भोपळ्याचं झाड
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
वनश्रीनं आपल्या नावाचं सार्थक करण्याचा जणू चंग बांधला होता. पुणे विद्यापीठात बॉटनी सेक्शन चे HOD असणाऱ्या तिच्या वडिलांचं झाडा फुलांचं वेड तिच्याही मनात झिरपल होतं....डॉ. यथार्थ आचार्यांनी ,आईच्या पश्चात एकाट्यांनी तिला मोठ्या मायेनं वाढवलं होतं..ते या झाडांच्या सहवासात. बंगल्याभवती चिक्कार झाडी नी बाग. वनश्रीला झाडांची उत्तम जाण आणि ज्ञान दोन्ही होते. नुकतेच तिने MSC बॉटनी सारख्या क्लिष्ट पण प्रिय विषयात पुरे केले होते. पण पुढे वडीलांसारखी प्राध्यापकी न करता... PHD साठी संशोधन करायचा तिचा मानस होता. विषय देखिल मोठा आगळाच निवडला तिनं ....100 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झालेल्या झाडांचा रचनात्मक अभ्यास.
त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अत्यानंदानं डॉ यथार्थ ह्यांनी आपल्या लेकीच्या हाती तिचा विषय युनिव्हर्सिटी ने मान्य करून संशोधनाला परवानगी दिल्याचं पत्र दाखवलं. वनश्री मात्र अजूनही गंभीरपणे विचार करत होती, " पपा खरी समस्या तर पुढे आहे. मुळात 100 वर्षे पूर्ण केलेली झाडे फारच कमी आहेत. Sample size लहान असून कसा चालेल?" नाश्ता वाढता वाढता कमला बाईचे हात अचानक थबकले...ह्या कमला बाई वनश्रीच्या जन्मापासून सांभाळ करणाऱ्या बाई.. आईविना पोरक्या पोरीला त्यांनी मायेनं सांभाळलं घरातील सारी कामे त्या करीत पण या दोघा बापलेकीने त्यांना कायम आदरानं वागवलं.
"नग नग पोरी! ती इशाची परिक्षा..... ही अशी झाडं झपाटल्याली असतात. जीव घेतात येड करून सोडतात." ....आता मात्र वनश्री खळखळून हसू लागली. कमला बाई तरीही ठामपणे म्हणाल्या, " काई झाडं वादलवाऱ्यात मोडत न्हाईत.. उनपावसाचा काय बी परिनाम न्हाई होत... कित्येक वरीस जगत्यात कारन कारन.. भूतं खेतं असत्यात वस्तीला ." आता मात्र डॉ यथार्थ ना देखील हसू आवरले नाही. "बघ बघ वना! तुझ्या संशोधनाचा आधीच कमला बाईंची PhD झाली सुद्धा."
चिवट जिद्दीनं कमला बाई बोलत राहिल्या ." आसं झपाटल्यालं झाड असतंया ...मानसं वढून नेतया... गावकी त्याला कोंबड देतीय दर अमूशेला.. मी सोता पाहिलंय.. आमच्या गावात हाये एक भोपळ्याचं झाड... दोनसे वरीस जुना हे हे अश्या फांद्या" कमला बाईंचे हातवारे टिपत वनश्री हसू आवरून म्हणाली " अहो मावशी बाई ! भोपळ्याचा वेल असतो झाड नाही." डॉ. यथार्थ मात्र गंभीरपणे म्हणाले " वना कदाचित परभक्षक झाडांच्या प्रकारातील असावे.. काय ते शोधलेच पाहिजे."
वनश्री झपाटून कामालाच लागली.कमला बाईंचं गाव ' सुलतानपूर ' प्रचंड आडवळणाच पण इंटरनेट वर सहजी माहिती मिळाली. त्या झाडानं बरीच प्रसिद्धी मिळवून दिली होती.खरेच तसल्या वर्णनाचं झाड होतं . भोपळ्यासारखी गोल मोठ्ठी फळे लागणाऱ्या या झाडाला बोलीभाषेत भोपळ्या चे झाड म्हणत असले तरी त्याचे शास्त्रीय नाव होते क्रिसेंशिया कुजेटा . सिग्नोनियेसी फॅमिली तील हे झाडं भारतात आलंच कसं?? कॅलॅबॅश ट्री असं नाव असनारं हे झाड बेगर्स बाउल म्हणूनही ओळखले जाते.पुर्वीच्या काळी ह्या फळापासून एकतारी नावाच्या तंतू वाद्याचा तुंबा बनविला जाई... तर वाळलेलं फळ भिक्षापात्र म्हणून वापरले जाई "म्हणून बेगर्स बाऊल काय ?" वनश्री स्वतःलाच म्हनाली.
अशी सगळी माहिती आणि सगळ्या कपोलकल्पित कथांना एकत्र करून वनश्रीने सायंकाळी आपल्या वडीलांपुढं भलं मोठ्ठ बाडच ठेवलं. त्यात झाडांबद्दलचे संशोधन अगदीच नगण्य आणि झाड कसं राक्षसी वगैरे असल्याच्या कथाच अधिक होत्या ..... डॉ. यथार्थ आचार्य निसर्गपूजक निसर्गाला देव मानणारे होते ... झाड या निसर्गाचा सजीव घटक... हे भूत नी यांच्या कथा .. गम्मत वाटली आणि कमालीचं कुतूहल देखिल.
