फॉलोअर

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

लेखणीचे दुःख


🖋लेखणीचे  दुःख😢

         "लेखन ही एक अभिजात कला किंवा देणगी आहे " यावर  खरतर बऱ्याच लोकांचा मुळीच विश्वास नसतो. हा एक फावल्या वेळात करायचा रिकामटेकडा निरर्थक उद्योग आहे ... असे अनेकांचे मत असते. त्याही पलीकडे जाऊन कुणीही काहीही ' खरडू ' शकतं अशी त्यांची ठाम धारणा असते . गेल्याच आठवड्यात माझ्या एका चुलत सासूबाईंनी दोन तास वाया??? घालवून कथा लिहिण्यापेक्षा किलोभर कुरडया केल्या असत्या तर खाल्या तरी असत्या सगळ्यांनी .. अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
            मी सध्या काय करते याचे उत्तर बरेचदा कागद काळे करते किंवा खरडते काहीबाही असे असते . एक प्रश्न मला राहून राहून पडतो ... तबला वाजवणारा प्रत्येक जण झाकीर हुस्सेन असतो का ?? किंवा गाणारी प्रत्येक जण लता होईल कशी ??  हे लोक त्यांच्या छंदातून त्यांचा आनंद शोधतात ना ! आम्ही बापुडे कुणालाही कसलाही त्रास न देता जराही आवाज न करता आमचा आनंद 🖊शोधत असतो ...😢 तर हा सापत्न भाव का ??
           कधीतरी अचानक जुन्या नव्या मैत्रीणींना आमची आठवण येते. स्वतःच्या किंवा बहिणीच्या लग्नात उखाणे हवे आहेत म्हणून किंवा पत्रिका छापायला मॅटर हवय म्हणून फार फार तर मराठी डे ला पिल्लूला मराठीतून speech करण्यासाठी  ... अचानक आमची आठवण येते.
एकदा एका महान मैत्रीणीने रात्री ११:३० किंवा १२ च्या सुमारास फोन करून मला उखाणे विचारले ... त्यात नवरा मुले सगळ्यांची नावे हवीत ... शिवाय उद्याच स्पर्धा म्हणजे लगेच दे 😱 तिच्या मते मी साच्यातून कुरडई पाडावी तसे भराभर उखाणे पाडावे.xx ला  एव्हढ्या रात्री झोपेतून उठून मला माझ्या नवऱ्याचे नावही आठवत नव्हते.... तिच्या कसे आठवणार???😉
             अनेकांना मी निबंध लेख लिहून द्यावे असे वाटते... ताबडतोब... (जे पुढे ते स्वतःच्या नावावर छापतात) आणि त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो त्या busy असतात. कधीकधी special on demand ... अमुक मैत्रीणीसाठी लिहून दे तमुक मावस बहीण fashion show करतेय तर तिला मस्त कविता करून दे असले सामाजिक प्रपंच त्या करतात.
            बरेचदा चमत्कारांचीही अपेक्षा केली जाते...एका मैत्रीणीने सासूबाईंच्या एकसष्टीला  सुरेश भटांच्या आणि ग्रेसांच्या कवितेच्या ओळी गुंफून शुभेच्छा लिहाव्यात असे सांगितले😆... ते दोघेही तिच्या सासूबाईंचे आवडते कवी एव्हढीच मोघम माहिती होती तिला. आता रोमान्स आणि विरक्ती .... गूढ आणि आसक्ती एकत्र कशी  गुंफणार?? एका डॉक्टर मैत्रीणीने आपल्या नवऱ्याच्या भव्य हॉस्पिटलच्या दिव्य समारंभात नवऱ्याला देता येइल असे .... प्रत्येक वाक्याला टाळ्या पडतील असे भाषण मागितले.... मला या field बद्दल खरेच काहीच माहिती नव्हते... गोळ्यांना लाल🔴 निळी🔵 पिवळी 🔸अशी नावे देणारी मी
...काय लिहिणार???
             बरे आम्ही नाही म्हणणे म्हणजे ब्रम्हहत्येचे पाप बरंका ! कितीही नम्रपणे " आज मी busy आहे ग नाही जमणार . " असेउत्तर दिलत ना तरी ... रात्री बस ग मैत्रीणीसाठी थोडा वेळ ... असे हक्काने सांगतात.... मी काय घुबड आहे 🦉असे बहुदा वाटत असावे. तुम्ही जे काही लिहिता ते किमान thank you म्हणावे किंवा चार जणात कौतुकाने सांगावे असेही नसते हे विशेष....😏
           कधी कधी कुठून झक मारली आणि लिहायला बसले असे वाटावे असे लोक वागतात . मुळात तुम्ही लिहिता तेव्हाच लिहिणाऱ्या आणि न लिहिणाऱ्या अश्या दोन्ही गटाचे तुम्ही आपोआप शत्रू होता . लिहिणाऱ्या बापुडीला तुम्ही उगाच स्पर्धक वाटता आणि न लिहिणाऱ्या तुम्हाला जेरीस आणतात. शिवाय चार जणी जमल्या की " तुझ काय ग चार ओळी खरडल्या की काम होतं आमच काम कष्टाच.....😇" हाही उद्धार होतोच.
©🔏 यशश्री रहाळकर
             नाशिक

१३ टिप्पण्या:

  1. अभिनंदन । नवीन blog साठी खूप खूप शुभेच्छा
    लेख मस्त👌👌

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!