आजची कविता आईचे प्रतिरूप म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं त्या सासूबाईंवर .... खरं सांगू का मला मुळात हे आईसारखी किंवा मुलीसारखी हे प्रकरण मुळी मान्यच नाही . कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर कुणीही कुणाच्या आईची जागाच घेऊ शकत नाही आणि कुणीही स्वतःच्या लेकीइतकं प्रेम दुसऱ्या कुणावर करूच शकत नाही ... मग या आतून अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या तकलादू नात्यापेक्षा सासू- सून जर मैत्रिणी झाल्या तर ... कशी वाटतेय कल्पना ??
सखी सासूबाई
सासूबाईंनी सोडलाय केव्हाच सासूपणाचा तोरा
त्यांच्याही साठी बांधीन म्हणते वडाला मी दोरा
पार करायचंय आपल्याला ,आपल्यातील एका पिढीचं अंतर
तुम्ही एक पाऊल माग घ्या मिही एक पुढे टाकीन नंतर.
माझा पिझ्झा पास्ता तुम्ही कौतुकानं चाखायचा
तुमचा उपमा उप्पीट मी आडव्या हातानं चापायचा
माझ्या सोबत पहा कधीतरी तुम्ही मुव्ही थ्री डी
तुमच्यासाठी नेसेन मिही काठापदाराची जाडजूड साडी
सुनेची नसावी अरेरावी सासूची नसावी सत्ता
नाहीतर मुलाची होते सुपारी सासू खल सून बत्ता
तुमच्या आजारपणाचा काळ मी मायेनं सावरायचा
मी केला पसारा तर तुम्ही प्रेमानं आवरायचा
मतभेद होतीलही आपले कधीतरी वादविवादही होणार
टोमन्यांचे तीर नको आपण सामंजस्याची भूमिका घेणार
आपल्याला आयुष्यभर बांधून ठेवते नात्याची एक रेशमी दोरी
तुमचा जो बाळकृष्ण तोच माझा सखा श्रीहरी
तलम उंची पैठणी सारखं आपलं नातं विणू या
अनुभवाच्या सोनेरी तारांत मायेचं रेशीम गुंफू या
आईमुलीचा खोटा मुलामा नको दिखाव्याचे नसावे कारण
जिवलग सखी आपण एकमेकींच्या आपल्या नात्याला बांधू मैत्रीचं तोरण
- यशश्री रहाळकर
(धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत )
यश ही वीण गुंफण गरजेचे
उत्तर द्याहटवाबरोबर दोघींची जबाबदारी आहे
हटवाNice
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाखुपच छान👌👌
उत्तर द्याहटवायश, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे, good one
उत्तर द्याहटवाTu lihileli majhi aawadati Kavita.
उत्तर द्याहटवाJayashree
Khup ch chan
हटवाThank you
हटवाअप्रतिम. सासूबाईंना वाचून दाखवणार आहे मी
उत्तर द्याहटवाअप्रतिम सासूबाईना वाचून दाखवणार आहे मी
उत्तर द्याहटवा