पंचार्पण
माझा लंगोटीयार म्हणावा असा बालमित्र म्हणजे सुकृत साने.. नावाप्रमाणे काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य लेवून आलेला असावा. उतारवयात झालेला साने दाम्पत्याचा हा एकुलता एक लेक... दिसायला सुमार बुद्धीने त्याहून ...मात्र नशीब त्याच्यावर कृपादृष्टी राखून होते. वडिलोपार्जित मिळालेल्या गडगंज संपत्तीचा माज त्याला कधी चढलाच नाही.... म्हणूनच माझ्या सारख्या चाकरमान्याशी तो अखंड मैत्री टिकवून होता. मंगलकार्यालये आणि केटरींग या जोडव्यवसायात तो उत्तम मुरला होता...साधे राहणीमान, हाताखालच्या माणसांवर माया आणि कष्टाची तयारी यामुळे त्याचा उत्तम जम बसला होता. अनेक गरजू लोकांना कामाला ठेवून घेतले होते त्यानं... काही तर पूर्णवेळ त्याच्याच घरी आश्रयाला होते. मोठे जुन्या पद्धतीचे चौसोपी घर नोकर चाकर राबता होता...परंतु सुकृतचा विवाह योग काही जुळून येईना... एकतर व्यावसायिकाला मुली कुणी देईना,त्यात शिक्षण कमी भरीस भर पत्रिकेत कसलासा मृत्यूयोग .. अगदी गरीबाची पोर करतो म्हणाले तरी देईना.. नाममात्र घटस्फोटीत सुद्धा चालेल या विचारावर यायला त्याला पस्तिशी गाठावी लागली. आईनं डोळे मिटले ते कायमचेच... तिच्या पाठी चारच महिन्यात वडीलही निर्वतले.... सूनमुख पाहण्याचा योग नव्हताच त्यांचा.आता काही आपले या जन्मात लग्न जमणे नाही असा विचार करून सुकृतने स्वतः ला कामात झोकून दिले.
मात्र या बेट्याचे नशीब चांगले म्हणायचे... तळ-कोकणातल्या कुठल्याश्या वाडीवरील एक चुलत मावशीने एक स्थळ सुचवलं... मुलगी पाहायला म्हणून गेलेला सुकृत बायकोला जोडीनं घेऊनच परतला."कौवेकी चोंच में मोती! " ,ही म्हण त्याच्यासाठी असावी इतका दोघांत फरक होता. नवी नवरी गंगा अत्यंत गरीब ,खायची भ्रांत असणाऱ्या घरातील .. तिच्या एक दूरच्या काकूंकडे आश्रित म्हणून वाढली. ...मात्र अप्सरा म्हणावी एव्हढी देखणी.. दुधाळ गोरा रंग अन मोहक तपकिरी डोळे..जुजबी लिहिता वाचता येणारी ...कामाला मात्र अजिबात न घाबरणारी ....मुळात ढोर मेहनतीची सवय असणारी होती.सुकृत काळाच, बेताची उंची, नाक डोळे जागेवर म्हणावे इतपत... तो भुलला नसता तर नवल.गंगा चटकन सानेंच्या घरात मिसळली.. कामांत चटपटीत सगळ्या घरातील कामाची सूत्रे हळूहळू ती सांभाळू लागली. गंगा अगदीच मितभाषी होती.. तिच्या एकंदर देहबोलीत कमालीचे आकर्षण आणि ओढ होती....ही मोहिनी सुकृतवर सुद्धा पडली होतीच.मुळात तो संसार सुखासाठी आसुसलेला होताच आता त्याला ते मनसोक्त लाभत होतं.
गंगा हळूहळू तेजस्वी दिसू लागली.. तिची फिकुटलेली कांती रसरशीत वाटू लागली. अंगावर सुखवस्तूपणाच मूठभर मांस चढल असावं.सुकृत खुश दिसत होता .. संसारी माणसाची स्थिरता नी तृप्ती त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागली... गंगावर साड्या दागिने गिफ्ट सगळ्याच पाऊस होत होता.. घरी कामाला नोकर माणसे..."आता थोडा वेळ काढा व्यवसायातून .. आणि जरा फिरून या बायकोसोबत" या माझ्या विधानावर त्यानं लगेच अंमलबजावणी केली.मनाली ,शिमला दोघे फिरून आले.चला सुकृतची गाडी मार्गाला लागली म्हणायची मी मित्र म्हणून आश्वस्थ झालो.
