💃बेबो मम्मा 🍼
आपण जे अनेकविध days fashion म्हणून celebrate करतो हा त्यापैकीच एक Mother's Day ...जरूर करा... पण एक सांगू का...हा day मम्माचा "आई " केव्हाच कुठेतरी हरवून बसलोय आपण.
आई म्हणजे काय तर आत्म्याचा ईश्वरापर्यंतचा प्रवास... व्याख्या सुरेख आहे पण आजच्या पिढीतील आई अशी आहे का? म्हणूनच आई आपण हरवून बसलोय अस वाटून गेलं.
आजच्या आईचे आदर्श कोण तर करीना कपूर खान ... मुलांच्या जन्मानंतर कमीत कमी वेळात आपण कश्या shape पुन्हा प्राप्त करू एव्हढेच आई पणाचे ध्येय...' तुझा मुलगा वा मुलगी १२ वीत आहे वाटत नाही ग तुझ्याकडे पाहून ' हेच स्वप्न बाळगून या बेबो मम्मा बनतात.मी मुलांची आई वाटता कामा नये बहीणच वाटली पाहिजे हा अट्टाहास... परवा ओळखीची २२/२३ वर्षांची मुलगी म्हणाली " कित्ती छान trend आलाय ना सरोगसी चा .... अजिबात figure बिघडत नाही ready made मुल..." बापरे! मला हा धक्का अजूनही पचला नाही. आई होणे ही केवळ शारीरीक प्रक्रिया नाही ... मन भावना सारेच गुंतून असते.... पण हे मम्माना कळणार नाहीच.
सर्वाधिक वेळ जिम मध्ये आणि पार्लर मध्ये घालवल्यानंतर या मम्मा उर्वरीत वेळ आपल्या product कम मुलांना presentable बनवत असतात. मुलांना विविध claases ना अडकवणे, अगदी nursery च्या मुलांना tutions लावणे.. ५/६ वर्षांच्या पोरट्यांचा fashion sence , etiquettes वगैरे बनविण्यावर त्यांचा भर असतो. काही IT तिल long distance मम्मा तर सरळ मुलांना आई किंवा सासुच्या गळ्यात बांधतात त्यांच्याच गावी ठेवतात..
स्वतः उच्च शिक्षित ह्या मम्मा लहान मुलांचा अभ्यास घेउ शकत नाहीत... लाज वाटली पाहिजे....
आपले शिक्षण केवळ कमीत कमी कपडे घालून lipstick लावण्यापुरतेच आहे ... असेच वाटते. मुलांना सकाळी swimming संध्याकाळी music शनिवार रविवार dance karate etc ... शिवाय 90% वर कमीत कमी marks ही या मम्मांची सर्वांगिण विकासाची व्याख्या....
Moderness च्या यांच्या संकल्पना तर थोर...👍ऐन डिसेंबर महिन्यात एक मम्मा ४ वर्षाच्या चिमुकलीला shorts आणि crop top या कपड्यात कोंबून शाळेत घेउन आली ... थंडीने कुडकुडणाऱ्या त्या लेकराला ती tough करीत होती असे तिने आम्हा गावंढळ आईना सांगितले. असेच एका Birthday party मध्ये ५ वर्षे वयाच्या पिल्लूला अंग झाकायला पाव मीटर आणि मागे लोळणारा अडीच मीटर अश्या स्वरूपाचा गाऊन घातला होता. कोणत्या तरी Bollywood नटवीने तो घातला असल्याने तो 6000 ₹ 😱 होता... त्या बिचारीला धड खेळता येइना .. सतत पडे, धडपडे पण मम्माच्या हृदयाला पाझर फूटे ना... जी स्त्री स्वतःला एक व्यक्ती समजत नाही .. केवळ एक स्त्री समजते तेही विशिष्ठ मोजमापात बसणारी आणि गोरी 😢... ती काय कुणाला घडविणार...
मध्यंतरी लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनानंतर अनेक स्त्रियांनी "मुलींना पार्लर नको कराटे शिकवा" चा नारा लावला पण एकिनेही म्हटले नाही,
" वेळ आलिये मुलांना घडवण्याची त्यांच्यावर संस्कार करण्याची की स्त्री आधी माणूस आहे ... उपभोगाचे वा सेवेचे साधन नाही" हे मम्मांचे कामच नाही संस्कार वगैरे गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
लहान मुले अस्थिर आहेत ... लहानपणी किंवा teen age मध्ये छोट्या मोठ्या धक्क्यानी आत्महत्या करताहेत, मनोरुग्ण होताहेत.सावरायला गरज आहे
' आईची ' तुम्ही मुलांची मैत्रीण जरूर व्हा पण त्यांची आई न हरवू देता. ... जी आई तुम्हा आम्हाला लाभली.. जिजाऊ शिवराय लक्ष्मीबाईच्या गोष्टी सांगणारी, शुभंकरोती म्हणायला लावणारी, शामची आई शिकवणारी,जेवायला वाट पाहणारी,वेळप्रसंगी धपाटे घालणारी... आणि जिची नुसती आठवण झाली तरी मन वाईट काम करत नाही ती आई...
10 विची परीक्षा होती माझी ...भूमितीच्या पेपर ला उघडपणे सगळ्यांना copy करू देत होते.... त्याही परिस्थितीत मला माझ्या आईचे रोखलेले डोळे आठवले ... मी वर्गावरील सरांना सांगितल " माझ्या आईला मी copy केलेली आवडणार नाही." अजूनही किराणा घेतांना जास्तीचे आलेले 10rs. मी पुन्हा जाऊन परत करून येते... मला माहित आहे माझ्या आईला आवडणार नाही.
जशी आई तुम्हाआम्हाला मिळाली तशीच आई आपल्या पिल्लांना लाभावी... प्रयत्न नक्कीच करुया.तेव्हाच खऱ्या अर्थाने Mother's Day साजरा होईल नाही का !
🖋© यशश्री रहाळकर
नाशिक
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९
बेबो मम्मा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Nakkich , sanskar kami hot challet. Aai mhanun aapli khup mothi jababdari asate.
उत्तर द्याहटवाअगदी खरंय,आता सध्या आई वर्ग सुद्धा खूप वेगळ्या विचारात आहे नेमके कसे आणि किती ,कुठे संस्कार करावेत हे आधी त्यांनाही सांगायलाच हवंय ग ,पुढली पिढी तेव्हाच वळणावर येईल त्यांना घडवणारी पिढी तितकीच सक्षम होईल
हटवाखरंय ... बहुतेकिना ती उमजलेलीच नसते पण
उत्तर द्याहटवाआपली मुले आपलं प्रतिबिंब असतं, त्यांना घडवण ही आपली परम् जबाबदारी....
उत्तर द्याहटवाTrue it's a real fact.. thanks yashshri tai.
उत्तर द्याहटवा