फॉलोअर

मंगळवार, १ जानेवारी, २०१९

कविता - राहूनच गेलं

            आजपासून नववर्षाची सुरुवात... एक सुरुवात मी देखिल करतेय ... आगळ्या पद्धतीने. आजपासून खास कविता पोस्ट करतेय... त्या प्रत्येक नात्यावर ज्यामुळे मी समृद्ध होत गेले. आजची कविता आईसाठी... पण ही केवळ एका व्यक्तीपर्यंत मर्यादित नाही .. प्रत्येक मुलीच्या कदाचित ह्याच भावना असाव्यात .  

✒ ✒ राहूनच गेलं 👵🏻👩🏻

किती काळ लोटला नाही ... पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं....
या दरम्यानच्या काळातल्या गमतीजमती सारं सारं तुला सांगायच राहूनच गेलं .....

तू तुझ्या प्रपंचात मिही माझ्या संसारात ...
व्यवहाराच येणं जाणं गरजेच बोलणं झालं ....
कसं सांगू या साऱ्यातून किती नी काय सुटून गेलं ......

तुझ्या चंदेरी होत चाललेल्या बटांना तेल लावायच....
रविवारी तू घालायचीस तस शिकेकाईने नाह्यला घालायच ...
खूप हसायच .. जुन्या आठवणीत मस्त रमायच ... सारं राहूनच गेलं.

तू आलीस घरी की गरम सुग्रास जेवण दिलं.....
कधीतरी तुझा आवडता मेतकूट भात अन लिंबाच लोणचं द्यायच मात्र राहूनच गेलं .

गात्र थकलीत तुझी मी कर्तव्य केलं ....
आजारी होतीस तेव्हा औषध दिलं
पण बरं वाटतय ना ग ! असं मायेन  विचारायच राहूनच गेलं...

हळूहळू तुही थकतेस काम पूर्वीसारख होत नाही
आता माझ्या हो ला हो करतेस , उगाच वाद घालत नाहीस.
तुझही वय झालय हे लक्षात घ्यायच राहूनच गेलं....

माझ्या मातृत्वाच्या प्रवासात तुही चिंब भिजलीस आनंदात
मात्र तुझ्या आजीपणाचे स्वागत तेव्हढे राहून गेलं.....

वय वाढले तशी जवाबदार झाले .... जाणीवा नेणिवांनी परीपुर्ण झाले...
लेक होतेच... आता पत्नी, सून, आईदेखिल झाले .
या सगळ्यात आईची आई होणार होते ...
तेव्हढे मात्र राहूनच गेले .....

©🔏 यशश्री रहाळकर
         नाशिक
( प्रिय आई ...... तुझ्यासाठी )

( आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत , धन्यवाद! )

६ टिप्पण्या:

  1. वा,खरच ग...का होत असेल ग आपलंअस..आईची आई होण राहून गेलं

    उत्तर द्याहटवा
  2. आई तूझ्या सारखा थोर नाही ..,तझ्यासारखी तूच एक आहेस , तझ्याविना माझा कुठलंच आधार नाही...

    उत्तर द्याहटवा
  3. खरच हे सर्व राहून गेलं. आता खूप वाईट वाटतं.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!