फॉलोअर

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

कविता - माहेरपण

               ' माहेरपण ' ही माझी social media वर पोस्ट केलेली पहिलीवहिली कविता...
 खरेतर social media वरील पहिलेच लेखन ... वाचकांना भावली ,मनापासून प्रतिक्रिया देखिल मिळाल्या . अनेकांनी नेहमीप्रमाणे copy pest करतांना माझे नाव तेव्हढे उडवले. दोघांनी त्यांच्या you tube चॅनलही upload केली अक्षरशः 800 हून अधिक लोकांना ती आवडलेली दिसली .अजूनही फिरून येत असते ... माझं नाव नसतं मन खट्टू होतं पण कविता आवडतेय ना ! पुरेसे आहे .

"माहेरपण"
नव-याने तिला विचारले.....
लग्नाला झाली वर्ष कितीतरी, अजून तुझे नवेपण
मला एकदा सांग तरी
असतं काय हे माहेरपण.
राणी माझ्या घरची तू
सासुरवास तुला न ठाऊक
करतेस काय मोठे तू
खास माहेरी "हितगूज"
सतत सगळ्यांशी असतेस connect,
smart phone हा दिमतीला
Sharing caring असतेस करत
whats app आहे संगतीला
Get together सदैव घडे
मैत्रीणींचा online झकास group
प्रवासाचे कष्ट घेऊन , आणखी काय मिळते सुख
आठ दिवस सुटटी घे
अन मस्त धमाल कर
shopping hotelling मनसोक्त करु
हवय कशाला माहेरपण
 तिने मधाळ हसत उत्तर दिले......
वर्ष सरोत कितिही ,
ओढ काही सरत नाही
सासरी गेल्याशिवाय खरंतर
माहेरपण कळत नाही.
सासरच्या सुखाच्या ओंजळीच मी
खरतर माहेरी उधळत जाते
अन त्याच आनंदाच्या घागरी
त्यांच्या डोळ्यातून रित्या करते.
दारात माझी वाट पाहणा-या
आजीची मग मी नव्याने मैत्रीण होते,
काळ वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पांतून जुळत जाते.
पिल्लं सोपवून आईकडे
मैत्रीणींचा जमतो कट्टा
कितीतरी जुन्यानव्या तासनतास मारतो गप्पा.
भेटीगाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते,
माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते.
आईने आठवणीने डब्यात भरुन ठेवलेला खाऊ अन बाबानी आणलेली आवडीची भाजी
मरगळ झटकुन मनाची मी होते ताजी.
आठवणीचे गोफ विणत लहान मी होत जाते
माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा
बालपण मी जगून घेते...
 यशश्री रहाळकर 

५ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!