या सगळया गोंधळात माझी सोलापूरला बदली झाली.. सरकारी नोकर आदेशाचे गुलाम.. सामानाची बांधाबांध करतांना सुकृत भेटायला आला... आतून जरा मोडून पडलाय असं उगाच वाटून गेलं मला...माझ्याशी बोलतांना जरा हरवल्यागत वाटत होता."काय रे! वाहिनीशी भांडण झाले की काय?"मी विचारले. त्यावर मानेन नकार दर्शवत गंगा माहेरी गेल्याचं त्यानी सांगितलं.... बोलता बोलता तो म्हणाला,"लग्नात तिची एकमेव अट हीच होती की त्यांच्या कोणत्यातरी देवीच्या पूजेला माहेरी जाऊ द्यायचे." मी सहजतेनं त्याला चिडवत म्हणालो,"तुला आठवण येतेय बायकोची..सांग न लेका!जा मग तिला आणायला" गंभीर होत सुकृत पुटपुटला,"ते एव्हढं सोपं नाही.सांगेन कधीतरी सविस्तर " विषय अर्धवट सोडून तो निघून गेला.
पुढे चार वर्षे माझी नी त्याची भेट नाही की संपर्क नाही. चार वर्षांनी फिरून गावात बदली मिळाली.. सुकृतकडे जाऊ म्हटले तर कळलं सुकृत तुरुंगात आहे.बाप रे! काय घोळ घातला याने.. म्हणून मी तुरुंगात त्याला भेटायला गेलो. भेटीसाठी परवानगी मागतांना हवालदाराने सांगितले ते ऐकून माझी काही क्षण दातखीळ बसली. सुकृतने गंगाचा त्याच्या पत्नीचा शांत डोक्याने खून केला होता. हा गुन्हा त्यानं स्वतः कबुल केला होता.. गेले तीन महिने त्याने सुटकेसाठी कोणतेच प्रयत्न केले नव्हते.. तो चांगली वर्तवणून ठेऊन अत्यंत शांतपणे आपली शिक्षा भोगत होता... हे सारं काही माझ्या समजशक्ती पलीकडलं होतं.सुकृत माशीही कधी मारेल यावर माझा विश्वास नव्हता .. माणूस मारणे त्यातही पत्नी जिच्यावर त्याचे निरतिशय प्रेम होते, ...तिला मारणे तर त्या पापभिरु माणसाला शक्यच नव्हते.भेटताक्षणीच मी सुकृतवर प्रश्नांचा भडीमार केला.सुकृतने मला एकच प्रश्न विचारला ,"गंगा कोण होती?" मी न उमजून पाहत होतो.. , "महाभारतातील भीष्मांची माता.. मुलगा जन्माला की नदीत सोडून देणारी...माझीही गंगा तशीच होती मी माझ्या पोराला मात्र वाचवू शकलो नाही." सुकृत बांध फुटून रडू लागला.
थोड्या वेळानं शांत झाल्यावर घटनांची संगती लावत सुकृत सांगू लागला..लग्नासाठी गंगाला पाहायला गेलो तेव्हा तिची एकमेव अट होती.. आमच्या देवीच्या पूजेला वर्षातून एकदा येऊ द्यायचे.. देवीची पूजा ना ! मी लगेच मान्य केलं. गंगा खूपच कमी एखादाच शब्द बोलत असे .. ती खुष होती मात्र ते शब्दांतून व्यक्त करणे तिला गरजेचे वाटत नव्हते.असेल एखादी व्यक्ती मितभाषी म्हणून मी दुर्लक्ष केलं.संसार मात्र ती भरभरून प्रेमानं करायची... मला तेव्हढं पुरेसं होतं. आम्ही मनालीहून परतलो त्याच्या नंतर दुसऱ्याच महिन्यात ती पूजेला म्हणून माहेरी गेली.. आठ दिवसांत परत आली.मला जरा ती फिकुटलेली वाटली , त्यावर तिनं उपसाने अशक्तपणा आल्याचे सांगितले.त्यानंतर सात महिन्यांनी ती पुन्हा पूजेला म्हणून माहेरी गेली.. माझा लग्न सराईचा काळ.. गडबडीचा त्यात तिचं जाणं मला मुळीच मान्य नव्हत. पूजा होईल की पुढे मागे.. मात्र वाद न घालता ती निघून गेलीच.या वेळी ती अक्षरशः पांढरी पडली होती.
