बेवडी बाई 😳
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
मुलींचं खेळता खेळता भांडण झालं ... हमरीतुमरीवर आल्या एक दुसरीला वेडी म्हणाली मग ती हिला बेवडी म्हणाली...😂 जरा दोन बिस्किटे पोटात गेल्यावर मी लेकीला अर्थ विचारला . ती म्हणाली ,"सोप्पंय वेड्याची बायको वेडी नी बेवड्याची बायको बेवडी"... ती चिमणी खेळायला पळून गेली ... माझ्या मनात मात्र न सुटणारं कोडं घालून .. वेड्याला आयुष्यभर सांभाळून घेणारी वेडी कशी असेल? आणि बेवाड्याची नित्यनेमाने शिव्या नी लाथा ,पोरांना पोटाशी घेऊन झेलणारी ती बेवडी असूच शकत नाही.मला होस्टेलच्या शेजारी बांधकामावरचा मजूर आठवला... रोज नेमानं पिऊन आला की यथेच्छ बायकोला तुडवायचा. ती हास्टेल मध्ये भांडे घासायची... बरेचदा बोलायची... तो पोरांना पोसत होता .. तिला मारणे हा जणू हक्काचं होता त्याचा.
बेवड्याची बायको नसली तरी बेवडी बाई तुम्हांला आता सहजी भेटू शकते. अगदी गरीब, मध्यमवर्गीयच काय उच्छभ्रू समाजातही अगदी सहजी गवसते. दारू पिणे मुळातच अश्लाघ्य वर्तन मानल्या गेलेल्या समाजात आता स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मद्यपानाचा आस्वाद घेतांना दिसतात...ड्रिंक्स या गोंडस शब्दांची किंवा 'वाईन दारू नसते' अश्या वाक्यांची आता मी माझ्या अडाणी मनाला सवयच करून घेतली आहे . तुम्ही तुमच्या वैयक्तिक आनंदापुरतं काय शेण खायचं ते खा हो! पण चार चौघात समाजाच्या बांधणीवर त्याचे पडसाद जेव्हा उमटू लागतात तेव्हा ही चिंतेची बाब होते. गेल्या काही दिवसांत मी अश्या बेवडी बायांचे साक्षात दर्शन घेतले नी धन्य झाले.
आजकाल मी 31st च्या पार्ट्यांमध्ये जात नाही... नवऱ्याबरोबर त्याहूनही दोन पेग जास्तच रिचवणाऱ्या बायका बघवत नाहीत मला...."त्यात काय तिच्या नवऱ्याला आवडतं ती कंपनी देते" हे ऐकून मी गारठते. मी लहानश्या गावात वाढलेली साधीशी बाळबोध व्यक्ती आहे ... मुलींनी काय करावे करू नये ह्याचे धडे घोटून घोटून गिरविलेली.मला लोक अडाणी ,जुनाट, बुरसटलेली म्हणतात. चालेल मला! त्यासाठी का दारू ढोसायची???सध्या एखाद्या साथीच्या आजारासारखं हे पार्टी कल्चर आपल्याकडे मध्यमवर्गातही पसरतंय.
एक मैत्रीण जी उपवर मुलाची आई आहे ती बरीच व्रते वगैरे करू लागली... मुलगा उच्च शिक्षित उत्तम नोकरी पगार घरदार असूनही विवंचनेत होती. त्याला पाहायला आलेल्या पहिल्याच मुलीने भेटीअंती ती saturday ला ड्रिंक घेते थोडक्यात पिणारच हे जाहीर केलं नी त्या बापुड्या साध्या सरळ पोराला धक्काच बसला. हिने कबूल तरी केलं नकार देता आला पण एखादीनं सांगितलंच नाही तर???आता त्या मुलाची आई निर्व्यसनी सून मिळावी म्हणून व्रतवैकल्ये करतेय.
