🧐संप्रदाय :- एक चिंतन😜
🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗
आपले जग विविध नमुनेदार माणसांनी गजबजलेले असते . त्यापैकी काही व्यक्तीसमूह दर्शक समान (भानगडी)गुण दर्शवितात. या अजब रसायनांचे काही प्रमुख संप्रदायात वर्गीकरण करून अभ्यासणे अधिक सोईस्कर आहे.
प्रकार 1 :- थुंकसंप्रदाय
सर्वाधिक सहजतेने बहुसंख्य स्वरूपात ज्या संप्रदायातील लोक आढळून येतात तो म्हणजे " थुंकसंप्रदाय " रंगपंचमी हा सण बाराही महिने प्रत्येक दिवस साजरा करायचा असतो अशी ह्यांची ठाम निष्ठा... हे लोक कमालीचे flexible असतात... भर दुपारी मरणाच्या traffic मध्ये बुलेट किंवा तत्सम अवजड बाईक सांभाळत ... डाव्या कानाला मोबाईल सावरत हे थोर लोक पृथ्वीशी समांतर 90 अंशाचा कोन क्षणात जुळवून पिचकारीचे काम उरकतात. यांपैकी काही सिद्धीप्राप्त व्यक्ती जराही न वाकता अचूक भेदक मारा लक्षावर करण्यात प्राविण्य प्राप्त केलेले असतात. सरकारी कचेऱ्यातील बाबू शिपाई वगैरे लोक याच संप्रदायाचे बहुसंखेने पाईक होत.हे लोक अत्यंत मितभाषी असून वृत्तीने विरक्त असतात. ध्वनी प्रदूषण टाळून बरेचदा ते हातवारे या माध्यामातून संवाद साधतात ... महत्प्रयासाने त्यांना बोलते करणाऱ्याला ते स्वतःच्या रंगात रंगून टाकतात.
प्रकार 2 :- फुंकसंप्रदाय 😤
घरापासून दूर एकांतवास अधिक प्रिय असणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने फुंकसंप्रदायातील सभासद असतात. स्वतःच्या पैश्यांना नेमाने ते स्वतःच काडी लावित असतात. विचारमग्न आत्मानंदाच्या अनूभूतीत व्यत्यय आणणारे लोक त्यांना मुळीच पसंत नसतात . म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास निषेध नोंदविणाऱ्या फटाकडी कडेही ते निरीच्छ तिरस्काराने पाहण्याइतके संयमी असतात. 'कोपरा ' ही फुंकसंप्रदायाची नित्योपासनेची जागा.... म्हणूनच चाणाक्ष गृहीणी " जरा कोपऱ्यापर्यंत जाउन पाय मोकळे करून येतो ग ! " या पतीच्या उद्गारांचा यथार्थ लक्षात घेतात. आपले पतिराज पाय नसून धूर मोकळा करणार आहेत ... पण जाऊदेत आपले आणि लेकरांची फुफ्फुसे तरी वाचतील अशी आत्मसंरक्षक भूमिका त्या घेताना दिसतात.
प्रकार 3 :- शिंकसंप्रदाय
तपकीर प्रेमी असणारे या संप्रदायाचे लोक पुर्वी पारापारांवर ठिय्या देउन बसलेले असायचे. अत्यंत वेळखाऊ जिकीरीचे काम करणारा हा संप्रदाय लोप पावण्याच्या मार्गावर असतांनाच पुनरुज्जीवित झाला तो ' दम मारो दम ' मुळेच . ज्यांच्या पिताश्रींनी अलक्ष्मीची अघोर उपासना करून अलोट माया प्राप्त केली त्यांच्या सुपुत्रांनी या संप्रदायाचे आत्यंतिक प्रेमाने संवर्धन केले . हे श्वेत चूर्ण १ग्रॅम साधारणपणे वर्षभराच्या गव्हाच्या पीठाइतके स्वस्त??? असल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत.😱
प्रकार 4 :- झिंगसंप्रदाय
गेल्या काही पिढ्या टोकाचा तिरस्कार वाट्याला आलेल्या या संप्रदायाला विदेशी मोरपीसांनी अचानक सुगीचे दिवस आले आहेत. पुर्वी चोरून मारून या संघटनेचे सभासद असणारे आता राजरोस उजळ माथ्यानी मिरवित असतात. काही अभ्यासकांकडे ' दारू कशी प्यावी ' यांविषयी मार्गदर्शक पुस्तकेही मांडलेली आढळतात. शिमगा हा आवडता सण असणारे हे लोक स्वमग्न गंपू प्रकारात मोडतात . एकदा हा पंथ स्विकारला की हे लोक ऊन वारा पाऊस यांवर सहजी मात करतात . भर मे महिन्यातील टळटळीत दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर देह झोकून देणारे याच संप्रदायातील उच्चपदस्थ पदाधिकारी.
प्रकार 5 :- भुंकसंप्रदाय 😡🗣
सर्वाधिक गतीशील , सामाजिक जाणीवांनी परीपूर्ण ... सगळ्यांना सुधरवूनच सोडण्याचा दृढ निश्चय करणारे विचारवंत या संप्रदायाचे पाईक होत. या संप्रदायातील लोकांनी स्वतः काहीही ठोस काम करणे निषिद्ध मानले जाते. सातत्यानी दिसेल त्या प्रत्येक घटनेवर आणि मिळेल त्या प्रत्येक व्यक्तीवर संपूर्ण शक्तीनिशी हे लोक तीक्ष्ण टीका करीत असतात . What's app आणि facebook मुळे त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे. श्वानगुणांचे प्राबल्य असणारे हे लोक शीरा ताणून बहुसंख्य वेळ कुणाचे तरी कसे चुकले याच विषयावर बोलणे पसंत करतात. अर्थातच त्यांना श्रोत्यांची जरूरी असल्याने ते अत्यंत social प्रकारचे तसेच पार्टी , सेलिब्रेशनचे चाहते असतात.
असे हे प्रमुख पाच संप्रदाय आपल्या सभोवती प्राबल्याने आढळतात. आपापल्या खास वैशिष्ट्यांसह आपल्याला भेटत जातात.
ll भुंकसंप्रदायाच्या मंडळींस सविनय अर्पण ll 🙏🏻
©🔏यशश्री रहाळकर
नाशिक
( आवडल्यास प्रतिक्रिया नक्कीच कळवा... धन्यवाद !)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!