आमच्या लग्नाला दोन वर्षे होत आले होते त्यात माझे वय अधिक .. म्हणून मी तिच्या मागे आता मूल होऊ देऊयात आपण असा लकडा लावला... तिला खरेच दिवस राहिले.. तिला कुठे ठेऊ नी कुठे नको असे झाले.. मला दिवस रात्र तिच्यासारख्या गोऱ्यापान बाळाचे स्वप्न पडू लागले... पाचवा महिना लागलेली गर्भाच्या तेजाने न्हाहलेली गंगा इतकी सुरेख दिसत होती की काय सांगू? 'सुमेध 'आम्ही मुलाचं नावही ठरवलं..... या सगळया दुधात मीठाचा खडा पडलाच... तिची ती पूजा आली. मी घर डोक्यावर घेतलं तिने मुळीच जाता कामा नये म्हणून मी अबोला धरला.. मात्र एके सकाळी उशाशी दोन ओळींची चिठ्ठी लिहून ती गेलीच." माझे जाणे अत्यावश्यक आहे.. पूजा पूर्ण करायला हवी. गंगा" एव्हढीच चिठ्ठी.... चार दिवस काही खबरबात नाही म्हणून मी जायला निघालो तर गंगा परत आली होती रिकाम्या ओटीनं.. तिथे पाय घसरून पडली नी बाळ गेलं असा कांगावा तिनं केला. मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो.. बाळ गेल्याचं दुःख वेदना दिसल्याच नाहीत मला.
पुढील वर्षी याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली या वेळी तिला सातवा महिना लागला होता नी तिला पूजेकरीता जायचे होते... आता मात्र मी कडाडून विरोध केला.. ह्या वेळी तू जाताच कामा नये हे बजावून सांगितलं. गंगानेही फार वाद घातले नाही... एका रात्री ती मागच्या सारखीच गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गाडी काढून तिच्या त्या so called माहेरी म्हणजे काकूंच्या वाडीत गेलो...कसलीही पूजेची तयारी दिसत नव्हती. माझं मस्तक तापलं मी तात्काळ तिला माझ्या सोबत परत चलण्यास सांगितले. काकूंनी समजूत घालून आजची रात्र राहा उद्या जेवून जा असा आग्रह केला. मी जेवणार नसल्याचं सांगून वरच्या खोलीत झोपायला गेलो...काकूंनी मला गरम दूध पाठवलं.... छानच चव होती.... मात्र पहिल्या घोटातच मला कसला तरी वेगळाच वास जाणवला.. मी ते न्हाणीघरात ओतून दिलं.. नी झोपायचं नाटक केलं. काकू आणि गंगा दोघींनी दोन तीनदा मी दूध संपविल्याची आणि झोपल्याची खात्री करून घेतली.
मध्यरात्रीच्या सुमारास एका विचित्र वाद्याचे पडघम घुं घुं करत माडातून येऊ लागले... पूर्ण चंद्र डोक्यावर होता मध्यरात्रीच्या बारा वाजले असावे... माडाच्या सावल्या शीरवीरहीत कबंधा प्रमाण फेर धरून नाचू लागल्या. कसलासा लाल तांबूस होम होता त्यात आहुती घालून कुणीतरी भयावह उग्र उच्चारण करीत होते.मी खिडकीच्या फटीतून डोकावून पाहिलं ... बस .. जे दृश्य होतं ते बीभत्स होतं काही स्त्री पुरुष नैसर्गिक दिगंबर अवस्थेत अंगावर बोटभर चिंधीही न घालता.. लाल पट्टे फासून निघाले होते त्यांच्या डोळ्यांत जाळ होता... कसल्यातरी काळ्या कभिन्न दगडाच्या दिशेने येऊन ते स्थिर झाले नी डोलू लागले.मी तोंडावर ओकारी येऊ नये म्हणून हात दाबून धरला... गर्दीला कापत एक स्त्री पुढं आली.. संपूर्ण नग्न रक्तानं माखलेली तिच्या हाती अर्धमेल भ्रूण होतं.. त्याला तिनं आगीत अर्पण केलं अचानक चित्कार करत बेभानपणे ते लोक आरोळ्या ठोकू लागले... ती स्त्री पाठमोरी वळली नी मी बेशुद्ध पडलो... गंगा?? माझी गंगाच होती ती. दुसऱ्या सकाळी गंगाला रात्री मेलेलं बाळ झाल्याचं मला रडून रडून सांगण्यात आलं. काळ घडलं ते स्वप्न नव्हतं तर.... त्याच क्षणी माझ्या मनात आलं विचारावं खडसावून हा काय प्रकार होता .. पण मी इथं मी सुरक्षित नाही ह्याची जाणीव झाली मला.. हे सैतानी लोक तुकडे करून गाडून टाकायलाही कमी करणार नाहीत. काही माहीत नसल्याचं सोंग करून, मी उदासपणे घरी निघालो. गंगाला जरा आराम करून पाठवा सांगितलं. त्याना जराही संशय येऊ दिला नाही.