बरेचदा हॉटेल्स ,रिसॉर्टस मध्येही मुली बाटल्या च्या बाटल्या रिचवतांना दिसतात. टपरीवर उभे राहून राजरोस चहा घेण्यासारखं हे कॉमन झालंय का? इतक्या नजरा मेल्यात बहुदा! सिगारेटी फुंकणाऱ्यांबद्दल तर न बोललेच बरे! 😢 काही वर्षे वाशीम ला नोकरीनिमित्त माझी आई असतांना एक वेगळाच अनुभव आला दर शनिवारी कॉलनीतील दोन मुले भेदरलेली ...कुणाच्या तरी घरी जाऊन लपत.दर शनिवारी दोघे माय बाप चिक्कार पिऊन मारझोड तमाशा करीत.. स्वतः च्या भुकेची शुद्ध नसे तिथे पोरांचे काय? बरेचदा मधल्या मध्ये पोरांना मार बसे म्हणून ते लपून बसत.दोघेही उच्च शिक्षित ,सरकारी नोकरीत उच्च पदस्थ अधिकारी... काय बोलावे यावर.
एका नावाजलेल्या सामाजिक संस्थेने आमच्या ग्रुप ला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बोलावलं. मोठ्या शहरातील सगळेच पदाधिकारी वगैरे मिळून 300 शे बायका असाव्यात. त्यांना संस्कृती संवर्धनात्मक कार्यक्रम हवा होता .शिवाय त्यांचे पिकनिक साधता येणार होते. आम्हाला वाटले काय झक्कास संधी मिळालीये. पण हाय रे दुर्दैवा! आधीच मर्कट त्यातून मद्य प्याला ... नाशकातील प्रसिद्ध वायनरी स्थळ होते ... त्याची धुंदी इतकी जालीम होती की सांस्कृतिकच काय कुठलाच आविष्कार समजण्या पलिकडे त्या पोहोचल्या होत्या. त्यांनी परिधान केलेल्या ब्रँडेड कपडे , ज्वेलरी ,नी प्राडा च्या पर्सची सुद्धा शुद्ध नव्हती त्यांना...आणि त्या सगळ्यात कोंबून बसविलेल्या त्यांच्या देहाची सुद्धा.
आम्ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही... हे दाखवण्याची स्त्रियांची धडपड सातत्याने सध्या सुरू असते. काही अनुभवांनी खरेच ती साध्य झाली असे दिसतेही. नाशिकच्या गणपतीच्या मिरवणूकीत अवजड ढोल मुली जेव्हा लीलया पेलत मस्त फेटे घालून लयीत वाजवतात तेव्हा वाटतं yes ही खरी समानता.बऱ्याच लेकी आईवडिलांना प्रेमानं म्हातारपणी सांभाळतात... ही खरी समानता. बाईकवर मस्त मुक्त भटकतात, बँकांचे व्यवहार करतात .. .. समानता/ बरोबरी करायचीच तर चांगल्या गोष्टीत करा ना! एका मुलासारखं आईसाठी हळवं व्हा, एखादया भावासारखा बहिणीला आधार द्या, एखाद्या पुरुषांसारखं जबाबदार व्हा... सगळ्यांच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करा... पुरुष म्हणजे वाईट अन स्त्री म्हणजे महान देवी असं नक्कीच नाही... त्यांच्या मायेची आधाराची भूमिका घ्या जमली तर...
जी गोष्ट मुळात अनेक पुरुषांच्या जीवनाची विधुळवाट करून बसली आहे तिला मस्तकावर धारण का करा?? येत्या काही वर्षांत या बेवड्या बायकांमुळे पुन्हा एखाद्या गडकरींना "सिंधूचा एकच प्याला " लिहिण्याची वेळ येऊ नये , हीच येत्या काळाला प्रार्थना 😔
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
02/04/19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
मंगळवार, २ एप्रिल, २०१९
बेवडी बाई
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Asach aahe ha aajcha samaj.....Madhe eka olkhitlya muline mala vicharle hote" madam tumhi ghetat ka"? Aikun ch chakkar aali mala🙄🙄🙄
उत्तर द्याहटवाShilpa S
Mast...chan
उत्तर द्याहटवाSunder ...
उत्तर द्याहटवाPradnya