅन्ड झाली होती....देशपांडे आजी वेदनेने पिळवटून म्हणाल्या, "काय दुर्दैव विलास पहा! सुजॉयच्या आईच्या नशीबात त्याची भेट तर नव्हतीच पण अखेरचे दर्शनही नव्हते. आता येतेय ती उद्या महिना होईल सुजॉयला जाऊन." ही स्वतः च्या करियर मध्ये व्यस्त असणारी...अत्यंत यशस्वी व्यावसायिक... आणि तितकीच अयशस्वी आई देखिल माझ्या मनात आलं. झटकन लाईट लागावा तशी सारी समीकरण मनात स्पष्ट झाली. सुजॉयने जाण्यापूर्वी आमचा निरोप घेतला होता... बंटीची छबी डोळ्यात किंवा मनात असावी.नंतर शिंदे आजोबांनी अखेरचा आचका देतांना त्याला पाहिलं असावं... म्हणून याच दोघांना तो दिसू शकतोय. जाण्यापूर्वी त्यानं बंटीशी आल्यावर भरपूर खेळायचं, सायकलवर भटकायचं ठरवलं होतं... ते तर झालंय की पूर्ण अजून काय ? अजून काय असेल बरं? मी डोळे बंद करून आठवू लागले, "बंटीची आई बंटीची आई!"त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते.. मला उत्तर मिळालं... आई.. आईचं प्रेम ,माया... तो इवला जीव आईच्या आठवणीनं व्याकुळ झाला असावा. आता ग्रहण सुटले होते.
आज सुजॉयला जाऊन महिना झाला होता... बरोबर 11:30 ला मी देशपांडे आजींकडे पोहोचले... सुजॉयच्या आईला थोडी कल्पना आधीच आजींनी दिली होती.. बाकी फार खोलात न शिरता...त्यांना मी तुमची भेट सुजॉयशी घालून देते म्हणून सोबत घेऊन निघाले. त्या अविश्वासाने पाहत होत्या मात्र आपल्या आईच्या शब्दाखातर तयार झाल्या... आम्ही अमूल मिल्क पार्लरच्या जवळच्या स्पीड ब्रेकर जवळ थांबलो... तिकडून दामाजी आणि हे बंटीला जवळजवळ उचलून घेऊन आले... त्याच्या अंगात एक पाऊल टाकण्याची ताकद नव्हती. बरोबर 12 वाजून 2 मिन झाली ....याच वेळी ,याच जागी महिन्यांपूर्वी सुजॉयचा अपघात झाला होता... अंगात ताकद नसणारा बंटी सुजॉयच्या आईला पाहत धावत सुटला... मम्मा म्हणत त्यांच्या गळ्यात पडून हमसून रडू लागला.."मम्मा कधी आलीस तू युरोपहुन?" त्याचा आवाज ऐकताच सुजॉयच्या आईचा जीव हळहळला पोराचा आवाज आईने ओळखला.. त्याला मायेनं पोटाशी धरलं..."मी खूप बॅड मम्मा आहे सुजो... तुझ्यासारख्या गोड बाळाला मला सांभाळता नाही आलं.. माफ कर मला.But I love you my boy... miss you forever... please forgive me.. sorry sorry.. oh God... " म्हणत सुजॉयच्या आईने हंबरडा फोडला
...पुढं मायलेकरांचा राहिलेला संवाद माझ्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता.. पोहोचले ते प्रेम निरतिशय माया.. ममता... बंटीच्या कपाळाच प्रेमानं चुंबन घेत सुजॉयच्या आई म्हणाल्या, "I am proud of you my boy.. मला खूप खूप अभिमान वाटतोय तुझा...कायम वाटेल..." त्याच क्षणी सुजॉयच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. सुजॉयचा आत्मा आईच्या भेटीसाठीच नव्हे तर तिच्या तोंडून .. लेकरा तुझा अभिमान वाटतो. हे शब्द ऐकण्यासाठी आसुसला होता...पुढे सारं मळभ सरलं.. माझ्या बंटीला बरं व्हायला 2 महिने लागले . त्याचं एक शैक्षणिक वर्ष देखिल वाया गेलं... मात्र आईपणाचा मोठा पाठ मी सुजॉयकडून शिकले... मुलांचा हक्क आहे आईच्या दोन कौतुकाच्या शब्दांवर... प्रत्येक मूल आगळं आहे.. प्रत्येक जण काहीतरी विशेष घेऊन जन्माला आलंय.. कधीही इतरांसारखं होण्याचे दाखले त्याला देऊ नका.. आयुष्याचं एव्हढं मोठं युद्ध लढून जिंकणाऱ्या माझ्या बंटीचा मला खूप खूप अभिमान आहे... Proud of you my boy!
© यशश्री रहाळकर

खूप छान लिहिले आहे. लेखन शैली सुंदर आहे.
उत्तर द्याहटवा