काही दिवसांनी नेहमी प्रमाणे गंगा परत आली काही झालेच नाही अश्या थाटात वावरू लागली.एकदिवस मी तिला शांतपणे विचारलं, हे सगळं का कश्यासाठी? का माझ्या निरपराध बाळाचा बळी घेतलास चांडाळणी?? नको होतो मी माझं मूल तर जा जा निघून .... पैसे हवेत का तुला ? किती देऊ बोल? तिचे डोळे लालबुंद होत गेले,तिनं विचारलं " म्हणजे त्या दिवशी तुम्ही दूध घेतलं नाही झोपायचं नाटक केलं?" तिच्या झिंज्या धरून मी खडसावलं," नाटकं तर तू करतेस, नीच , हलकट.. काय प्रकार आहे हा?" गंगा शांतपणे म्हणाली," आता कळलं ना तुम्हाला? सगळं सांगतेच आता... ,अघोरी शक्तींची उपासना करतो आम्ही... मी काकुकडून दीक्षा घेतलीये... महापूजा करतो आम्ही.. पंचार्पण... पहिल्या, तिसऱ्या , पाचव्या, सातव्या आणि नवव्या महिन्यातील भ्रूण अघोरी शक्तीना हवे असतात... स्वतःचे अंश अर्पण करणाऱ्या साधकांना प्रचंड शक्ती प्राप्त होते.... सारं जग त्यांच्या इच्छेन बदलता येतं...हे भ्रूण प्रचंड जीवनेच्छेने भारलेले असतात.. त्यांनी अघोरी शक्ती प्रबळ होतात." मी संतापातिरेकानं काडकन तिच्या मुस्काटीत लागावल्या. 4 पोरं खाल्ली हडळीनं माझी.. "चल निघ घराबाहेर" मी तिला हाताला धरून बाहेर काढू लागलो.. ती चवताळून अंगावर धावून आली.."अजून एक पोर हवंय मला तुझ्याकडून .. मूर्ख माणसा.. अन्यथा केव्हाच तुझ्या नरडीचा घोट घेतला असता. मला ते दे मग तू मोकळा नी मी मोकळी" ती खदाखदा विकृत हसू लागली. मी बाजूलाच पडलेल्या उशीला तिच्या तोंडावर दाबून धरले.. हळूहळू तिची हालचाल बंद झाली.
सुकृत एव्हढे बोलून शांत झाला... काय बोलू ह्यावर कसा धीर देऊ त्याला? त्यानं उचललेलं पाऊल योग्य होतं की नव्हतं माहीत नाही पण पंचार्पण होण्यापासून त्यानं त्याच्या परीनं थांबवलं होतं . जड उध्वस्त मनानं मी घराची एकेक पायरी चढत होतो... काही योगायोगांवर विश्वास ठेवावाच लागणार होता......गुप्तधन मिळविण्यासाठी एका मांत्रिकाने मला पंचार्पण विधी करण्याचे आश्वासन दिले होते.
- यशश्री रहाळकर

Hi fakt Katha nahi tar aaplyakade ajunahi asha andhshraddhha aahet.
उत्तर द्याहटवाGot goosebumps.
उत्तर द्याहटवा