दोघा ही बाप लेकीने दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष सुलतानपूरला जाऊनच पाहायचं ठरवलं .... रात्री जेवणाच्या वेळी वनश्रीने कमला बाईंना विचारले .." येताय का उद्या तुमच्या गावाला .. झाडाची भेट घेऊन येतोय तुमच्या" भीतीनं थरथरणाऱ्या कमला बाईंच्या हातून भांड गळून पडलं....फडाफडा स्वतः च्या तोंडात मारत त्या म्हणाल्या " कुटनं दुर्बुद्धी झाली रं देवा! म्याच चांडाळीन सोन्या सारकी पोर हाय तू नग जाऊस त्या झाडाच्या नादानं" ... तिला समजावून शांत करण्यासाठी वनश्री आणि डॉ यथार्थ यांचा बराच वेळ खर्ची पडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा नाश्ता बरोबर पॅक करून घेत दोघ निघाले... नाशिक जिल्ह्यातील जव्हार रस्त्यावर कुठल्याश्या 2/3 पाड्यांना ओलांडले की लागणारा रस्ता सुलतानपुर कडे नेतो . या माहितीवर दोघे निघाले खरे पण जव्हार रस्त्याला लागताच अनेकदा अनेक वळणे चुकवीत टळटळीत दुपारी अखेर सुलतानपूर पाटी दिसली ... काही खाल्लेलं नव्हतं... वळणावरच्या एक टपरीत जरासं थांबताच ... कोण कुठले चौकश्या सुरू झाल्या मात्र भोपळ्याच्या झाडाचं नाव घेताच लोकांनी बोलणंच बंद केलं... चहा पिऊन तरतरीत होत पुन्हा गावाच्या दिशेनं निघाले. अंतर खरंतर जेमतेम 20 km पण खाच-खळग्यानी अक्षरशः घुसळून काढले..... दमून भागून कसेबसे गावात पोचले तरी लगेच झाडाची चौकशी सुरू केली त्यांना लगोलग परतायचेही होतेच ना!
वेशीवरच्या पारावर बसलेल्या वृद्धांनी त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला... नाना कथा रंगवून सांगितल्या ... झाड कसं हात लावणाऱ्याला वेडं करून सोडत इथपासून ते झाड खेचून नेत इथपर्यंत... अखेरीस हे दोघे बधत नाहीसे बघून दुरूनच तो परीसर दाखवत लोकांनी पळ काढला. तारांचे कुंपण ओलांडून वनश्री ने पाय आत ठेवला.. गाडी पार्क करून डॉक्टर देखील पोहोचले .. झाडामागे एक भग्न वाडा असावा. ... खरेच वातावरण भीतीदायक होते.. अस्ताव्यस्त पसरलेलं ते झाड भयावह दिसत होते... वनाला त्या खाली एक थडगे दिसले .. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली नी त्या थडग्यावरील शिळी फुले उडून गेली झाडाची ताजी फुले टपटप करत त्या थडग्यावर बरसली... मंत्रमुग्ध होत वनश्री पाहत होती . तिथल्या प्रत्येक घटनेत एक सुसंगती होती... एक आगळे आकर्षण होते... एव्हाना डॉ. यथार्थ यांनी झाडाला स्पर्श केला चहुबाजूंनी निरीक्षण केले आणि संशोधनासाठी sample गोळा करायला सुरुवात केली...वनश्री एकटक त्या झाडाकडे पाहत होती जणू ते संवाद साधत आहे तिच्याशी..." वना ए वना ..अग हे बघ फळ या झाडाचं.." या पापांच्या हाकेसरशी भानावर येत ती झाडाच्या मागील बाजूस गेली...फळ पाने फुले फांदी सारेच नमुने बॅगेत भरत... ते निघालेही.. निघतांना अभावितपणे वनाचे हात त्या कबरीपाशी जोडले गेले..
एके ठिकाणी ते दोघे जेवणासाठी म्हणून थांबले...इतका वेळ शांत निःशब्द बसलेल्या वनश्री ला पाहून पपानी विचारलं .. " काय डोक्यात संशोधन सुरू झालेलं दिसतंय... आपली नजर एकटक त्यांच्यावर रोखून वनश्री म्हणाली .........." मला जायला हवं ... ते झाड बोलावतय मला. रडतय बिचारं .. खूप काही सांगायचंय त्याला.मला गेलंच पाहिजे" क्षणार्धात काही उलगडा होई पर्यंत डॉक्टरांना जाणवला तिच्या बुबुळांचा रंग गहिरा हिरवा झाला आहे ..
क्रमशः......
©यशश्री रहाळकर

Very nice story. .waiting for next part
उत्तर द्याहटवा.
उत्तर द्याहटवाKHupch interesting , pudhcha part kadhi, ,,
उत्तर द्याहटवाखुप छान आहे. पुढचा भाग लवकर टाक
उत्तर द्याहटवाPudachya bhagachi utusakata lagliye
उत्तर द्याहटवा