मराठी... दीण ? 😳
●●●●●●●●●●●●●●●●●●
मराठी भाषा शुद्धी करीता कडवे प्रयत्न केलेत त्या क्रांतीसुर्य सावरकरांचा काल स्मरणदिन तर आज मराठीच्या किर्तीची भगवी पताका ज्ञानपीठावर झळकवणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ... मराठी राजभाषा दिन ...भल्या पहाटे मोबाईल चमकला नी मेसेज झळकला (भ्रमणध्वनी आणि संदेश असला शो ऑफ नाही हं!) " मराठी दीणाच्या शुभेच्छा!" मला उलट्या हाताची सणसणीत कानाखाली वाजवल्याचा भास झाला.खरेच मला त्या व्यक्तीची मराठी दीन झाल्याचा भास झाला ... (दिन म्हणजे दिवस तर दीन म्हणजे दया वाटावी असा. दीण .. अजून शोध लागायचा आहे.)
अनेकदा लोक आम्ही कित्ती शुद्ध बोलतो हे दाखविण्याच्या अट्टहासात मोठे घोळ घालून ठेवतात. एक सन्माननीय निवेदनकर्ते कायम छापील बोलायचा प्रयत्न करीत... एकदा असेच त्यांनी प्रमुख अतिथींना मंचकावर विराजमान होण्यास सांगितले... त्या महिला अतिथी रागाने डोळे लाल करत निघून गेल्या... 😡काय झाले? हे जराही न कळल्याने महाशयांना धावत जाऊन माफी मागणेही जमेना. आयोजकांच्या विनंतीवरून कश्या बश्या वक्त्या परतल्या ...कार्यक्रम पार पडला. 'मंचक' ह्या शब्दाचा अर्थ पलंग असा होतो 😂 मंच हा शब्द रंगमंच चा तुकडा तोडून वापरला जातो. खरेतर काहीतरी कला नृत्य नाट्य गायन वगैरे सादर केले जाते तो रंगमंच ... विचारांची जागृती उद्बोधन होते ते व्यासपीठ ... आजकाल व्यासांचे नाव नको म्हणून विचारपीठ म्हणतात.तेही चालेल पण मंचक?? 😄😄
आम्ही शुद्ध बोलतो हे दाखविण्याच्या हव्यासापोटी सर्वाधिक बळी जातो तो 'न ' या वर्णक्षराचा... सरसकट एकाच न्यायाने 'ण ' वापरून भोजण, अण्ण, णेवेद्य , गायण , वादण अशी दाणादाण उडवून दिली जाते . दुसऱ्या बाजूला बाणातला ' ण ' वापरीन तर शपथ... असेही लोक असतात. " आपन आज या ठिकानी श्रद्धांजली व्यक्त करन्यास भेटन्याचे म्हनालो पन मला येने जमले नाही." हे ऐकून मी फोटोतून " बरं झाल नाही आलात "असे म्हणाले असते...नको तो न चा पाढा ...😝
प्रत्येक कोसावर मराठी वेगळी आहे... निश्चित आहेच . तो लहेजा , ते वैशिष्ट्य जपलेच पाहिजे ... त्या ढंगात सौंदर्य आहे . कोल्हापूरचा रांगडी बाज, वर्हाडची " आल्तो गेल्तो" , कोकणचे सानुनासिक ," शिंच्या कुठे उलथलांस " मराठवाड्यातील " करायली, यायली जायली" अशी इ कारांत क्रियापदे..... मुंबईची अनेक भाषांची भेळ मराठी..... अगदी आमच्या नाशकातली देखिल मराठी वेगळी आहेच. अर्थात सगळेच छापील बोलू लागले तर पुण्याला विचारेल कोण?? 👊 तरी देखिल अर्थाकडे संपुर्ण दुर्लक्ष करणे ... विचित्र अर्थाने शब्द वापरणे सार्वजनिक ठिकाणी बरे नाही... असे माझे प्रांजळ मत आहे. 'आदरनीय ' म्हटले की मला उगाच तो वक्ता दयनीय, शोचनीय वगैरे वाटू लागतो.
मराठीचे संवर्धन आणि जतन या विषयावर आज सगळ्या शोषण मिडीयावर दळण दळले गेले . परंतु मराठीचे सौंदर्य ज्या इवल्या गोष्टीत दडले आहे त्या जपण्याचे काय? अभिजात मराठी ... तिचे काय? पुढल्या पिढीकडे जाणाऱ्या वाराश्यात ती सुरेख नटलली जायला हवी... कानामात्रांचे योग्य अलंकार लेवून जशी तुम्हा आम्हाला मिळाली तशी लेकरांना मिळो... सात्विक, सकस ,उदात्त ..
।। माय मराठी अभिमान मराठी।।
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
27/02/19

खूप छान लिहीलस यश
उत्तर द्याहटवाBhariiiiiccchhhhh ....Uh Yashashree
उत्तर द्याहटवाKhup channnnn Yashshree tuza Amhala sarth Abhiman aahe
उत्तर द्याहटवा